Zúme प्रशिक्षणास प्रारंभ करा
काही मित्र एकत्र करा किंवा विद्यमान लहान गटासह कोर्स करा. तुमचा स्वतःचा प्रशिक्षण गट तयार करा आणि तुमच्या प्रगतीचा मागोवा घ्या.
राज्य कुठे नाही हे पाहण्यासाठी प्रत्येक शिष्याला सज्ज असणे आवश्यक आहे. आपल्या आजूबाजूला अशी ठिकाणे आहेत जिथे देवाची इच्छा जशी स्वर्गात पूर्ण होते तशी पृथ्वीवर पूर्ण होत नाही. असे मोठे खिंडारे आहेत जिथे निराशा, वेदना, छळ, दुःख आणि मृत्यू देखील सामान्य, दैनंदिन जीवनाचा एक भाग आहे. आपण या पृथ्वीवर असताना राज्यासाठी आपल्या श्रमाद्वारे ती खिंडारे बुजवून टाकिली पाहिजेत.
राज्य कुठे नाही हे पाहण्यासाठी आपले डोळे उघडण्याद्वारे आणि आपल्या ओळखीच्या व अनोळखी लोकांपर्यंत पोहोंचण्याद्वारे, शिष्यांची गुणात्मक रीतीने वाढ होते आणि देवाचे राज्य सुदूर व वेगाने वाढते.
पृथ्वीवर देवाची इच्छा पूर्णपणे पूर्ण होणे आणि सध्या अस्तित्वात असलेली परिस्थिती यामधील खिंडारे आपल्याला पाहण्याची गरज आहे. हे दोन क्षेत्रांमध्ये घडणे आवश्यक आहे:
पहिले क्षेत्र म्हणजे आपले वर्तमान नातेसंबंध आहे. यामध्ये आमचे मित्र, कुटुंब, सहकारी, वर्गमित्र आणि शक्यतो शेजारी समाविष्ट असतात. अशा प्रकारे सुवार्तेचा सर्वात वेगवान रीतीने प्रसार होतो. या लोकांसाठीची चिंता स्वाभाविक आहे. लूक 16:19-31 मध्ये आपण पाहतो की नरकात जळत असलेल्या श्रीमंत माणसालाही आपल्या कुटुंबाबद्दल किती प्रेम आणि काळजी होती. देवाने आपल्या जीवनात या लोकांना ठेविले आहे आणि आपण त्या नातेसंबंधांना प्रेम, संयम आणि चिकाटीने चांगल्या प्रकारे सांभाळीले पाहिजे.
तुम्ही ख्रिस्ताच्या अनुयायांना त्यांच्या ओळखीच्या 100 लोकांची यादी तयार करण्याचा प्रयत्न करून लोकांच्या या गटासाठी संवेदनशील करू शकता. त्यांना त्या लोकांना तीन गटांमध्ये वर्गीकृत करण्यासाठी प्रोत्साहित करा: जे ख्रिस्ताचे अनुसरण करितात, जे ख्रिस्ताचे अनुसरण करित नाहीत आणि ज्यांची आध्यात्मिक स्थिती अज्ञात आहे.
त्यानंतर ते ख्रिस्ताचे अनुसरण करणाऱ्यांना अधिक फलदायी आणि विश्वासू होण्यासाठी सुसज्ज करू शकतात आणि त्यांना प्रोत्साहन देऊ शकतात. जे अद्याप देवाच्या राज्यात ख्रिस्ताचे अनुसरण करित नाहीत त्यांना ते “शिष्य” बनविण्याचे मार्ग शोधू शकतात.
दुसरे क्षेत्र जेथे आपण राज्य नाही हे पाहू शकतो ते म्हणजे वर्तमान नातेसंबंधांच्या बाहेरील संपर्क आणि नातेसंबंध आहे. येशूने आपल्या शिष्यांना पृथ्वीवरील प्रत्येक लोकसमूहाचे शिष्य बनविण्याचे निर्देश दिले.
त्याने त्यांना जेथे ते सध्या आहेत तसेच जवळपासच्या भागात आणि स्वतःहून भिन्न असलेल्या लोकांमध्ये आणि अगदी “पृथ्वीच्या टोकापर्यंत” शिष्य बनविण्याचे निर्देश दिले आहेत. अशा प्रकारे सुवार्तेचा प्रचार दूरवर होतो. हे नैसर्गिक नाही. हे अलौकिक आहे. हा आपल्या जीवनातील पवित्र आत्म्याचा पुरावा आहे. देवाला काही गोष्टी आवडतात.
त्याचे आवडते सर्वात लहान, शेवटचे आणि हरवलेले लोक आहेत. म्हणूनच आपण आपले जीवन केवळ आपल्या जवळच्या लोकांचीच सेवा करण्यात नव्हे तर आध्यात्मिकदृष्ट्या जगाच्या अंधकारमय कोपऱ्यात असलेल्या लोकांची सेवा करण्यात गुंतविले पाहिजे. देव गर्विष्ठांना विरोध करितो पण नम्र लोकांवर कृपा करितो. जे हताश आहेत त्यांची सेवा आपण केली पाहिजे. हताश लोक सर्वात नम्र लोक असतात. अशा लोकांसह, आपण विशेषत: विश्वासू लोकांचा शोध घेणे आणि त्यांच्यामध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे.
लक्षात ठेवा की विश्वासूपणा देव जे प्रकट करितो त्याचे आज्ञापालन करून आणि ते इतरांना सांगून दर्शविले जाते. हे लोक येशूच्या दृष्टान्तातील चांगल्या मातीसारिखे आहेत. हे लोक ते आहेत जे 30, 60, किंवा 100-पट उत्पन्न देतात. ते कठोर अंतःकरणाने संदेश नाकारणारे नाहीत. हे लोक ते नाहीत जे छळ झाल्यावर मागे निघून जातात. हे लोक ते नाहीत जे जगाच्या किंवा श्रीमंतीच्या काळजीने विचलित होतात. हे लोक ते आहेत जे गदरेकरांच्या प्रदेशातील भूतग्रस्त व्यक्तीसारिखे आहेत ज्याने येशूच्या सेवेला त्याची आज्ञा पाळून आणि देवाने त्याच्यासाठी जे काही केले ते इतरांना सांगून प्रतिसाद दिला. परिणामी, जेव्हा येशू नंतर त्या प्रदेशात परत आला तेव्हा लोकसमुदाय त्याला शोधत होता.
काही मित्र एकत्र करा किंवा विद्यमान लहान गटासह कोर्स करा. तुमचा स्वतःचा प्रशिक्षण गट तयार करा आणि तुमच्या प्रगतीचा मागोवा घ्या.