Zúme प्रशिक्षणास प्रारंभ करा
काही मित्र एकत्र करा किंवा विद्यमान लहान गटासह कोर्स करा. तुमचा स्वतःचा प्रशिक्षण गट तयार करा आणि तुमच्या प्रगतीचा मागोवा घ्या.
देव आपल्याला त्याच्या राज्याच्या अर्थव्यवस्थेत दाखवितो की आपल्याला जे मिळते त्यावरून नव्हे - तर आपण जे देतो त्यावरून आपणांस प्रतिफळ मिळते. जेव्हा आपण प्रभुने आपल्याशी सामायिक केलेल्या गोष्टींचे आज्ञापालन करण्यास आणि त्या सामायिक करण्यास विश्वासू असतो, तेव्हा तो आणखी सामायिक करण्याचे वचन देतो. येशू म्हणाला - जो अगदी थोडक्याविषयी विश्वासू तो पुष्कळांविषयीही विश्वासू आहे. देवाने आपल्याला उत्पन्न केले आहे ती सखोल अंतर्दृष्टी, अधिक जवळीक आणि विपुल जीवन जगण्याचा हा मार्ग आहे. या प्रकारे आपण देवाने आपल्याला पूर्ण करण्यासाठी आधीच योजलेल्या चांगल्या कामांमध्ये चालत राहू शकतो.
राज्याच्या अर्थव्यवस्थेत, आपण जे देतो त्याचाच फायदा आपल्याला होतो. हा आध्यात्मिक श्वासाचा पाया आहे. जेव्हा आपण प्रभू आपल्याला जे काही सांगतो त्याचे आज्ञापालन करण्यास आणि ते इतरांना सांगण्यास विश्वासू असतो, तेव्हा तो आपल्याशी अधिक स्पष्टपणे आणि पूर्णपणे संवाद साधेल. हा सखोल अंतर्दृष्टी, देवाशी अधिक जवळीक आणि त्याने आपल्यासाठी योजलेले विपुल जीवन जगण्याचा मार्ग आहे. या मार्गाने आपण त्या चांगल्या कृत्यांमध्ये चालू शकतो जे देवाने आपल्यासाठी आधीच योजून ठेविलेले आहेत. याचा अर्थ ख्रिस्ताच्या शरीरात (चर्च) आपण एकमेकांसाठी सर्वात प्रेमळ गोष्ट जी करू शकतो ती म्हणजे दुहेरी जबाबदारीचा सराव करणे आहे. म्हणजेच, आपण जबाबदार आहोत त्या गोष्टींचे आज्ञापालन करण्यास आणि त्या पार पाडण्यास ज्या प्रभू आपल्याला प्रकट करितो, त्या पूर्ण करण्यास व त्या शिकविण्यास; त्यांचा सराव करण्यास व इतरांसोबत त्या सामायिक (शेअर) करण्यास. राज्याच्या अर्थव्यवस्थेनुसार जगणे हा शिष्य होण्याचा एक प्रमुख भाग आहे. एक आशीर्वाद म्हणून आपण आशीर्वादित (धन्य) झालो आहोत. आपण अनुयायी आणि पुढारी आहोत. आपण शिकणारे आणि शिक्षक आहोत. अशा प्रकारे आपण देवाच्या नेतृत्वाचे सर्वोत्तम कारभारीपण करू शकतो. आपण राज्यात प्रवेश करताच ही प्रक्रिया सुरू झाली पाहिजे. अशा प्रकारे सेवा करण्यास सुरुवात करण्यासाठी आपण “प्रौढ” होईपर्यंत प्रतीक्षा करू नये. त्याऐवजी, अशा प्रकारे सेवा करून आपण प्रौढ बनतो. आपण श्वास आत घेतो आणि देवाकडून ऐकतो. आपण श्वास बाहेर सोडतो आणि आपण जे ऐकले आहे त्याचे पालन करितो व ते इतरांसह सामायिक करितो.
काही मित्र एकत्र करा किंवा विद्यमान लहान गटासह कोर्स करा. तुमचा स्वतःचा प्रशिक्षण गट तयार करा आणि तुमच्या प्रगतीचा मागोवा घ्या.