प्रभू भोजन आणि त्याचे नेतृत्व कसे करावे
येशू म्हणाला - “स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे; ह्या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्वकाळ जगेल; जी भाकर मी देईन ती माझा देह असून तीजगाच्या जीवनासाठी आहे.”
होली कम्युनियन किंवा "प्रभू भोजन" हा आपला येशू सोबतचा घनिष्ट संबंध आणि वर्तमान नातेसंबंध साजरा करण्याचा एक मार्ग आहे. येथे त्याचे नेतृत्वकरण्याचा एक सोपा मार्ग आहे.
प्रभू भोजन साजरे करण्याचा येथे एक सोपा मार्ग आहे!
जेव्हा तुम्ही येशूचे अनुयायी म्हणून एकत्र येता तेव्हा शांतपणे मनन करण्यात वेळ घालवा, शांतपणे विचार करा आणि तुमच्या पापांना स्वीकार करा.
जेव्हा तुम्ही तयार असाल, तेव्हा कोणाला तरी पवित्रशास्त्रातील हा शास्त्रभाग वाचायला सांगा -
“कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हांला सांगितले आहे की, ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली; आणि आभारमानून ती मोडली, आणि म्हटले, [घ्या, खा,]हे माझे शरीर तुमच्यासाठी [मोडलेले असे] आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा.” 1 करिंथकरांस पत्र 11:23-24
तुम्ही तुमच्या गटासाठी बाजूला राखून ठेविलेली भाकर त्यांना द्या आणि ती खा. वाचन सुरू ठेवा –
"मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे; जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदामाझ्या स्मरणार्थ हे करा.'' 1 करिंथकरांस पत्र 11:25
तुम्ही तुमच्या गटासाठी बाजूला राखून ठेविलेला रस किंवा द्राक्षरस सामायिक करा (लोकांना द्या) आणि तो प्या.
वाचन पूर्ण करा: "कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करिता." 1 करिंथकरांसपत्र 11:26
प्रार्थना किंवा गीत गाऊन आनंद साजरा करा.
तुम्ही प्रभू भोजन सामायिक केले (दिले) आहे. तुम्ही त्याचे आहात आणि तो तुमचा आहे!
स्व: तालाच विचारा
- प्रभू भोजन घेण्यासाठी काय आवश्यक आहे आणि काय आवश्यक नाही याबद्दल बायबल काय सांगते?
आपण गमावत आहात. आताच नोंदणी करा!
- तुमच्या वैयक्तिक प्रशिक्षण प्रगतीचा मागोवा घ्या
- गट नियोजन साधनांची हाताळणी करा
- प्रशिक्षकाशी संपर्क साधा
- जागतिक दूरदृष्टी मध्ये तुमचा प्रयत्न शामिल करा!
मूलभूत शिष्य-निर्मिती आणि साधारण चर्च रोपणीच्या गुणात्मक वाढीची तत्त्वे, प्रक्रिया आणि पद्धतींमध्ये सहभागींना सुसज्ज करण्यासाठी झुमे ऑनलाइन प्रशिक्षण मंच वापरतो.
मोठ्या झुमे दूरदृष्टीचा (विजन) भाग म्हणून झुमे प्रशिक्षण विनामूल्य दिले जात आहे.