भाषा


English English
العربية Arabic
العربية - الأردن Arabic (Jordanian)
العربية التونسية Arabic (Tunisian)
Armenian Armenian
Sign Language American Sign Language
বাংলা Bengali (India)
भोजपुरी Bhojpuri
Bosanski Bosnian
中文(繁體,香港) Cantonese (Traditional)
中文(简体) Chinese (Simplified)
中文(繁體) Chinese (Traditional)
Hrvatski Croatian
Français French
Deutsch German
ગુજરાતી Gujarati
Hausa Hausa
हिन्दी Hindi
Bahasa Indonesia Indonesian
Italiano Italian
ಕನ್ನಡ Kannada
한국어 Korean
کوردی Kurdish
ພາສາລາວ Lao
𑒧𑒻𑒟𑒱𑒪𑒲 Maithili
മലയാളം Malayalam
मराठी Marathi
नेपाली Nepali
ଓଡ଼ିଆ Oriya
فارسی Persian/Farsi
Polski Polish
Português Portuguese
ਪੰਜਾਬੀ Punjabi
Русский Russian
Română Romanian
Slovenščina Slovenian
Soomaali Somali
Español Spanish
Kiswahili Swahili
தமிழ் Tamil
తెలుగు Telugu
ไทย Thai
Türkçe Turkish
اردو Urdu
Tiếng Việt Vietnamese
Yorùbá Yoruba

सुवार्ता आणि ती इतरांना कशी सांगावी

देवाची गोष्ट सांगण्याचे (सामायिक करण्याचे) अनेक मार्ग आहेत. सर्वोत्तम मार्ग तुम्ही ज्या व्यक्तीला गोष्ट सांगणार आहात त्यावर आणि जगाबद्दलचा व त्यांच्या जीवन अनुभवांचा त्यांचा दृष्टिकोन यावर अवलंबून असेल. देव ऐकण्यास इच्छुक असलेल्या अंतःकरणामध्ये कार्य करण्यासाठी सामायिक करण्यास इच्छुक असलेल्या अंतःकरणाचा उपयोग करितो. देवाची गोष्ट सांगण्याचा (सामायिक करण्याचा) एक मार्ग म्हणजे देवाच्या उत्पत्तीपासून युगाच्या शेवटी त्याच्या न्यायापर्यंत काय घडले हे स्पष्ट रीतीने सांगणे होय.

हा व्हिडिओ पहा

देवाची गोष्ट: उत्पत्ती ते  न्यायाची शैली पर्यंत

प्रारंभी देवाने संपूर्ण जग आणि त्यातील प्रत्येक गोष्ट उत्पन्न केली.

त्याने पहिला पुरुष आणि पहिली स्त्री उत्पन्न केली. देवाने त्यांना एका सुंदर बागेत ठेविले. त्याने त्यांना त्याच्या कुटुंबाचा एक भाग बनविले आणि त्यांच्याशी घनिष्ठ नातेसंबंध ठेविले.

सदा सर्वकाळ जिवंत राहण्यासाठी त्याने त्यांना उत्पन्न केले. मरण/मृत्यू असे काहीही तेव्हा नव्हते. अशा ह्या परिपूर्ण ठिकाणी देखील, मनुष्याने देवाविरुद्ध बंड केले आणि ह्या जगात पाप आणि दुःखे आणिली. देवाने मनुष्याला बागेतून बाहेर काढून टाकले. मानव आणि देव यांच्यातील नातेसंबंध तुटून गेले. आता मानवाला मृत्यूला सामोरे जावे लागणार होते. अनेक शेकडो वर्षांपासून, देव जगात संदेष्टे पाठवित राहिला. त्यांनी मानवाला त्याच्या पापाची जाणीव करून दिली पण त्यांनी त्याला देवाच्या विश्वासूपणाबद्दल आणि देवाने जगात एक तारणारा पाठविण्याचे वचन दिले आहे हे देखील सांगितले. तो तारणारा,  देव आणि मानवामधील नातेसंबंध पुन्हा पूर्ववत करणार होता.

तो तारणारा मानवाची मरणापासून सुटका करणार होता. तो तारणारा मानवाला सार्वकालिक जीवन देणार होता आणि अनंत काळासाठी मानवासोबत राहणार होता. देव आपल्यावर एवढी प्रीती करितो की जेव्हा योग्य वेळ आली तेव्हा त्याने त्याच्या पुत्राला तो तारणारा होण्यासाठी जगात पाठविले.

येशू देवाचा पुत्र होता. त्याचा या जगात जन्म एका कुमारिकेपासून झाला होता. तो एक परिपूर्ण जीवन जगला. त्याने कधीही पाप केले नाही. येशूने लोकांना देवाबद्दल शिकविले. त्याने त्याचे महान सामर्थ्य दर्शविणारे अनेक चमत्कार केले. त्याने अनेक भुते काढली. त्याने अनेकांना बरे केले. त्याने आंधळ्यांना दृष्टी दिली. त्याने बहिऱ्यांना ऐकण्याची शक्ती दिली. त्याने लंगड्यांना चालविले. येशूने मेलेल्यांना ही उठविले. अनेक धार्मिक पुढारी भयभीत झाले आणि येशूचा मत्सर करू लागले.

ते त्याला मारून टाकू इच्छित होते. त्याने कधीही पाप केले नसल्यामुळे, येशूला मरण्याची गरज नव्हती.

पण त्याने आपल्या सर्वांसाठी बलिदान म्हणून मरण निवडीले. त्याच्या वेदनादायक मृत्यूने मानवजातीची पापे झाकून टाकली. यानंतर येशूला कबरेत पुरण्यात आले. येशूने केलेले बलिदान देवाने पाहिले आणि ते स्वीकारिले. तिसऱ्या दिवशी येशूला मेलेल्यांतून उठवून देवाने त्याची स्वीकृती दाखविली. 

देव म्हणाला की जर आपण आपल्या पापांसाठी येशूच्या बलिदानावर विश्वास ठेवितो आणि त्या बलिदानाचा स्वीकार करितो - जर आपण आपल्या पापांपासून दूर होतो आणि येशूचे अनुसरण करितो, तर देव आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करितो आणि त्याच्या कुटुंबात आपले स्वागत करितो.

देव पवित्र आत्मा पाठवितो जेणेकरून तो आपल्यामध्ये राहील आणि आपल्याला येशूचे अनुसरण करण्यास सक्षम बनवील. आपले पुन्हा स्थापित केलेले नाते दर्शविण्यासाठी आणि त्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी आपला पाण्यामध्ये बाप्तिस्मा होतो.

मृत्यूचे प्रतीक म्हणून आपण पाण्याखाली पुरले जातो. नवीन जीवनाचे प्रतीक म्हणून आपण येशूचे अनुसरण करण्यासाठी पाण्यातून बाहेर येतो.

जेव्हा येशू मेलेल्यांतून उठला तेव्हा त्याने पृथ्वीवर 40 दिवस घालविले.

येशूने त्याच्या अनुयायांना सर्वत्र जाण्यास आणि जगभरातील प्रत्येकाला त्याच्या तारणाची सुवार्ता सांगण्यास शिकविले. येशूने म्हटले -- तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य करा; त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या; जे काही मी तुम्हांला आज्ञापिले ते सर्व त्यांना पाळण्यास शिकवा; आणि पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.

त्यानंतर येशूला त्यांच्या डोळ्यांदेखत स्वर्गात वर घेतले गेले. एके दिवशी, येशू ज्या प्रकारे निघून गेला त्याच प्रकारे पुन्हा येईल. ज्यांनी त्याच्यावर प्रीती केली नाही आणि त्याचे आज्ञापालन केले नाही त्यांना तो सदा सर्वकाळासाठी दंड देईल. ज्यांनी त्याच्यावर प्रीती केली आणि त्याचे आज्ञापालन केले त्यांचा तो स्वीकार करील आणि त्यांना तो सदा सर्वकाळासाठी प्रतिफळ देईल. आपण त्याच्यासोबत नवीन स्वर्गात आणि नवीन पृथ्वीवर सदा सर्वकाळासाठी जीवन जगू.

येशूने माझ्या पापांसाठी केलेल्या बलिदानावर मी विश्वास ठेविला आहे आणि त्या बलिदानाचा मी स्वीकार केला आहे. देवाने मला शुद्ध केले आहे आणि त्याच्या कुटुंबाचा भाग म्हणून मला पुन्हा स्थापित केले आहे. तो माझ्यावर प्रीती करितो, आणि मी त्याच्यावर प्रीती करितो आणि मी त्याच्या राज्यात त्याच्यासोबत सदैव राहीन. देव तुमच्यावर प्रीती करितो आणि त्याची इच्छा आहे कि तुम्ही ही भेट स्वीकार करावी. तुम्हाला हे या क्षणी करायला आवडेल का?

जोपर्यंत तुम्हाला ही गोष्ट सांगण्यास सोयीस्कर वाटत नाही तोपर्यंत सुवार्तेच्या या सादरीकरणाचा स्वतः सराव करा.

स्व: तालाच विचारा

Zúme प्रशिक्षणास प्रारंभ करा

काही मित्र एकत्र करा किंवा विद्यमान लहान गटासह कोर्स करा. तुमचा स्वतःचा प्रशिक्षण गट तयार करा आणि तुमच्या प्रगतीचा मागोवा घ्या.