सत्र विहंगावलोकन (आढावा)

सत्र विहंगावलोकन (आढावा)

सत्र 1

संकल्पना

झुमे मध्ये आपले स्वागत आहे - तुम्ही बघाल कि कसा मोठा प्रभाव पाडण्यासाठी परमेश्वर सामान्य लोकं जे साधारण गोष्टी करतात त्यांचा उपयोग करून घेतो.
त्यांना आज्ञा पालन करायला शिकविणे - शिष्य बनणे, शिष्य बनविणे आणि चर्च म्हणजे काय याचा सार जाणून घ्या.
अध्यात्मीक श्र्वासोच्छ्‌वास - शिष्य होणे म्हणजे आपण देवाकडून ऐकतो आणि आपण देवाची आज्ञा पाळतो.

साधन

S.O.A.P.S. बायबल अध्ययन - दररोज बायबल अभ्यासाचे एक साधन जे आपणास देवाचे वचन समजण्यास, पालन करण्यास आणि सामायिक करण्यास मदत करते.
जबाबदारीचे गट - दोन किंवा तीन लोकांना (पुरुष किंवा स्त्री वेगवेगळे) आठवड्यातून एकदा भेटण्यासाठी आणि चांगले चालणार्‍या क्षेत्रांमध्ये आणि सुधारणे आवश्यक असलेले क्षेत्रांमध्ये एकमेकांना प्रोत्साहित करण्याचे साधन.

सराव

जबाबदारी गट - जबाबदारीच्या प्रश्नांमधून कार्य करण्यासाठी दोन किंवा तीन लोकांच्या गटात विभाजित व्हा. (45 मिनिटे)

सत्र 2

List 100 people you know, 3 categories: those who follow Jesus, those who don't follow Jesus, those they're not sure about

संकल्पना

निर्माणकर्ते विरुद्ध ग्राहक - तुम्ही असे चार मुख्य मार्ग जाणून घ्याल जे परमेश्वर रोज बनवितो अनुयायांना येशू सारिखे अधिक बनविण्यासाठी.

साधन

प्रार्थना चक्र - हे बघा प्रार्थना करण्यात एक तास घालवणे किती सोपे आहे,
100 ची यादी - तुमच्या संबंधांचे चांगले कारभारी होण्यास मदत करण्यासाठी डिझाइन केलेले एक साधन.

सराव

प्रार्थना चक्र - प्रार्थना मध्ये 60 मिनिटे वैयक्तिकरित्या घालवा.
100 ची यादी - 100 ची स्वतःची यादी तयार करा. (30 मिनिटे)

सत्र 3

Whoever can be trusted with very little can also be trusted with much. - Jesus. Breathe in, hear, breathe out, obey and share. Giving God's blessings
Obey, do, practise, share, teach, pass on

संकल्पना

अध्यात्मिक अर्थशास्त्र - देवाचे अर्थशास्त्र जगापेक्षा कसे वेगळी आहे ते जाणून घ्या. परमेश्वर त्या लोकांमध्ये अधिक गुंतवणूक करितो ज्यांना आधीच देण्यात आलेल्या गोष्टींमध्ये ते विश्वासू आहेत.
सुवार्ता - मानवतेच्या सुरुवातीपासून या काळाच्या शेवटापर्यंत देवाची सुवार्ता सांगण्याचा एक मार्ग शिका.

साधन

बाप्तिस्मा - येशू म्हणाला, “जा आणि सर्व राष्ट्रांच्या लोकांस शिष्य बनवा, त्यांना पित्याच्या आणि पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्म द्या…” याचा उपयोग कसा करायचा ते शिका.

सराव

परमेश्वराची कहाणी सांगा - दोन किंवा तीनच्या गटात विभाजित व्हा आणि परमेश्वराची कहाणी सांगण्याचा सराव करा. (45 मिनिटे)

सत्र 4

संकल्पना

सर्वात मोठा आशीर्वाद - येशूचा केवळ एक अनुयायी बनविण्याचा नव्हे तर येणाऱ्या पिढ्यान्पिढ्या गुणात्मक वाढ होणारे संपूर्ण आध्यात्मिक कुटुंबे बनवण्याचा सोपा नमुना शिका.
डोळे पाहण्यासाठी - देवाचे राज्य कोठे नाही हे पहाण्यास सुरवात करा. ह्या सहसा अश्या जागा असतात जिथे परमेश्वर सर्वात जास्त काम करू इच्छितो.
बदकाच्या पिल्लू सारिखे शिष्यत्व - बदकांच्या पिल्लांचा शिष्य बनविण्याशी काय संबंध आहे ते शिका.

साधन

3-मिनिटांची साक्ष - येशूने तुमच्या जीवनात कसा प्रभाव पाडला हे सांगत असताना तीन मिनिटांत आपली साक्ष कशी द्यायची ते शिका.
प्रभू भोजन - येशूसंगती तुमचा जिव्हाळ्याचा संबंध आणि असलेले नाते साजरा करण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. साजरा करण्याचा एक सोपा मार्ग जाणून घ्या.

सराव

तुमची साक्ष सांगणे - दोन किंवा तीनच्या गटात विभाजित व्हा आणि इतरांसह आपली साक्ष सामायिक करण्याचा सराव करा. (45 मिनिटे)
प्रभू भोजन - एक गट म्हणून एकत्रित होऊन हे करण्यासाठी वेळ घ्या. (10 मिनिटे)

सत्र 5

संकल्पना

शांतीप्रिय व्यक्ती - शांतीप्रिय व्यक्ती कोण असू शकतो आणि तो तुम्हाला सापडल्यावर कसे माहित करून घ्यावे हे जाणून घ्या.

साधन

प्रार्थनेतील वाटचाल - इतरांसाठी प्रार्थना करण्याच्या देवाच्या आज्ञेचे पालन करण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. आणि हे असे दिसते जसे कि - चालता-फिरता देवाला प्रार्थना करणे!

सराव

B.L.E.S.S. प्रार्थना - इतरांसाठी प्रार्थना करण्याच्या रीतींची तुम्हाला आठवण करून देण्यासाठी साध्या स्मृतिनिमित्ताचा सराव करा. (15 मिनिटे)
प्रार्थनेतील वाटचाल - दोन किंवा गटात विभाजित व्हा आणि प्रार्थना वाटचालीचा सराव करण्यासाठी समाजात जा. (60-90 मिनिटे)

सत्र 6

संकल्पना

विश्वासूपणा - शिष्यांना काय माहित आहे हे महत्त्वाचे आहे - परंतु जे त्यांना माहित आहे त्याविषयी ते काय करतात हे अधिक महत्वाचे आहे.

साधन

3/3 गट स्वरूप (फॉर्मेट) - येशूच्या अनुयायांना भेटण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी, शिकण्यासाठी, वाढण्यासाठी, सोबत असण्यासाठी, आणि त्यांनी शिकलेल्या गोष्टींचे पालन करण्यासाठी आणि ते सामायिक करण्यासाठी 3/3 गट हा एक मार्ग आहे. अशा प्रकारे, 3/3 गट हा केवळ एक छोटा गट नाही तर एक साधारण चर्च आहे. (80 मिनिटे)

सत्र 7

संकल्पना

प्रशिक्षण चक्र - प्रशिक्षण चक्र जाणून घ्या आणि ते शिष्य बनवण्यास कसे लागू होते याचा विचार करा.

सराव

3/3 गट - आपला संपूर्ण गट 3/3 गट स्वरूपाचा अभ्यास करण्यासाठी 90 मिनिटे घालवेल.

सत्र 8

संकल्पना

नेतृत्वाचे गट (कक्ष) - नेतृत्वाचा गट हा एक मार्ग आहे त्यांच्यासाठी ज्यांना वाटते कि त्यांना नेतृत्व करण्यासाठी बोलाविले आहे आणि सेवेचा सराव करण्याद्वारे ते आपले नेतृत्व विकसित करू शकतील.

सराव

3/3 गट - आपला संपूर्ण गट 3/3 गट स्वरूपाचा अभ्यास करण्यासाठी 90 मिनिटे घालवेल.

सत्र 9

संकल्पना

क्रम-नसलेला - शिष्य बनविणे हे कसे रेषीय असणे गरजेचे नसते ते पहा. एकाच वेळी बर्‍याच गोष्टी घडू शकतात.
गती - गुणात्मक वाढ होणे महत्त्वाचे आहे आणि झटपट गुणात्मक वाढ होणे अधिक महत्त्वाचे आहे. गती का महत्त्वाची आहे ते पहा.
दोन मंडळ्यांचा (चर्चचा) भाग - जाऊन आणि तेथे राहून येशूच्या आज्ञा कशा पाळाव्या ते शिका.

सराव

3-महिन्यांची योजना - तुम्ही पुढील तीन महिन्यांत झुमे ची साधने कशा अंमलात आणता येईल याबद्दल तुमची योजना तयार आणि सामायिक करा. (60 मिनिटे)

सत्र 10 - प्रगत प्रशिक्षण

संकल्पना

परस्परसंबंधांमधील नेतृत्व - गुणात्मक वाढ होणाऱ्या मंडळ्या कश्या जुडून राहतात आणि एक आध्यात्मिक कुटुंब म्हणून, एकत्र जीवन कसे जगतात हे जाणून घ्या.

साधन

मदतीची नोंदयादी (कोचिंग चेकलिस्ट) - मदतीची नोंदयादी (कोचिंग चेकलिस्ट) हे एक शक्तिशाली साधन आहे ज्याचा तुम्ही झटपट उपयोग करू शकता तुमच्या स्वतःच्या मजबूतींचा आणि असुरक्षिततेचे मूल्यमापन करण्यासाठी जेव्हां गोष्ट येते असे शिष्य बनविण्याची जे गुणात्मक रीतीने वाढतील.
समविचारी मदतगार गट - हा एक गट आहे ज्यामध्ये 3/3 गटांचे नेतृत्व आणि प्रारंभ करणारे लोक असतात. हा गट 3/3 स्वरूपाचे देखील अनुसरण करितो आणि हा तुमच्या क्षेत्रातील देवाच्या कार्याच्या आध्यात्मिक आरोग्याचे मूल्यांकन करण्याचा एक शक्तिशाली मार्ग आहे.

सराव

समविचारी मदतगार गट - दोन किंवा तीनच्या गटात विभाजित व्हा आणि आणि समविचारी मदतगार गट स्वरूपामध्ये कार्य करा. (60 मिनिटे)