भाषा


English English
العربية Arabic
العربية - الأردن Arabic (Jordanian)
العربية التونسية Arabic (Tunisian)
Armenian Armenian
Sign Language American Sign Language
বাংলা Bengali (India)
भोजपुरी Bhojpuri
Bosanski Bosnian
中文(繁體,香港) Cantonese (Traditional)
中文(简体) Chinese (Simplified)
中文(繁體) Chinese (Traditional)
Hrvatski Croatian
Français French
Deutsch German
ગુજરાતી Gujarati
Hausa Hausa
हिन्दी Hindi
Bahasa Indonesia Indonesian
Italiano Italian
ಕನ್ನಡ Kannada
한국어 Korean
کوردی Kurdish
ພາສາລາວ Lao
𑒧𑒻𑒟𑒱𑒪𑒲 Maithili
മലയാളം Malayalam
मराठी Marathi
नेपाली Nepali
ଓଡ଼ିଆ Oriya
فارسی Persian/Farsi
Polski Polish
Português Portuguese
ਪੰਜਾਬੀ Punjabi
Русский Russian
Română Romanian
Slovenščina Slovenian
Soomaali Somali
Español Spanish
Kiswahili Swahili
தமிழ் Tamil
తెలుగు Telugu
ไทย Thai
Türkçe Turkish
اردو Urdu
Tiếng Việt Vietnamese
Yorùbá Yoruba

परिपक्व होणाऱ्या शिष्यांसाठी प्रशिक्षण चक्र

अध्यात्मिक वाढीच्या चार वेगळ्या टप्यांद्वारे शिष्यांना परिपक्व करण्यासाठी प्रशिक्षण चक्र वापरले जाते. 

टप्यांमध्ये हे समाविष्ट आहे: स्वतः करणे, मदत करणे, पाहणे आणि सोडून देणे.

प्रशिक्षण चक्र शिष्याला नवख्या व्यक्ती पासून कौशल्यापर्यंत किंवा तज्ञतेपर्यंत घेऊन जाते आणि त्यांची क्षमता तोपर्यंत वाढविते जोपर्यंत त्यांना या कौशल्याच्या प्रशिक्षणाची आवश्यकता नसते. बरेच शिष्य आणि शिष्य-निर्माते प्रशिक्षण चक्राच्या सुरुवातीच्या टप्प्यात अडकतात (स्वतः करणे, मदत करणे), ते तिसर्‍या टप्यामध्ये पुरेसा वेळ घालवित नाहीत (पाहणे), आणि चौथ्या टप्यामध्ये (सोडून देणे) जवळजवळ कधीच पोहोंचत नाहीत.

हा व्हिडिओ पहा

प्रशिक्षण चक्र असे कार्य करते:

प्रशिक्षण चक्र काय आहे? याबद्दल असा विचार करा. तुम्ही कधी सायकल कशी चालवायची हे शिकलात का? तुम्ही कधी दुसऱ्याला शिकायला मदत केली आहे का? तसे असल्यास, शक्यता आहे की तुम्हाला प्रशिक्षण चक्र आधीच अनुभवाने माहीत असेल.

स्वतः करणे (नमुना)

स्वतः करणे म्हणजे फक्त सराव किंवा साधनाचे उदाहरण देणे आहे. हा प्रशिक्षण चक्राचा सर्वात संक्षिप्त भाग आहे. हे सहसा एकदाच करावे लागते. हे फक्त एक सराव किंवा साधन अस्तित्वात असल्याची जाणीव निर्माण करणे आहे आणि ते कसे दिसून येते याची सामान्य कल्पना देणे आहे. एखाद्याला सुसज्ज करण्यासाठी वारंवार गोष्टींना स्वतः करणे करणे हा एक प्रभावी मार्ग नाही. त्यांना स्वतः कौशल्य आजमावण्याची परवानगी दिली पाहिजे. जेव्हा एखादे लहान मूल एखाद्याला सायकल चालविताना पाहते, तेव्हा तो स्वतः करणे टप्पा असतो.

मदत करणे 

मदत करणे म्हणजे शिकणाऱ्याला कौशल्याचा सराव करण्यास अनुमती देणे आहे. स्वतः करणे टप्प्यापेक्षा हा टप्पा अधिक वेळ घेतो. यासाठी मार्गदर्शकाने "हात धरून राहणे" आवश्यक आहे. मार्गदर्शकाने शिकणाऱ्याला प्रशिक्षण देण्यासाठी निर्देशन दिले पाहिजे आणि सक्रिय भूमिका निभावली पाहिजे. हा टप्पा जोपर्यंत शिकणारा व्यक्ती पूर्णत: सक्षम होत नाही तोपर्यंत चालत राहत नाही, तर केवळ त्या व्यक्तीला कौशल्याची मूलभूत माहिती समजेपर्यंत असतो. जर हा टप्पा बराच काळ चालू ठेविला, तर शिकणारा व्यक्ती मार्गदर्शकावर अवलंबून राहण्यास शिकेल आणि पूर्ण क्षमतेपर्यंत कधीही प्रगती करू शकणार नाही. मदत करणे टप्प्याचा शेवट शिकणार्‍याने इतरांसाठी स्वतः करणे बनण्यास प्रारंभ केल्याने चिन्हांकित केला जातो. जेव्हा एखादा मुलगा त्याचा तोल सांभाळायला शिकत असताना त्याचे पालक सायकल पकडून ठेवीत असतात, तेव्हा तो मदत करणे टप्पा असतो.

पाहणे (देखरेख)

पाहणे हा सर्वात मोठा टप्पा आहे. यात शिकणाऱ्याशी अधिक अप्रत्यक्ष संपर्क येतो. हे कौशल्याच्या सर्व पैलूंमध्ये पूर्ण क्षमता विकसित करण्याचा प्रयत्न करिते. पहिले दोन टप्पे एकत्र केले तरी हा टप्पा त्यांच्या दहापट किंवा त्याहून अधिक मोठा असू शकतो. जसजसा शिकणारा व्यक्ती कौशल्यात प्रगती करितो तसतसा मार्गदर्शकाशी त्याचा संपर्क कमी होत जातो आणि अधिक तदर्थ होऊ लागतो. या टप्प्यात शिकणारा हळूहळू कौशल्याच्या कामगिरीमध्ये अधिक जबाबदारी आणि पुढाकार घेतो. सामान्यत: शिष्य बनविताना या टप्प्याच्या समाप्तीची खूण तेव्हा असते जेव्हा शिकणार्‍याने ज्यांना तो प्रशिक्षण देत आहे (मुलगा असो किंवा मुलगी) त्यांच्याद्वारे चौथ्या पिढीपर्यंत हे कौशल्य यशस्वीपणे पोहोंचते. जेव्हा पालक एखाद्या लहान मुलाला सायकल चालविताना पाहत असतात आणि त्यांच्याकडे पर्यवेक्षणाशिवाय सायकल चालविण्याची पुरेशी कौशल्ये आणि ज्ञान असल्याची खात्री करितात, तेव्हा हा पाहणे टप्पा आहे.

सोडून देणे (मोकळीक देणे)

जेव्हा शिकणारा मार्गदर्शकाचा समवयस्क बनतो तेव्हा सोडून देणे हा एक प्रकारचा पदवी धारण करण्यासारिखा टप्पा असतो. शिकणारा आणि मार्गदर्शक एकाच नेटवर्कमध्ये असल्यास नियतकालिक संपर्क आणि समवयस्क मार्गदर्शन (समविचारी मदत) चालू राहू शकते. जेव्हा पालक एखाद्या मुलाला त्यांची सायकल पूर्णपणे पर्यवेक्षणाशिवाय चालवायला देऊन टाकितात, तेव्हा तो सोडून देणे टप्पा असतो.

शिष्यांच्या प्रगतीचा मागोवा घेण्यास प्रशिक्षण चक्र वापरण्याच्या उदाहरणासाठी शिष्य बनविण्याची मदतीची नोंदयादी (कोचिंग चेकलिस्ट) देखील पहा.

स्व: तालाच विचारा

Zúme प्रशिक्षणास प्रारंभ करा

काही मित्र एकत्र करा किंवा विद्यमान लहान गटासह कोर्स करा. तुमचा स्वतःचा प्रशिक्षण गट तयार करा आणि तुमच्या प्रगतीचा मागोवा घ्या.