झुमे सतत विचारले जाणारे प्रश्न


हे खरोखर 100 टक्के विनामूल्य आहे का?

होय. कोणत्याही प्रीमियम आवृत्त्या नाहीत, चाचणी कालावधी नाही, उत्पादनांची विक्री नाही. मुक्तपणे आम्हाला प्राप्त झाले आहे. मुक्तपणे आम्ही देतो.

प्रशिक्षण घेण्यासाठी तुमचे वय किती वर्षांचे असणे आवश्यक आहे?

आम्ही 13 वर्ष व त्याहून अधिक वयोगटातील लोकांना प्रशिक्षण देण्याची शिफारस करतो. जर तुम्हाला असे वाटते की तुमच्याकडे कोणी लहान मुलगा-मुलगी आहे ज्यांना ह्याचा फायदा होऊ शकेल तर सर्व प्रकारे त्यांना सहभागी होऊ द्या.

जर एखाद्याला प्रशिक्षण घ्यायचे असेल आणि ई-मेल पत्ता नसेल तर काय करावे?

गटातील कमीतकमी एका व्यक्तीकडे तरी त्यांनी प्रत्यक्षात वापरलेले ईमेल अकाउंट असणे आवश्यक आहे जेणेकरून ते वेबसाइटमध्ये लॉगिन करू शकतील आणि सर्व वैशिष्ट्यांना जानू शकतील. सहभागी जे गटासह उपस्थित राहून मीडिया बघतात त्यांना गट सुरू होण्यासाठी ईमेल पत्त्याची आवश्यकता नसते.

प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी मी धड्यांचे पूर्वावलोकन कसे करू शकतो?

“विहंगावलोकन (आढावा)” विभाग पहा. हे संकल्पना, साधने आणि तुमचा गट प्रत्येक सत्रासाठी कोणत्या गोष्टींचा अभ्यास करेल यावर हायलाइट करते.

प्रशिक्षणातील सामग्री काय आहे?

तुम्ही सामग्री विभागातील सामग्रीचे विहंगावलोकन (आढावा) पाहू शकता, किंवा गाइडबुक डाउनलोड करू शकता आणि कोर्स सामग्रीचे पुनरावलोकन करू शकता, किंवा लॉगिन करू शकता आणि एक गट सुरु करू शकता परंतु सत्राच्या पहिल्या पृष्ठावर “सत्र अन्वेषण (एक्सप्लोरिंग सेशन)” निवडा. ह्या द्वारे तुम्ही कोर्सच्या सामग्री मधून जाऊ शकता बिना ते पूर्ण झाल्याचे चिन्हांकित करताच.

मला प्रशिक्षणापूर्वी मॅन्युअल (गाइडबुक) च्या प्रती बनवायच्या आहेत. मी ते कसे करू शकतो?

प्रत्येक पृष्ठाच्या शीर्षस्थानी “याबद्दल” टॅबवर फिरवून आपण नेहमीच गाइडबुक शोधू शकता.

मी चुकून पुढील बटण दाबले आणि मला परत मागे जाऊन व्हिडिओ पहायचा आहे. मी नॅव्हिगेट कसे करू?

सत्रामध्ये नेव्हिगेट करण्यासाठी सत्राच्या खालील “मागील” आणि “पुढील” बटणे वापरा. डॅशबोर्डवरून आपण गटाच्या सत्र क्रमांकावर क्लिक करू शकता आणि थेट त्या सत्रावर जाऊ शकता.

येथे बरेच डीएमएम किंवा सीपीएम प्रशिक्षक आहेत, तर झुमेची आवश्यकता का आहे?

ऑनलाईन प्रशिक्षणापेक्षा थेट प्रशिक्षण चांगले आहे. ऑनलाइन प्रशिक्षण कधीही थेट प्रशिक्षण कार्यक्रम पुनर्स्थित करू नये. दुर्दैवाने, प्रवेश मर्यादा, जागरूकता, उपलब्धता, वेळापत्रक आणि इतर बर्‍याच कारणांमुळे बर्‍याच लोकांना जे थेट प्रशिक्षण कार्यक्रम करू शकतात आणि ज्यांना प्रवेश मिळाला पाहिजे त्यांना प्रवेश मिळत नाही. अशा लोकांना उच्च दर्जाचा एंट्री लेव्हल पर्याय प्रदान करण्याचा झुमेचा प्रयत्न आहे. हे इतरांकडून उपलब्ध थेट प्रशिक्षण प्रकारांसारख्याच तत्त्वांचा वापर करते. याव्यतिरिक्त, आम्हाला असे आढळले आहे की एकदा एखाद्याने झुमेचे प्रशिक्षण घेतल्यानंतर ते सहजपणे जाऊ शकतात आणि स्वतःचा गट सुरू करू शकतात आणि झुमेचा वापर करून इतरांना प्रशिक्षण देऊ शकतात. शिष्य बनवण्याच्या तत्त्वांना गुणाकार करण्याची ही एक चांगली संधी आहे.

झुमेचे विश्वासाचे विधान काय आहे?

ज्याअर्थी झुमे कोणत्याही संस्थे द्वारे चालविले जात नाही, त्यामुळे ह्याचे विश्वासाचे औपचारिक विधान नाही. तथापि, आपण जे सर्व यामध्ये सामील आहोत, लुईसियान करारावर सहमत असतील. Read the Covenant

काय मी स्वतःहून प्रशिक्षण करू शकतो?

नाही. ह्यात आवश्यक प्रशिक्षण अभ्यास आणि सराव सत्रे आहेत ज्यांना इतर सहभाग्यांनी हे पूर्ण करणे आवश्यक आहे. प्रत्येक सत्रात कमीतकमी 3-4 लोक उपस्थित असणे आवश्यक आहे, नाहीतर तुम्ही पूर्ण प्रशिक्षणाचा अनुभव घेऊ शकणार नाही.

प्रशिक्षण कोणासाठी उपयुक्त आहे?

हे प्रशिक्षण त्या ख्रिस्ताच्या अनुयायांसाठी योग्य आहे जे 13 वर्षांचे किंवा त्यापेक्षा मोठे आहेत आणि जे वाचन करण्यास सक्षम आहेत. भविष्यकाळात, अशी एक आवृत्ती तयार केली जाऊ शकते जी साक्षर नसलेल्या लोकांसाठी योग्य असेल, परंतु ही ती आवृत्ती नाही. आमचा विश्वास आहे की ह्या प्रोफाइलमध्ये बसणार्‍या प्रत्येक व्यक्तीने प्रशिक्षण घेतले पाहिजे.

झुमे कोणाच्या मालकीचे आहे?

अशी कोणतीही संस्था नाही जी झुमे प्रोजेक्ट “चालवीत” आहे आणि हा प्रोजेक्ट पण संस्था नाही. ही अशा लोकांची एक युती आहे ज्यांना पृथ्वीवरील प्रत्येक गटाच्या लोकांना शिष्य बनविण्याद्वारे ख्रिस्ताची आज्ञा पाळण्याची आणि स्वर्गात आहे त्याप्रमाणे पृथ्वीवर त्याची इच्छा पूर्ण होईपर्यंत त्याचे राज्य सर्व ठिकाणी विस्तारण्याची मनापासून इच्छा आहे. या प्रोजेक्टची कल्पना जोनाथन प्रोजेक्ट लिडरशिपच्या बैठकीतून अस्तित्वात आली परंतु त्यानंतर त्या गटाच्या पलीकडेही ती खूप पसरली आहे. जोनाथन प्रोजेक्ट जगभरातील लोकांचा समूह आहे जे शिष्यांची गुणात्मक वाढ होण्यासाठी वचनबद्ध आहेत.

नियोजित तीन टप्पे (फेज) कोणते आहेत?

फेज 1:
पहिल्या टप्प्यात (फेज मध्ये) युनायटेड स्टेट्स आणि इंग्रजीवर लक्ष केंद्रित केले गेले आहे. प्राथमिक ध्येय चार ते बारा जणांचा प्रशिक्षण गट देशातील दर प्रत्येकी 5,000 लोकांच्या प्रति उत्प्रेरक करणे आहे. या प्रशिक्षण गटांपैकी प्रत्येकाला दोन प्रथम पिढ्यांचे चर्च सुरू करण्याचे आव्हान केले जाईल ज्यांची पुन्हा वाढ होईल. युनायटेड स्टेट्स साठी 65,000 हून अधिक इंग्रजी भाषेचे झुमे गट आणि 130,000 चर्च सुरू करण्याचे लक्ष्य आहे.

फेज 2:
दुसर्‍या टप्प्यात (फेज मध्ये) पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेद्वारे या 1 टप्प्यातील चर्चच्या कोचिंगवर तसेच इतर प्रमुख जागतिक भाषांमध्ये प्रकल्प देण्यावर भर देण्यात आला आहे. प्रोजेक्ट पुढील भाषांमध्ये सुरू होईल: अम्हारिक, अरबी, बंगाली, भोजपुरी, बर्मी, चीनी (मंदारिन), चीनी (कॅन्टोनीज), फारसी, फ्रेंच, जर्मन, गुजराती, हौसा, हिंदी, इंडोनेशियन, इटालियन, जपानी, कन्नड, कोरियन , कुर्दीश, लाओ, मैथिली, मल्याळम, मराठी, उडिया, पंजाबी (पूर्व), पंजाबी (पश्चिम), पोर्तुगीज, रशियन, सोमाली, स्पॅनिश, स्वाहिली, तमिळ, तेलगू, थाई, तुर्की, उर्दू, व्हिएतनामी, योरूबा.

फेज 3:
तिसरा टप्पा फेज 1 आणि फेज 2 मधील चर्चला प्रत्येक लोकांच्या गटामध्ये, प्रत्येक ठिकाणी शिष्य बनविण्याच्या दृष्टीने जागतिक पातळीवर एकत्रित करण्यावर लक्ष केंद्रित करितो. झुमे प्रोजेक्ट आपल्या पिढीतील गुणात्मक वाढ होणाऱ्या शिष्यांद्वारे जग संतृप्त करण्यासाठी अस्तित्वात आहे. आमच्या ध्येय्यास गती देण्यासाठी, आम्ही विकसित केले आहे आणि देणार आहोत एक मॅपींग सोल्यूशन झुमे प्रशिक्षण गट आणि यूएसच्या बाहेर प्रत्येकी ५०,००० लोकांमध्ये दोन साधारण चर्चच्या उद्दिष्टासाठी टीमांना धोरणात्मकरित्या कार्य करण्यास अनुमती देताना.


याला झुमे का म्हणतात?

ग्रीक भाषेत झुमे चा अर्थ खमीर आहे. मत्तय 13:33 मध्ये, येशूने असे सांगितले आहे की, “स्वर्गाचे राज्य एका स्त्रीसारखे आहे जिने खमीर घेतले आणि ते सर्व पीठात मिसळले जो पर्यंत ते फुगले नाही.” सामान्य लोक, सामान्य स्त्रोत वापरुन, देवाच्या राज्यासाठी विलक्षण प्रभाव कसा टाकू शकतात हे यावरून स्पष्ट होते. झुमे चे उद्दीष्ट आहे सामान्य विश्वासूंना आपल्या शेजारच्या लोकांपर्यंत पोहोंचविण्यासाठी सुसज्ज आणि सक्षम बनविणे.

प्रशिक्षण कोणत्या भाषांमध्ये अनुवादित केले जाईल?

प्रोजेक्ट पुढील भाषांमध्ये सुरू होईल आणि प्रशिक्षण आणि साधनांचा अतिरिक्त भाषांमध्ये अनुवाद करण्यास इच्छुक असलेल्यांसाठी उपलब्ध करुन दिला जाईल: अम्हारिक, अरबी, बंगाली, भोजपुरी, बर्मी, चीनी (मंदारिन), चीनी (कॅन्टोनीज), फारसी, फ्रेंच, जर्मन, गुजराती, हौसा, हिंदी, इंडोनेशियन, इटालियन, जपानी, कन्नड, कोरियन, कुर्दिश, लाओ, मैथिली, मल्याळम, मराठी, उडिया, पंजाबी (पूर्व), पंजाबी (पश्चिम), पोर्तुगीज, रशियन, सोमाली, स्पॅनिश, स्वाहिली, तामिळ, तेलगू, थाई, तुर्की, उर्दू, व्हिएतनामी, योरूबा. सर्वात अद्ययावत (अपडेटेड) प्रगती पाहण्यासाठी येथे जाभाषांचे भाषांतर प्रगती

प्रशिक्षणार्थींनी सुरू केलेले गट कसे संरेखित किंवा आयोजित केले आहेत?

हे अवलंबून आहे. जर प्रशिक्षणार्थी एखाद्या विशिष्ट चर्च किंवा संप्रदाय किंवा नेटवर्कमधून बाहेर पडले तर सर्वात स्वाभाविक गोष्ट म्हणजे नव्याने तयार झालेल्या गटांना त्या विद्यमान चर्च, संप्रदाय किंवा नेटवर्कशी जोडले जावे. इच्छित असल्यास, तथापि, सुरू होणार्‍या गटांकडून नवीन नेटवर्क तयार केले जाऊ शकते. तिसरा पर्याय म्हणजे नवीन गटांना साधारण चर्चच्या आधीपासून अस्तित्त्वात असलेल्या नेटवर्कमध्ये सामील होणे असते. झुमे विकसित करण्यामध्ये गुंतलेले बरेच लोक अशा नेटवर्कमधून येतात जेणेकरून इच्छित असल्यास आम्ही त्याच्या आयोजनामध्ये मदत करू शकू.

माझी तीन-महिन्यांची योजना कोण पाहू शकेल?

केवळ तुम्हालाच तुमची योजना पाहता येईल, जोपर्यंत तुम्ही त्यास तुमच्या गटाशी लिंक करित नाही, तेव्हा गट नेते आणि सह नेते तुमची तीन महिन्यांची योजना पाहण्यास सक्षम असतील. तुमची योजना तुमच्या प्रशिक्षकाला देखील दृश्यमान असेल. तुम्हाला कोचिंग नको असल्यास आपल्या प्रोफाइलवर जा आणि “डिक्लाइन कोचिंग (प्रशिक्षण नाकारा)” वर कोचिंग प्राधान्य सेट करा.

काय मी माझी तीन महिन्यांची योजना प्रिंट करू (छापू) शकतो?

होय, तुम्ही तुमची योजना प्रथम जतन (सेव) केली असल्याचे सुनिश्चित करा, त्यानंतर फक्त आपल्या योजनेच्या तळाशी स्क्रोल करा आणि “जतन केलेली योजना प्रिंट करा (प्रिंट सेव्हड प्लान)” बटणावर क्लिक करा.

काय मी माझी तीन-महिन्यांची योजना नंतर संपादित (एडिट) करू शकतो?

होय, तुम्ही कधीही तुमच्या योजनेकडे परत जाऊ शकता आणि ती संपादित करू शकता. तुमच्या योजनेच्या तळाशी तुम्ही “जतन करा (सेव)” क्लिक केल्याचे सुनिश्चित करा.

माझ्या गटातील लोकांशी संवाद साधण्याकरिता झुमे माझ्यासाठी मार्ग प्रदान करितो काय?

यावेळी नाही. आम्ही शिफारस करितो की तुमच्या गटाच्या प्रत्येक सदस्याने लॉगिन तयार करावा आणि तुमच्या झुमे गटात जोडले जावे. अशा प्रकारे प्रत्येक सदस्याला जेव्हा पाहिजे तेव्हा सर्व सामग्री प्राप्त होऊ शकेल. मग गट पुढील गट संप्रेषणासाठी ते पसंत करतात असे कोणतेही मेसेजिंग प्लॅटफॉर्म वापरू शकतात (आय मेसेज, वॉट्सअप, फेसबुक गट, इ.).


झुमे प्रकल्पाची उद्दीष्टे:

ग्रीक भाषेत झुमे चा अर्थ खमीर आहे. मत्तय 13:33 मध्ये, येशूने असे सांगितले आहे की, “स्वर्गाचे राज्य एका स्त्रीसारखे आहे जिने खमीर घेतले आणि ते सर्व पीठात मिसळले जो पर्यंत ते फुगले नाही.” सामान्य लोक, सामान्य स्त्रोत वापरुन, देवाच्या राज्यासाठी विलक्षण प्रभाव कसा टाकू शकतात हे यावरून स्पष्ट होते. आपल्या पिढीतील गुणात्मक वाढ होणाऱ्या शिष्यांसह जग परिपूर्ण करण्यासाठी सामान्य विश्वासूंना सुसज्ज आणि सक्षम बनविणे हे झुमे चे उद्दीष्ट आहे.

मूलभूत शिष्य-निर्मिती आणि साधारण चर्च रोपणीच्या गुणात्मक वाढीची तत्त्वे, प्रक्रिया आणि पद्धतींमध्ये सहभागींना सुसज्ज करण्यासाठी झुमे ऑनलाइन प्रशिक्षण मंच वापरतो.

इंग्रजी


English English
العربية Arabic
العربية - الأردن Arabic (JO)
Sign Language American Sign Language
भोजपुरी Bhojpuri
বাংলা Bengali (India)
Bosanski Bosnian
粵語 (繁體) Cantonese (Traditional)
Hrvatski Croatian
فارسی Farsi/Persian
Français French
Deutsch German
ગુજરાતી Gujarati
Hausa Hausa
हिंदी Hindi
Bahasa Indonesia Indonesian
Italiano Italian
ಕನ್ನಡ Kannada
한국어 Korean
کوردی Kurdish
ພາສາລາວ Lao
𑒧𑒻𑒟𑒱𑒪𑒲 Maithili
國語(繁體) Mandarin (Traditional)
国语(简体) Mandarin (Simplified)
मराठी Marathi
മലയാളം Malayalam
नेपाली Nepali
ଓଡ଼ିଆ Oriya
Apagibete Panjabi
Português Portuguese
русский Russian
Română Romanian
Slovenščina Slovenian
Español Spanish
Soomaaliga Somali
Kiswahili Swahili
தமிழ் Tamil
తెలుగు Telugu
ไทย Thai
Türkçe Turkish
اُردُو Urdu
Tiếng Việt Vietnamese
Yorùbá Yoruba
More languages in progress