बदकाच्या पिल्लू सारिखे शिष्यत्व - त्वरित पुढाकार करिताना

बदकाच्या पिल्लू सारिखे शिष्यत्व - त्वरित पुढाकार करिताना

This concept is called "बदकाच्या पिल्लू सारिखे शिष्यत्व - त्वरित पुढाकार करिताना" in session 4 of the Zúme Training

बदकाच्या पिल्लांचा शिष्य बनविण्याशी काय संबंध आहे हे तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही कधी बदकांच्या पिल्लांच्या गटाला बाहेर फिरताना पाहिला आहेका? बदकांची पिल्ले प्रत्यक्षात शिष्य बनविण्याचे एक महत्त्वाचे तत्त्व स्पष्ट करितात. जर तुम्हाला देवाचे कुटुंब खूप वाढलेले आणि विश्वासूपणात वाढलेले पाहूइच्छिता, तर पुढे बदकांच्या पिल्लूंसारिखे शिष्य बनविण्याचा विचार करा. अगदी एकाच वेळी अनुयायी आणि नेता व्हा.

हा व्हिडिओ पहा

तुम्ही जगात कुठेही असलात तरी ते नेहमी सारिखेच दिसतात. एक माता बदक नेतृत्व करिते आणि तिची पिल्ले एकामागोमाग एक - एका रांगेत चालतात. बदक माता नेतृत्व करिते. लहान बदके मागे येतात. पण जर तुम्ही आणखी जवळून पाहिले, तर तुम्हाला आणखी काहीतरी घडत असल्याचे दिसेल.

प्रत्येक लहान बदकाचे पिल्लू प्रत्यक्षात दोन भूमिका बजावित आहे - अगदी त्याच वेळी:

  1.     प्रत्येक लहान बदक एक अनुयायी आहे, कारण ते बदक मातेचे किंवा त्याच्या समोर चालत असलेल्या अन्य बदकाचे अनुसरण करित आहे.
  2.     आणि अगदी त्याच वेळी, प्रत्येक लहान बदकाचे पिल्लू एक नेता असते, कारण ते त्याच्या मागे चालत असलेल्या पिल्लाचे (किंवा पिल्लांचे) नेतृत्व करित असते.

तर मग हे बदकाचे पिल्लू अनुयायी आहे की नेता? हे दोन्ही आहे.

आणि म्हणूनच "फिरायला बाहेर पडलेल्या" बदकांचा शिष्य बनविण्याशी संबंध आहे. देवाची इच्छा आहे की त्याचे कुटुंब सुदूर वाढावे - आणि म्हणून प्रत्येकअनुयायाने नेता व्हावे, प्रत्येक विश्वासी व्यक्ती ने सामायिक करावे आणि प्रत्येक शिष्याने शिष्य बनवावे - अगदी त्याच वेळी.

शिष्य आणि शिष्य-निर्माते या नात्याने आपण ज्या सापळ्यात फसतो त्यापैकी एक म्हणजे आपण काहीही सामायिक करण्यापूर्वी आपल्याला सर्वकाही किंवाअगदी बर्‍याच गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत हा खोटा विश्वास आहे. परंतु शिष्यत्व अशा रीतीने कार्य करीत नाही.

शिष्य बदकाच्या पिल्लांसारिखे सारिखे असतात. नेता होण्यासाठी, त्यांना सर्व काही माहित असणे आवश्यक नाही. त्यांनी फक्त एक पाऊल पुढे असलेपाहिजे. देवाची इच्छा आहे की त्याच्या कुटुंबाने विश्वासूपणात वाढावे - आणि म्हणून प्रत्येक नेत्याने अनुयायी व्हावे, प्रत्येक सामायिक करणाऱ्याने विश्वासीव्हावे आणि प्रत्येक शिष्य-निर्मात्याने शिष्य व्हावे अशी तो अपेक्षा करितो - अगदी त्याच वेळी.

शिष्य आणि शिष्य-निर्माते या नात्याने आपण आणखी एका सापळ्यात पडतो, तो हा खोटा विश्वास आहे की एखाद्याला, कुठेतरी सर्व काही माहित आहे आणिजर आपण त्यांना शोधून त्यांचे अनुसरण केले तर आपण तयार आहोत. पण शिष्यत्व कसे कार्य करते असे नाही. परंतु शिष्यत्व अशा रीतीने ही कार्य करीतनाही.

देवाच्या राज्यात, फक्त एक "माता बदक" आहे ज्याचे आपण सर्व अनुसरण करितो -- आणि तो येशू ख्रिस्त आहे.

कोणताही मिशनरी नाही. कोणताही पास्टर नाही. कोणताही सेमिनरीचा प्राध्यापक नाही. केवळ येशूच आपल्या विश्वासाच्या पूर्ण मापासाठी पात्र आहे. बाकीआपण  सर्व "प्रक्रियेत" आहोत.

नेहमी येशूच्या जवळ कोणीतरी असेल ज्याचे आपण अनुसरण करू शकतो. आणि नेहमी कोणीतरी लांब असेल ज्याचे आपण नेतृत्व करू शकतो. परंतु आपलीस्थिती काहीही असो, आपले डोळे - आणि आपले हृदय - नेहमी येशूवर पूर्णपणे स्थिर असले पाहिजे.

बायबलमध्ये, पौल, ज्याने नवीन कराराचा बराचसा भाग लिहिला आणि अनेक सुरुवातीचे चर्च सुरू केले, त्याने फक्त असे लिहिले नाही - "माझे अनुकरणकरा." त्याने लिहिले, “जसा मी ख्रिस्ताचे अनुकरण करणारा आहे, तसे तुम्हीही माझे अनुकरण करणारे व्हा.” पौल जाणून होता की सर्वत्र बदकाच्या पिल्लांनाकाय माहित आहे आणि प्रत्येक शिष्याला देखील काय माहित असले पाहिजे - देवाच्या राज्यातील प्रत्येक नेत्याला अनुयायी असणे आवश्यक आहे - आणिआपण सर्वजण येशूचे अनुसरण करितो.

बायबलमध्ये, पौलाने असेही लिहिले: "ज्या गोष्टी तू पुष्कळ साक्षीदारांसमक्ष माझ्या-पासून ऐकल्या, त्या इतरांना शिकविण्यास योग्य अशा विश्वासू माणसांनासोपवून दे."

पौल जाणून होता की सर्वत्र बदकाच्या पिल्लांना काय माहित आहे आणि प्रत्येक शिष्याला देखील काय माहित असले पाहिजे. देवाच्या राज्यातील प्रत्येकअनुयायाला एक नेता (पुढारी) असणे आवश्यक आहे - आणि आपण सर्वांनी येशूसारिखे नेतृत्व केले पाहिजे, इतरांसाठी आपले जीवन अर्पण करीत असताना.

जर तुम्हाला देवाचे कुटुंब सुदूर वाढलेले आणि विश्वासूपणात वाढलेले पाहायचे असेल, तर बदकाच्या पिल्लांप्रमाणे शिष्य बनविण्याचा विचार करा - अगदीएकाच वेळी एक अनुयायी आणि नेता (पुढारी) बना.

स्व: तालाच विचारा

  •     शिष्यत्वाचे एक क्षेत्र कोणते आहे (बायबल वाचणे / समजणे, प्रार्थना करणे, परमेश्वराची गोष्ट सांगणे .) ज्याबद्दल तुम्ही अधिक जाणून घेऊ इच्छितआहात? कोण आहे जो तुम्हाला शिकण्यास मदत करू शकेल?
  •     शिष्यत्वाचे एक क्षेत्र कोणते आहे जे तुम्हाला वाटते की तुम्ही इतरांसह सामायिक करू शकाल? तो कोण आहे ज्याबरोबर तुम्ही सामायिक करूशकता

आपण गमावत आहात. आताच नोंदणी करा!

  • तुमच्या वैयक्तिक प्रशिक्षण प्रगतीचा मागोवा घ्या
  • गट नियोजन साधनांची हाताळणी करा
  • प्रशिक्षकाशी संपर्क साधा
  • जागतिक दूरदृष्टी मध्ये तुमचा प्रयत्न शामिल करा!

मूलभूत शिष्य-निर्मिती आणि साधारण चर्च रोपणीच्या गुणात्मक वाढीची तत्त्वे, प्रक्रिया आणि पद्धतींमध्ये सहभागींना सुसज्ज करण्यासाठी झुमे ऑनलाइन प्रशिक्षण मंच वापरतो.

संपूर्ण प्रशिक्षण पहा


मोठ्या झुमे दूरदृष्टीचा (विजन) भाग म्हणून झुमे प्रशिक्षण विनामूल्य दिले जात आहे.

झुमे दूरदृष्टी (विजन) बद्दल अधिक जाणून घ्या

Loading...

इंग्रजी


English English
العربية Arabic
العربية - الأردن Arabic (JO)
Sign Language American Sign Language
भोजपुरी Bhojpuri
বাংলা Bengali (India)
Bosanski Bosnian
粵語 (繁體) Cantonese (Traditional)
Hrvatski Croatian
فارسی Farsi/Persian
Français French
Deutsch German
ગુજરાતી Gujarati
Hausa Hausa
हिंदी Hindi
Bahasa Indonesia Indonesian
Italiano Italian
ಕನ್ನಡ Kannada
한국어 Korean
کوردی Kurdish
ພາສາລາວ Lao
𑒧𑒻𑒟𑒱𑒪𑒲 Maithili
國語(繁體) Mandarin (Traditional)
国语(简体) Mandarin (Simplified)
मराठी Marathi
മലയാളം Malayalam
नेपाली Nepali
ଓଡ଼ିଆ Oriya
Apagibete Panjabi
Português Portuguese
русский Russian
Română Romanian
Slovenščina Slovenian
Español Spanish
Soomaaliga Somali
Kiswahili Swahili
தமிழ் Tamil
తెలుగు Telugu
ไทย Thai
Türkçe Turkish
اُردُو Urdu
Tiếng Việt Vietnamese
Yorùbá Yoruba
More languages in progress