Zúme प्रशिक्षणास प्रारंभ करा
काही मित्र एकत्र करा किंवा विद्यमान लहान गटासह कोर्स करा. तुमचा स्वतःचा प्रशिक्षण गट तयार करा आणि तुमच्या प्रगतीचा मागोवा घ्या.
ज्ञान आणि प्रशिक्षणापेक्षा विश्वासूपणा हे आध्यात्मिक परिपक्वतेचे खूप उत्तम माप आहे. आपण शिष्यांची गुणात्मक वाढ करीत असताना, आपण योग्य गोष्टी मोजत आहोत याची खात्री करू या. जर आपण जे ऐकतो त्याचे पालन केले आणि ते इतरांसोबत सामायिक केले तर आपण विश्वासू आहोत. जर आपण ऐकतो परंतु आपण त्याचे पालन करण्यास आणि ते सामायिक करण्यास नकार देतो तर आपण विश्वासघातकी आहोत.
अशा दोन कल्पना आहेत ज्यामुळे आज चर्चमध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.
पहिली कल्पना आहे की एखाद्याची आध्यात्मिक परिपक्वता त्यांना देवाच्या वचनाबद्दल किती माहिती आहे याच्याशी जोडलेली आहे. ते असे वागतात की जणू योग्य विश्वास - किंवा ऑर्थोडॉक्सी - एखाद्याच्या विश्वासाचे एक चांगले माप आहे.
दुसरी कल्पना आहे की एखाद्याच्या नेतृत्व करण्याच्या क्षमतेसाठी त्यांनी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी त्यांना "पूर्ण प्रशिक्षण" आवश्यक आहे. ते असे वागतात की जणू पूर्ण ज्ञान - एखाद्याच्या सेवा करण्याच्या क्षमतेचे एक चांगले माप आहे. पहिल्या कल्पनेची समस्या - ऑर्थोडॉक्सीवर अवलंबून राहणे - किंवा "योग्य विश्वास" ही आहे की सैतान, स्वतः, कोणत्याही मानवापेक्षा जास्त पवित्रशास्त्र जाणतो.
देवाचे वचन सांगते की - एकच देव आहे, असा विश्वास तू धरतोस काय? ते बरे करतोस; भुतेही तसाच विश्वास धरतात व थरथर कापतात. एखाद्याच्या अध्यात्मिक परिपक्वतेचे एक चांगले माप म्हणजे ऑर्थोप्रॅक्सी - "योग्य आचरण" आहे. केवळ आपल्याला माहित असलेल्या गोष्टींवर आधारित परिपक्वता मोजण्यापेक्षा आपण आज्ञापालन आणि सामायिकरणातील विश्वासूपणाबद्दल अधिक चिंतित असले पाहिजे.
दुसर्या कल्पनेतील समस्या - कोणीतरी नेतृत्व करण्यापूर्वी त्याला पूर्णपणे प्रशिक्षित असले पाहिजे - ही आहे कि कोणीही कधीही पूर्णपणे प्रशिक्षित नसतो. राज्यातील काही सर्वात महत्त्वाचे कार्य करण्यासाठी ज्यांना अजूनही अनेक गोष्टी शिकायच्या होत्या अशा तरुण नेत्यांना येशूने पाठविले होते. देवाचे वचन सांगते कि - येशूने बारा प्रेषितांना एकत्र बोलावून त्यांना सर्व भुते काढण्याचे व रोग बरे करण्याचे सामर्थ्य व अधिकार दिला.
आणि त्याने त्यांना देवाच्या राज्याची घोषणा करण्यास व रोग्यांना बरे करण्यास पाठविले. पेत्राने येशू हा तारणारकर्ता असल्याचा विश्वास व्यक्त करण्यापूर्वीच या लोकांना पाठविण्यात आले होते - ज्याला आपण विश्वासाची पहिली पायरी मानू शकतो. आणि पाठविल्यानंतरही येशूने पेत्राला अनेक वेळा चुकांबद्दल फटकारिले आणि पेत्राने त्या नंतरही येशूला पूर्णपणे नाकारिले. देवाच्या भावी राज्यात कोण श्रेष्ठ आणि प्रत्येकाची भूमिका कोणती असेल यावर इतर अनुयायांनी वाद घातला.
त्या सर्वांना अजून खूप काही शिकायचे होते पण येशूने त्यांना आधीच माहीत असलेल्या गोष्टी सांगून कार्य करण्यास पाठविले. विश्वासूपणा - ज्ञानापेक्षा अधिक - अशी गोष्ट आहे जी कोणीतरी येशूचे अनुसरण करण्यास सुरुवात केल्यावर लगेचच सुरू होऊ शकते.
परिपक्वता ही काळावर अवलंबून असते, परंतु शिष्याच्या जीवनातील कोणत्याही आणि प्रत्येक टप्प्यावर विश्वासूपणा प्रदर्शित केला जाऊ शकतो.
काही मित्र एकत्र करा किंवा विद्यमान लहान गटासह कोर्स करा. तुमचा स्वतःचा प्रशिक्षण गट तयार करा आणि तुमच्या प्रगतीचा मागोवा घ्या.