Zúme प्रशिक्षणास प्रारंभ करा
काही मित्र एकत्र करा किंवा विद्यमान लहान गटासह कोर्स करा. तुमचा स्वतःचा प्रशिक्षण गट तयार करा आणि तुमच्या प्रगतीचा मागोवा घ्या.
BLESS प्रार्थना नमुना द्वारे तुम्हाला पाच पद्धती प्राप्त होतात ज्याद्वारे तुम्ही तुम्हाला केव्हाही भेटणाऱ्या, परंतु विशेषतः प्रार्थना वाटचाल करिताना भेटणाऱ्या लोकांसाठी प्रार्थना करू शकता.
तुम्ही चालत असताना आणि प्रार्थना करित असताना, संधींसाठी जागरूक राहा आणि वाटेत भेटणाऱ्या व्यक्ती आणि गटांसाठी प्रार्थना करण्यासाठी देवाच्या आत्म्याने केलेल्या सूचना ऐका. तुम्ही म्हणू शकता, "आम्ही या समुदायासाठी प्रार्थना करित आहोत, काहीतरी असे आहे का ज्याबद्दल आम्ही तुमच्यासाठी काही विशेष प्रार्थना करू शकतो?" किंवा म्हणा, “मी या क्षेत्रासाठी प्रार्थना करित आहे. तुम्हाला असे काही माहित आहे का ज्याबद्दल आम्ही विशेषत: प्रार्थना करू शकतो?”
त्यांचा प्रतिसाद ऐकल्यानंतर तुम्ही त्यांच्या स्वतःच्या गरजा विचारू शकता. जर ते सामायिक करितात (सांगतात) तर लगेच त्यांच्यासाठी प्रार्थना करा. जर प्रभु मार्गदर्शन करित आहे, तर तुम्ही इतर गरजांबद्दल देखील प्रार्थना करू शकता. B.L.E.S.S शब्दाचा उपयोग करा 5 वेगवेगळ्या पद्धतींनी तुम्ही जशी प्रार्थना करू शकता ते लक्षात ठेविण्यासाठी:
बहुतेक वेळी, तुम्ही काळजीने प्रार्थना करित आहात म्हणून लोक कृतज्ञ असतात. जर ती व्यक्ती ख्रिस्ती नसेल, तर तुमची प्रार्थना आध्यात्मिक संभाषणासाठी आणि तुमची गोष्ट व देवाची गोष्ट सांगण्याच्या संधीसाठी दार उघडू शकते. तुम्ही त्यांना बायबल अध्ययनाचा भाग होण्यासाठी आमंत्रित करू शकता किंवा त्यांच्या घरी देखील बायबल अध्ययन आयोजित करू शकता.
जर ती व्यक्ती ख्रिस्ती असेल तर तुम्ही त्यांना तुमच्या प्रार्थना वाटचालीमध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित करू शकता किंवा त्यांना प्रशिक्षित करू शकता की ते कशा प्रकारे प्रार्थना वाटचाल करू शकतात व सोप्या चरणांचा उपयोग करू शकतात प्रभाव असलेल्या क्षेत्रांसाठी प्रार्थना करण्यास किंवा B.L.E.S.S. प्रार्थनेद्वारे देवाचे कुटुंब आणखी वाढविण्यास.
काही मित्र एकत्र करा किंवा विद्यमान लहान गटासह कोर्स करा. तुमचा स्वतःचा प्रशिक्षण गट तयार करा आणि तुमच्या प्रगतीचा मागोवा घ्या.