Zúme प्रशिक्षणास प्रारंभ करा
काही मित्र एकत्र करा किंवा विद्यमान लहान गटासह कोर्स करा. तुमचा स्वतःचा प्रशिक्षण गट तयार करा आणि तुमच्या प्रगतीचा मागोवा घ्या.
येशूने त्याच्या अनुयायांना सांगितले - "तुम्ही ह्या गोष्टींचे साक्षी आहात." प्रत्येकाकडे एक गोष्ट असते. तुमचा सराव करण्याची ही संधी आहे. येशूचे अनुयायी या नात्याने, आपणही “साक्षी” आहोत - येशूने आपल्या जीवनावर टाकलेल्या प्रभावाबद्दलची “साक्ष” देत आहोत. देवासोबतच्या तुमच्या नातेसंबंधाची तुमची गोष्ट याला तुमची साक्ष म्हणतात. प्रत्येकाकडे एक गोष्ट असते. तुमची साक्ष सामायिक करणे (सांगणे) ही तुमचा सराव करण्याची संधी आहे.
तुमच्या गोष्टीला आकार देण्याचे अंतहीन मार्ग आहेत, परंतु जे काही मार्ग चांगले यशस्वी ठरताना आम्ही पहिले ते येथे देत आहोत:
तुमची गोष्ट सांगताना, ती एक तीन भागांची प्रक्रिया आहे असे समजणे उपयुक्त आहे:
तुमची साक्ष परिणामकारक होण्यासाठी लांबलचक किंवा खूप तपशील देणारी असण्याची गरज नाही. खरं तर, तुमची गोष्ट सुमारे 3-मिनिटांत आवरली तर प्रश्न विचारण्यासाठी आणि सखोल संभाषणासाठी वेळ मिळेल. सुरुवात कशी करायची याबद्दल तुम्हाला काळजी वाटत असल्यास - ती सोपी असू द्या. देव तुमच्या गोष्टीचा उपयोग जीवन बदलण्यासाठी करू शकतो, पण लक्षात असू द्या की - तुम्हीच ती सांगू शकता.
काही मित्र एकत्र करा किंवा विद्यमान लहान गटासह कोर्स करा. तुमचा स्वतःचा प्रशिक्षण गट तयार करा आणि तुमच्या प्रगतीचा मागोवा घ्या.