Zúme प्रशिक्षणास प्रारंभ करा
काही मित्र एकत्र करा किंवा विद्यमान लहान गटासह कोर्स करा. तुमचा स्वतःचा प्रशिक्षण गट तयार करा आणि तुमच्या प्रगतीचा मागोवा घ्या.
आध्यात्मिक श्वास म्हणजे देवाचे ऐकणे आणि त्याचे पालन करणे होय ... दिवसभर, दररोज.
देवाच्या राज्यामध्ये, जेव्हा आपण देवाकडून ऐकतो तेव्हा आपण श्वास आत घेतो:
येशूच्या प्रत्येक अनुयायासाठी चांगली बातमी ही आहे की जेव्हा आपण श्वास आत घेतो व देवाकडून ऐकतो आणि जेव्हा आपण श्वास बाहेर सोडतो व आपण जे ऐकतो त्याचे पालन करितो आणि जे ऐकले ते इतरांशी सामायिक करितो (इतरांना सांगतो) - तेव्हा देव आणखी स्पष्टपणे बोलेल.
देवाच्या राज्यात जेव्हा आपण देवाकडून जे ऐकतो त्यावर कार्य करितो तेव्हा आपण श्वास बाहेर सोडीत असतो. जेव्हा आपण आज्ञा पाळतो तेव्हा आपण श्वास बाहेर सोडीत आहोत. काहीवेळा आज्ञापालन करण्यासाठी श्वास बाहेर सोडणे म्हणजे आपले विचार, आपले शब्द किंवा आपली कृती बदलून त्यांना येशू आणि त्याच्या इच्छेनुसार संरेखित करणे होय. काहीवेळा आज्ञा पाळण्यासाठी श्वास बाहेर सोडणे म्हणजे येशूने आपल्याबरोबर जे सामायिक केले आहे ते सामायिक करणे होय - त्याने आपल्याला जे दिले ते देणे होय - जेणेकरून देव आपल्याला ज्या प्रकारे आशीर्वादित करित आहे त्या प्रमाणे इतरांनाही आशीर्वादित होता येईल. येशूच्या अनुयायांसाठी - हा श्वास आत घेणे आणि श्वास बाहेर सोडणे महत्वाचे आहे. ते आपले जीवन आहे.
काही मित्र एकत्र करा किंवा विद्यमान लहान गटासह कोर्स करा. तुमचा स्वतःचा प्रशिक्षण गट तयार करा आणि तुमच्या प्रगतीचा मागोवा घ्या.