BLESS (बी.एल.इ.एस.एस) प्रार्थना नमुना
BLESS प्रार्थना नमुना द्वारे तुम्हाला पाच पद्धती प्राप्त होतात ज्याद्वारे तुम्ही तुम्हाला केव्हाही भेटणाऱ्या, परंतु विशेषतः प्रार्थना वाटचाल करिताना भेटणाऱ्यालोकांसाठी प्रार्थना करू शकता.
तुम्ही चालत असताना आणि प्रार्थना करित असताना, संधींसाठी जागरूक राहा आणि वाटेत भेटणाऱ्या व्यक्ती आणि गटांसाठी प्रार्थना करण्यासाठी देवाच्याआत्म्याने केलेल्या सूचना ऐका.
तुम्ही म्हणू शकता, "आम्ही या समुदायासाठी प्रार्थना करित आहोत, काहीतरी असे आहे का ज्याबद्दल आम्ही तुमच्यासाठी काही विशेष प्रार्थना करू शकतो?" किंवा म्हणा, “मी या क्षेत्रासाठी प्रार्थना करित आहे. तुम्हाला असे काही माहित आहे का ज्याबद्दल आम्ही विशेषत: प्रार्थना करू शकतो?” त्यांचा प्रतिसादऐकल्यानंतर तुम्ही त्यांच्या स्वतःच्या गरजा विचारू शकता. जर ते सामायिक करितात (सांगतात) तर लगेच त्यांच्यासाठी प्रार्थना करा. जर प्रभु मार्गदर्शन करितआहे, तर तुम्ही इतर गरजांबद्दल देखील प्रार्थना करू शकता.
B.L.E.S.S शब्दाचा उपयोग करा 5 वेगवेगळ्या पद्धतींनी तुम्ही जशी प्रार्थना करू शकता ते लक्षात ठेविण्यासाठी:
- Body शरीर - आरोग्य
- Labor श्रम - नोकरी आणि वित्त
- Emotional भावनिक - मनोबल
- Social सामाजिक - नातेसंबंध
- Spiritual आध्यात्मिक - देवाला अधिक जाणून घेणे आणि त्यावर अधिक प्रेम करणे
बहुतेक वेळी, तुम्ही काळजीने प्रार्थना करित आहात म्हणून लोक कृतज्ञ असतात.
जर ती व्यक्ती ख्रिस्ती नसेल, तर तुमची प्रार्थना आध्यात्मिक संभाषणासाठी आणि तुमची गोष्ट व देवाची गोष्ट सांगण्याच्या संधीसाठी दार उघडू शकते. तुम्हीत्यांना बायबल अध्ययनाचा भाग होण्यासाठी आमंत्रित करू शकता किंवा त्यांच्या घरी देखील बायबल अध्ययन आयोजित करू शकता.
जर ती व्यक्ती ख्रिस्ती असेल तर तुम्ही त्यांना तुमच्या प्रार्थना वाटचालीमध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित करू शकता किंवा त्यांना प्रशिक्षित करू शकता की तेकशा प्रकारे प्रार्थना वाटचाल करू शकतात व सोप्या चरणांचा उपयोग करू शकतात प्रभाव असलेल्या क्षेत्रांसाठी प्रार्थना करण्यास किंवा B.L.E.S.S. प्रार्थनेद्वारे देवाचे कुटुंब आणखी वाढविण्यास.
स्व: तालाच विचारा
- अनोळखी लोकांसाठी प्रार्थना करण्यास विचारण्यासाठी तुम्हाला कोणती भीती वाटते? देव तुम्हाला काय सांगेल जेणेकरून तुमची भीती दूर होईल?
- एखाद्या व्यक्तीसाठी, अगदी अनोळखी व्यक्तीसाठी ही प्रार्थना करण्याची जोखीम पत्करल्यास कोणत्या चांगल्या गोष्टी घडू शकतात?
आपण गमावत आहात. आताच नोंदणी करा!
- तुमच्या वैयक्तिक प्रशिक्षण प्रगतीचा मागोवा घ्या
- गट नियोजन साधनांची हाताळणी करा
- प्रशिक्षकाशी संपर्क साधा
- जागतिक दूरदृष्टी मध्ये तुमचा प्रयत्न शामिल करा!
मूलभूत शिष्य-निर्मिती आणि साधारण चर्च रोपणीच्या गुणात्मक वाढीची तत्त्वे, प्रक्रिया आणि पद्धतींमध्ये सहभागींना सुसज्ज करण्यासाठी झुमे ऑनलाइन प्रशिक्षण मंच वापरतो.
मोठ्या झुमे दूरदृष्टीचा (विजन) भाग म्हणून झुमे प्रशिक्षण विनामूल्य दिले जात आहे.