Zúme प्रशिक्षणास प्रारंभ करा
काही मित्र एकत्र करा किंवा विद्यमान लहान गटासह कोर्स करा. तुमचा स्वतःचा प्रशिक्षण गट तयार करा आणि तुमच्या प्रगतीचा मागोवा घ्या.
बदकाच्या पिल्लांचा शिष्य बनविण्याशी काय संबंध आहे हे तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही कधी बदकांच्या पिल्लांच्या गटाला बाहेर फिरताना पाहिला आहे का? बदकांची पिल्ले प्रत्यक्षात शिष्य बनविण्याचे एक महत्त्वाचे तत्त्व स्पष्ट करितात. जर तुम्हाला देवाचे कुटुंब खूप वाढलेले आणि विश्वासूपणात वाढलेले पाहू इच्छिता, तर पुढे बदकांच्या पिल्लूंसारिखे शिष्य बनविण्याचा विचार करा. अगदी एकाच वेळी अनुयायी आणि नेता व्हा.
तुम्ही जगात कुठेही असलात तरी ते नेहमी सारिखेच दिसतात.
एक माता बदक नेतृत्व करिते आणि तिची पिल्ले एकामागोमाग एक - एका रांगेत चालतात. बदक माता नेतृत्व करिते. लहान बदके मागे येतात. पण जर तुम्ही आणखी जवळून पाहिले, तर तुम्हाला आणखी काहीतरी घडत असल्याचे दिसेल. प्रत्येक लहान बदकाचे पिल्लू प्रत्यक्षात दोन भूमिका बजावित आहे - अगदी त्याच वेळी:
तर मग हे बदकाचे पिल्लू अनुयायी आहे की नेता? हे दोन्ही आहे.
आणि म्हणूनच "फिरायला बाहेर पडलेल्या" बदकांचा शिष्य बनविण्याशी संबंध आहे. देवाची इच्छा आहे की त्याचे कुटुंब सुदूर वाढावे - आणि म्हणून प्रत्येक अनुयायाने नेता व्हावे, प्रत्येक विश्वासी व्यक्ती ने सामायिक करावे आणि प्रत्येक शिष्याने शिष्य बनवावे - अगदी त्याच वेळी.
शिष्य बदकाच्या पिल्लांसारिखे सारिखे असतात. नेता होण्यासाठी, त्यांना सर्व काही माहित असणे आवश्यक नाही. त्यांनी फक्त एक पाऊल पुढे असले पाहिजे. देवाची इच्छा आहे की त्याच्या कुटुंबाने विश्वासूपणात वाढावे - आणि म्हणून प्रत्येक नेत्याने अनुयायी व्हावे, प्रत्येक सामायिक करणाऱ्याने विश्वासी व्हावे आणि प्रत्येक शिष्य-निर्मात्याने शिष्य व्हावे अशी तो अपेक्षा करितो - अगदी त्याच वेळी.
शिष्य आणि शिष्य-निर्माते या नात्याने आपण आणखी एका सापळ्यात पडतो, तो हा खोटा विश्वास आहे की एखाद्याला, कुठेतरी सर्व काही माहित आहे आणि जर आपण त्यांना शोधून त्यांचे अनुसरण केले तर आपण तयार आहोत. पण शिष्यत्व कसे कार्य करते असे नाही. परंतु शिष्यत्व अशा रीतीने ही कार्य करीत नाही.
देवाच्या राज्यात, फक्त एक "माता बदक" आहे ज्याचे आपण सर्व अनुसरण करितो -- आणि तो येशू ख्रिस्त आहे. कोणताही मिशनरी नाही. कोणताही पास्टर नाही. कोणताही सेमिनरीचा प्राध्यापक नाही. केवळ येशूच आपल्या विश्वासाच्या पूर्ण मापासाठी पात्र आहे.
बाकी आपण सर्व "प्रक्रियेत" आहोत. नेहमी येशूच्या जवळ कोणीतरी असेल ज्याचे आपण अनुसरण करू शकतो. आणि नेहमी कोणीतरी लांब असेल ज्याचे आपण नेतृत्व करू शकतो. परंतु आपली स्थिती काहीही असो, आपले डोळे - आणि आपले हृदय - नेहमी येशूवर पूर्णपणे स्थिर असले पाहिजे.
बायबलमध्ये, पौल, ज्याने नवीन कराराचा बराचसा भाग लिहिला आणि अनेक सुरुवातीचे चर्च सुरू केले, त्याने फक्त असे लिहिले नाही - "माझे अनुकरण करा." त्याने लिहिले, “जसा मी ख्रिस्ताचे अनुकरण करणारा आहे, तसे तुम्हीही माझे अनुकरण करणारे व्हा.” पौल जाणून होता की सर्वत्र बदकाच्या पिल्लांना काय माहित आहे आणि प्रत्येक शिष्याला देखील काय माहित असले पाहिजे - देवाच्या राज्यातील प्रत्येक नेत्याला अनुयायी असणे आवश्यक आहे - आणि आपण सर्वजण येशूचे अनुसरण करितो.
बायबलमध्ये, पौलाने असेही लिहिले: "ज्या गोष्टी तू पुष्कळ साक्षीदारांसमक्ष माझ्या-पासून ऐकल्या, त्या इतरांना शिकविण्यास योग्य अशा विश्वासू माणसांना सोपवून दे." पौल जाणून होता की सर्वत्र बदकाच्या पिल्लांना काय माहित आहे आणि प्रत्येक शिष्याला देखील काय माहित असले पाहिजे. देवाच्या राज्यातील प्रत्येक अनुयायाला एक नेता (पुढारी) असणे आवश्यक आहे - आणि आपण सर्वांनी येशूसारिखे नेतृत्व केले पाहिजे, इतरांसाठी आपले जीवन अर्पण करीत असताना. जर तुम्हाला देवाचे कुटुंब सुदूर वाढलेले आणि विश्वासूपणात वाढलेले पाहायचे असेल, तर बदकाच्या पिल्लांप्रमाणे शिष्य बनविण्याचा विचार करा - अगदी एकाच वेळी एक अनुयायी आणि नेता (पुढारी) बना.
काही मित्र एकत्र करा किंवा विद्यमान लहान गटासह कोर्स करा. तुमचा स्वतःचा प्रशिक्षण गट तयार करा आणि तुमच्या प्रगतीचा मागोवा घ्या.