Zúme प्रशिक्षणास प्रारंभ करा
काही मित्र एकत्र करा किंवा विद्यमान लहान गटासह कोर्स करा. तुमचा स्वतःचा प्रशिक्षण गट तयार करा आणि तुमच्या प्रगतीचा मागोवा घ्या.
येशूने त्याच्या अनुयायांना असे निर्देश दिले की त्यांनी सतत नवीन आध्यात्मिक कुटुंबे सुरू केली पाहिजेत, त्यांना अधिक येशूसारिखे बनण्यास वाढवीत असताना आणि त्यांनी नवीन आध्यात्मिक कुटुंबे कशी सुरू करावीत हे शिकण्यास त्यांना मदत देखील करीत असताना. तर या दोन गोष्टी कशा एकत्र येतात - आपण चर्चचा भाग कसा असू शकतो आणि नवीन चर्च सुरू करण्याच्या प्रक्रियेत कसे असू शकतो - सर्व एकाच वेळी?
देवाच्या वचनात, आपण शिकतो की त्याची परिपूर्ण योजना आपल्यासाठी एक आध्यात्मिक कुटुंब म्हणून जगण्याची आहे. बायबल या कुटुंबाविषयी सांगते की ही मंडळी (चर्च) तीन प्रकारांची आहे:
चार कुटुंबांच्या एका सर्वसाधारण मंडळीची कल्पना करा. ही मूळ मंडळी (चर्च) आहे जिच्यामध्ये ही कुटुंबे जीवन जगतात - असे बंधू आणि बहिणी जे त्यांना प्रीती आणि चांगल्या कामात प्रोत्साहन देतात. आता कल्पना करा की चार जोडप्यांपैकी प्रत्येक जोडपे नवीन आध्यात्मिक कुटुंब सुरू करण्यासाठी काम सुरु करीत आहेत. ते त्यांच्या स्वत:च्या लहान गटाच्या कुटुंबाप्रमाणेच सहभागी होत नाहीत, परंतु नवीन आध्यात्मिक कुटुंब सुरू झाल्यावर आणि वाढत असताना ते मॉडेल (स्वतः करणे) आणि अस्सिस्ट (सहाय्य) करण्यात मदत करित आहेत. एका सर्वसाधारण मंडळीमधून चार नवीन मंडळ्या एकाच वेळी सुरू होतात.
देव त्याचे कुटुंब किती वेगाने वाढवू शकतो याचे हे एक उदाहरण आहे. अशाप्रकारे मंडळी आपला वेग वाढवू शकते.
मंडळ्यांना (चर्चला) काय होते जेव्हा ती वाढत असतात आणि अशा नवीन मंडळ्या (चर्च) सुरू करितात जे अजून नवीन मंडळ्या सुरू करितात? ते कसे जोडलेले राहतात? ते कसे एक विस्तारित, आध्यात्मिक कुटुंब म्हणून कसे जीवन जगतात? उत्तर असे आहे की या सर्व साधारण मंडळ्या वाढत्या शरीरातील पेशींप्रमाणे आहेत आणि त्या एकत्रित येतात आणि शहर किंवा प्रादेशिक मंडळीमध्ये जोडल्या जातात. मंडळ्या जोडलेल्या आहेत. ते समान आध्यात्मिक डीएनए सामायिक करितात. त्या सर्व एकाच पहिल्या गुणात्मक रीतीने वाढणाऱ्या कुटुंबामध्ये जोडलेल्या आहेत. आणि आता - काही मार्गदर्शनासह - त्या आणखी अधिक गोष्टी करण्यासाठी एक मोठी मंडळी म्हणून एकत्रित येतात.
काही मित्र एकत्र करा किंवा विद्यमान लहान गटासह कोर्स करा. तुमचा स्वतःचा प्रशिक्षण गट तयार करा आणि तुमच्या प्रगतीचा मागोवा घ्या.