Zúme प्रशिक्षणास प्रारंभ करा
काही मित्र एकत्र करा किंवा विद्यमान लहान गटासह कोर्स करा. तुमचा स्वतःचा प्रशिक्षण गट तयार करा आणि तुमच्या प्रगतीचा मागोवा घ्या.
जेव्हा कोणी येशूचे अनुसरण करण्याचे ठरवितो, तेव्हा तुम्ही त्यांना योग्य मार्गावर जाण्यास कशी मदत करिता? सर्वात मोठ्या आशिर्वादावर दृष्टिक्षेप टाकणाऱ्या दर्शनापासून (व्हिजन) सुरुवात करा ज्याचा ते येशूचे अनुयायी म्हणून अनुभव करू शकतात. त्यांच्यासोबत हे सामायिक करण्याचा विचार करा:
येशूचे अनुसरण करणे हा एक आशीर्वाद आहे. इतरांना येशूचे अनुसरण करण्यास मार्गदर्शन करणे हा एक मोठा आशीर्वाद आहे. नवीन आध्यात्मिक कुटुंब सुरू करणे हा एक खूप मोठा आशीर्वाद आहे. नवीन आध्यात्मिक कुटुंबे सुरू करण्यासाठी इतरांना सुसज्ज करणे हा सर्वात मोठा आशीर्वाद आहे.
एखाद्या व्यक्तीने ख्रिस्ताचे अनुसरण करण्याचा निर्णय घेतल्यावर अशा लोकांना प्रशिक्षण देणे सुरू करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे, जेणेकरून ते यापैकी काही तत्त्वे लागू करण्यास योग्य मार्गावर पुढे वाढण्यास सुरू होऊ शकतील.
प्रथम, त्यांची संपर्क माहिती मिळवा आणि नंतर त्यांना सांगा: “प्रभूचे अनुसरण करणे हा एक आशीर्वाद आहे. इतरांना प्रभूचे अनुसरण करण्यास मार्गदर्शन करणे हा एक मोठा आशीर्वाद आहे. नवीन आध्यात्मिक कुटुंब सुरू करणे हा एक खूप मोठा आशीर्वाद आहे. नवीन आध्यात्मिक कुटुंबे सुरू करण्यासाठी इतरांना सुसज्ज करणे हा सर्वात मोठा आशीर्वाद आहे. मी तुम्हाला मोठा आशीर्वाद, खूप मोठा आशीर्वाद आणि सर्वात मोठा आशीर्वाद मिळण्यास मदत करू इच्छितो.
तुमच्या ओळखीच्या 100 लोकांची यादी बनवा आणि त्यापैकी पाच लोकांना निवडा (जे प्रभूला ओळखत नाहीत) ज्यांच्या सोबत आत्ताच तुम्ही ही गोष्ट सामायिक करू इच्छिता.” मग, त्यांची यादी तयार झाल्यावर, त्यांची साक्ष आणि सुवार्ता सांगण्यासाठी त्यांना सुसज्ज करा.
त्यांनी निवडलेल्या पाच लोकांपैकी प्रत्येकासाठी एकदा, पाच वेळा सराव करा. ते सराव करित असताना त्यांनी निवडिलेल्या लोकांची भूमिका साकारा.
त्यानंतर, त्यांना भेटण्यासाठी वेळ नियुक्त करा, सहसा दोन दिवसानंतर. त्या वेळी ते तुम्हाला सांगू शकतात की जेव्हा त्यांनी सुवार्ता सांगितली तेव्हा काय-काय घडले होते. जर ते भेटण्यास येऊ शकले नाहीत तर तुमच्याकडे त्यांची संपर्क माहिती आहे. दोन दिवसांनी त्यांना पुन्हा भेटा. जर त्यांनी सामायिक केले नसेल (सुवार्ता सांगितली नसेल) तर त्यांना नवीन काहीही सांगू नका. सामायिक करण्यासाठी त्यांच्यासोबत जाण्याची तयारी दाखवा. त्यांच्यासोबत अधिक सराव करण्याची तयारी दाखवा. त्यांना इतरांसह सामायिक करण्यास प्रारंभ करण्यासाठी जे काही करता येईल ते करा. तथापि, ही व्यक्ती "चांगली माती" नाही, असा तुम्हाला संशय वाटू लागेल आणि तसे असल्यास, तुम्ही त्या लोकांवर अधिक गुंतवणूक करणार नाही. जर त्यांनी सामायिक केले (सांगितले) असेल परंतु कोणीही विश्वास ठेविला नसेल, तर आनंदी रहा! त्यांच्याशी बाप्तिस्म्याबद्दल बोलण्यास सुरुवात करा आणि त्यांना शिष्य बनविण्याच्या साधनांपैकी एकाची ओळख करून द्या.
त्यांच्या 100 च्या यादीतून काही अतिरिक्त लोक निवडा जेणेकरुन त्यांच्याशी ते सामायिक करू शकतील आणि आवश्यकतेनुसार सराव करू शकतील. जर त्यांनी सामायिक केले असेल आणि काहींनी विश्वास ठेविला असेल परंतु ते त्यांना सर्वात मोठ्या आशीर्वादाबद्दल सांगण्यास अयशस्वी झाले असतील, तर त्यांच्याबरोबर आनंद करा, पुनरावलोकन करा आणि प्रक्रिया सुरू ठेविण्यासाठी त्यांना त्या लोकांकडे परत पाठवा.
जर त्यांनी सामायिक केले असेल आणि काहींनी विश्वास ठेविला असेल आणि त्यांनी त्यांना सर्वात मोठ्या आशीर्वादाबद्दल सांगितले असेल, तर खूप उत्साहित व्हा! ते बहुधा "चांगली माती" आहेत असे गृहीत धरा आणि त्यांच्या आध्यात्मिक विकासात लक्षणीय गुंतवणूक करण्याची योजना बनवा. बाप्तिस्म्याबद्दल बोलणे सुरू करा आणि त्यांना 3/3 गटाच्या स्वरूपाशी ओळख करून द्या आणि त्यांच्यासाठी ते स्वतः करा (मॉडेल करा) जेणेकरून ते त्या लोकांसोबत एक गट सुरू करू शकतील ज्यांना त्यांनी प्रभुकडे आणिले आहे.
काही मित्र एकत्र करा किंवा विद्यमान लहान गटासह कोर्स करा. तुमचा स्वतःचा प्रशिक्षण गट तयार करा आणि तुमच्या प्रगतीचा मागोवा घ्या.