Zúme प्रशिक्षणास प्रारंभ करा
काही मित्र एकत्र करा किंवा विद्यमान लहान गटासह कोर्स करा. तुमचा स्वतःचा प्रशिक्षण गट तयार करा आणि तुमच्या प्रगतीचा मागोवा घ्या.
येशूचे अनुयायी म्हणून आपण दररोज पवित्र शास्त्र वाचले पाहिजे. प्रत्येक आठवड्यात बायबलमधील किमान 25-30 अध्यायांचे वाचन करणे हे एक उत्तम मानक आहे. S.O.A.P.S. बायबल वाचन स्वरूपाचा उपयोग करीत असताना दैनिक जर्नल (रोजनिशी) बाळगण्याने तुम्हाला समजण्यास, आज्ञा पाळण्यास आणि आणखी गोष्टी सामायिक करण्यास मदत मिळेल. S.O.A.P.S. याचा अर्थ:
येशूचा कोणताही अनुयायी वापरू शकेल अशी प्रभावी बायबल अभ्यास पद्धत शिकण्याचा आणि लक्षात ठेविण्याचा हा एक सोपा मार्ग आहे.
S - “कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नाहीत; माझे मार्ग तुमचे मार्ग नाहीत, असे परमेश्वर म्हणतो. कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे, तसे माझे मार्ग तुमच्या मार्गांहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनांहून उंच आहेत.” यशया 55:8-9
O - एक मनुष्य म्हणून, मला जे माहित आहे आणि मी काय करावे याविषयी मला जे माहित आहे, यामध्ये मी मर्यादित आहे. देव कोणत्याही प्रकारे मर्यादित नाही. तो सर्व काही पाहतो आणि जाणतो. तो सर्व काही करू शकतो.
A – देवाला सर्व काही माहीत असल्याने आणि त्याचे मार्ग उत्तम असल्याने, मी गोष्टी पूर्ण करण्याच्या माझ्या स्वत:च्या पद्धतीवर अवलंबून न राहता त्याचे अनुसरण केल्यास मला जीवनात अधिक यश मिळेल.
P - हे परमेश्वरा, तुला प्रसन्न करणारे आणि इतरांना मदत करणारे चांगले जीवन कसे जगावे हे मला माहित नाही. माझे मार्ग चुकतात. माझे विचार दुःख देतात. त्याऐवजी कृपया मला तुझे मार्ग आणि तुझे विचार शिकव. मी तुझे अनुसरण करित असताना तुझ्या पवित्र आत्म्याला माझे मार्गदर्शन करू दे.
S – मी ही वचने आणि हा अनुप्रयोग (लागूकरण) माझा मित्र, स्टीव्ह याच्याशी सामायिक करेन (सांगेन), जो कठीण समयातून जात आहे आणि तो तोंड देत असलेल्या महत्त्वाच्या निर्णयांसाठी त्याला दिशा हवी आहे.
काही मित्र एकत्र करा किंवा विद्यमान लहान गटासह कोर्स करा. तुमचा स्वतःचा प्रशिक्षण गट तयार करा आणि तुमच्या प्रगतीचा मागोवा घ्या.