Zúme प्रशिक्षणास प्रारंभ करा
काही मित्र एकत्र करा किंवा विद्यमान लहान गटासह कोर्स करा. तुमचा स्वतःचा प्रशिक्षण गट तयार करा आणि तुमच्या प्रगतीचा मागोवा घ्या.
बाप्तिस्मा हे आपल्या नवीन जीवनाचे चित्र आहे, येशूच्या स्वरूपामध्ये व्यापलेले, देवाच्या आज्ञाधारकतेमध्ये बदललेले. हे पापास्तव आपल्या मृत्यूचे चित्र आहे, ज्याप्रमाणे येशू आपल्या पापांसाठी मरण पावला. हे आपल्या जुन्या जीवनपद्धतीला गाडून टाकण्याचे चित्र आहे, ज्याप्रमाणे येशूला गाडून टाकण्यात आले होते. हे ख्रिस्तामध्ये नवीन जीवनात पुनर्जन्माचे एक चित्र आहे, ज्याप्रमाणे येशूचे पुनरुत्थान झाले आणि आज तो जिवंत आहे. येशू म्हणाला - "तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य करा; त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या;..." बाप्तिस्मा - किंवा मूळ ग्रीक भाषेत बॅप्टीझो - म्हणजे भिजणे किंवा बुडणे - जसे की जेव्हा तुम्ही कापड रंगविता व ते रंगात भिजते आणि रूपांतरित होऊन बाहेर येते.
जर तुम्ही पूर्वी कधीही कोणाचा बाप्तिस्मा केला नसेल तर तो करितांना भीती वाटेल, पण भीतीचे काहीही कारण नसावे. काही सोप्या गोष्टी खाली दिल्या आहेत:
अभिनंदन! तुम्ही येशूच्या एका नवीन अनुयायाचा बाप्तिस्मा केला आहे - स्वर्गाचा एक नवीन नागरिक - जिवंत देवाचे एक नवीन मूल. आनंदोत्सव करण्याची ही वेळ आहे!
काही मित्र एकत्र करा किंवा विद्यमान लहान गटासह कोर्स करा. तुमचा स्वतःचा प्रशिक्षण गट तयार करा आणि तुमच्या प्रगतीचा मागोवा घ्या.