Zúme प्रशिक्षणास प्रारंभ करा
काही मित्र एकत्र करा किंवा विद्यमान लहान गटासह कोर्स करा. तुमचा स्वतःचा प्रशिक्षण गट तयार करा आणि तुमच्या प्रगतीचा मागोवा घ्या.
जेव्हा शिष्यांची गुणात्मक वाढ होण्याबद्दल लोक विचार करितात तेव्हा ते बहुतेकदा त्यास पाऊल-दर-पाऊल प्रक्रिया म्हणून विचार करितात. असे काहीतरी: (1) पहिली प्रार्थना. (2) मग तयारी. (3) मग देवाची सुवार्ता सांगणे. (4) मग शिष्य घडविणे. (5) मग चर्च बांधणे. (6) नंतर नेते (पुढारी) विकसित करणे. (7) नंतर पुनरुत्पादन.
जेव्हा आपण अशा रीतीने विचार करितो, तेव्हा राज्याची वाढ ही एक सोपी, रेखीय आणि अनुक्रमिक प्रक्रिया असल्याचे दिसते.
एक समस्या अशी आहे की हे नेहमी अशाच रीतीने कार्य करीत नाही. एक मोठी समस्या ही आहे की हे सहसा अशाच रीतीने चांगले कार्य करीत नाही!
जर आपल्याला देवाचे राज्य झपाट्याने वाढलेले पहायचे असेल तर आपल्याला क्रम-नसलेल्या वाढीची अपेक्षा करणे आणि तिला प्रोत्साहन देणे देखील आवश्यक आहे.
शिष्य बनविण्याची ही प्रक्रिया अनुक्रमिक नाही. पुष्कळ लोक यास एक रेषीय आणि अनुक्रमिक प्रक्रिया म्हणून समजतात : प्रार्थना, प्री-इव्हेंजेलिझम (पूर्व-सुवार्ताप्रसार, सुवार्ता प्रसार, शिष्यत्व, चर्च निर्मिती, नेतृत्व विकास आणि पुनरुत्पादन. हे अशाच रीतीने ने कार्य करणे आवश्यक नाही.
पाच बिंदूंसह टाइमलाइनची कल्पना करा : जन्म (B), पहिल्यांदा कोणी सुवार्ता ऐकतो आणि समजतो (1), जेव्हा कोणी ख्रिस्ताचे अनुसरण करणे निवडितो (+), जेव्हा ते गुणात्मक रीतीने वाढण्यास सुरुवात करितात [ते जे शिकतात ते लागू करितात आणि इतरांना सांगतात] (M), आणि मृत्यू (D).
या परिस्थितीमध्ये, आध्यात्मिक पिढीची लांबी मूलत: बिंदू 1 ते बिंदू M पर्यंतचा कालावधी आहे.
जर आपण नवीन विश्वासी लोकांचा पाठपुरावा करण्याचा सराव केला, जसे की आपण याआधी पाहिलेला सर्वात मोठा आशीर्वाद दृष्टीकोन आहे, तर आपण पुढीलप्रमाणे दिसण्यासाठी हे बदलू शकतो:
या परिस्थितीत, आध्यात्मिक पिढीची लांबी बिंदू 1 ते बिंदू M पर्यंतचा कालावधी आहे. तुम्हाला लक्षात येईल की वेळ लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. त्यामुळे अनेक पिढ्यांमध्ये प्रचंड फरक पडू शकतो कारण तो प्रभाव गुमात्मक रीतीने वाढतो. अशी परिस्थिती असणे शक्य आहे ज्यामध्ये लोक ख्रिस्ताला समर्पित होण्यापूर्वी गुणात्मक रीतीने वाढण्याचा सराव करीत आहेत.
उदाहरणार्थ, असे म्हणा की तुम्हाला अशी एखादी व्यक्ती सापडली आहे ज्याला आध्यात्मिक गोष्टींमध्ये रस आहे परंतु तो ख्रिस्ताला आपले जीवन देण्यास तयार नाही. तथापि, ते बायबलचा अभ्यास करण्यासाठी त्यांच्या काही मित्रांना आणि कुटुंबियांना एकत्रित करण्यास तयार आहेत. तुम्ही त्यांना दाखवू शकता कि ते कसे करावे आणि इतरांनाही तसेच करण्यास कसे प्रशिक्षित करावे.
असे असू शकते की त्यांच्याकडे पहिल्या व्यक्तीने ख्रिस्ताचे अनुसरण करण्याची निवड करण्यापूर्वीच सुसज्जित पुनरुत्पादक गट आणि नेते आहेत. याचा अर्थ आहे की कोणीतरी ख्रिस्ताचे अनुसरण करण्याचा निर्णय घेतल्यानंतरच असे काहीतरी घडू शकते अशा प्रकारे शिष्यत्वाकडे पाहण्यापेक्षा आपण लोकांना तारणासाठी शिष्य बनवू शकतो.
ते या टाइमलाइनद्वारे दर्शविले जाऊ शकते:
या परिस्थितीत, कालांतराने (अनेक पिढ्यांनंतर) आध्यात्मिक पिढीची लांबी बिंदू 1 ते बिंदू M पर्यंतच्या वेळेपर्यंत पोहोचू शकते. काही परिस्थितींमध्ये, जेथे लोक ताबडतोब सुवार्ता ऐकण्यास असमर्थ आहेत किंवा तयार नाहीत, तरीही हे शक्य आहे की गुणात्मक नमुने शिकविण्याद्वारे समान परिणाम साध्य होऊ शकतात जसे की ते समुदाय विकासासारिख्या इतर गोष्टींवर लागू होतात. मग, जेव्हा संधी स्वतःला सादर करिते, तेव्हा नेटवर्क सुवार्तेसाठी खुला केला जाऊ शकतो.
ते खालीलसारिखे दिसू शकते:
का अर्थाने, शिष्यांची गुणात्मक रीतीने वाढ होण्यात सर्वात मोठी गोष्ट म्हणजे चांगली माती कोण आहे हे पटकन शोधून काढणे होय. ते शिकलेल्या गोष्टी लागू करण्यास आणि त्या इतरांपर्यंत पोचविण्यास विश्वासू असणारी व्यक्ती कोण असेल? अशा लोकांचा विकास करण्यासाठी वेळ, ऊर्जा आणि प्रयत्न केंद्रित करणे योग्य आहे. ते असे लोक आहेत ज्यांच्याशी तुम्हाला मदतगार नातेसंबंध प्रस्थापित करणे आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या विद्यमान नातेसंबंधांच्या नेटवर्कबाहेरील लोकांमध्ये काम करित असाल, तेव्हा तुम्ही या प्रकाराच्या व्यक्तीसाठी फिल्टर करणे अत्यावश्यक आहे.
नवीन भौगोलिक क्षेत्रे आणि लोकसंख्या विभाग आणि संबंधित नेटवर्क्समध्ये राज्याच्या विस्तारासाठी असे लोक महत्त्वपूर्ण आहेत.
काही मित्र एकत्र करा किंवा विद्यमान लहान गटासह कोर्स करा. तुमचा स्वतःचा प्रशिक्षण गट तयार करा आणि तुमच्या प्रगतीचा मागोवा घ्या.