भाषा


English English
العربية Arabic
العربية - الأردن Arabic (Jordanian)
العربية التونسية Arabic (Tunisian)
Armenian Armenian
Sign Language American Sign Language
বাংলা Bengali (India)
भोजपुरी Bhojpuri
Bosanski Bosnian
中文(繁體,香港) Cantonese (Traditional)
中文(简体) Chinese (Simplified)
中文(繁體) Chinese (Traditional)
Hrvatski Croatian
Français French
Deutsch German
ગુજરાતી Gujarati
Hausa Hausa
हिन्दी Hindi
Bahasa Indonesia Indonesian
Italiano Italian
ಕನ್ನಡ Kannada
한국어 Korean
کوردی Kurdish
ພາສາລາວ Lao
𑒧𑒻𑒟𑒱𑒪𑒲 Maithili
മലയാളം Malayalam
मराठी Marathi
नेपाली Nepali
ଓଡ଼ିଆ Oriya
فارسی Persian/Farsi
Polski Polish
Português Portuguese
ਪੰਜਾਬੀ Punjabi
Русский Russian
Română Romanian
Slovenščina Slovenian
Soomaali Somali
Español Spanish
Kiswahili Swahili
தமிழ் Tamil
తెలుగు Telugu
ไทย Thai
Türkçe Turkish
اردو Urdu
Tiếng Việt Vietnamese
Yorùbá Yoruba

उत्तरदायित्व गट

येशूच्या प्रत्येक अनुयायाला जबाबदार धरले जाईल, म्हणूनच येशूच्या प्रत्येक अनुयायाने इतरांसोबत उत्तरदायित्वाचा सराव केला पाहिजे. येशूने उत्तरदायित्वाच्या अनेक कथा सांगितल्या आणि आपण जे काही करितो व बोलतो त्यासाठी आपल्याला कसे जबाबदार धरले जाईल याची अनेक सत्ये सांगितली. म्हणून उत्तरदायित्व गट हे सत्य व प्रेमाने भरून एकत्र पुढे वाढणाऱ्या बंधुभगिनींची नैसर्गिक अभिव्यक्ती आहेत. त्तरदायित्व गट दोन किंवा तीन लोकांचे - पुरुषांसह पुरुष, महिलांसह महिला - बनलेले आहेत - जे काही प्रश्नांच्या संचावर चर्चा करण्यासाठी आठवड्यातून एकदा भेटतात ज्यामुळे गोष्टी कोणत्या क्षेत्रात बरोबर चालल्या आहेत आणि कोणत्या इतर क्षेत्रात सुधारणेची आवश्यकता आहे हे जाणून घेण्यास मदत करितात. ते समोरासमोर भेटू शकत नसतील तर ते फोनवरही भेटगाठ करू शकतात.

ऐका आणि सोबत वाचा

उत्तरदायित्व प्रश्न - यादी 1

  1. आपण येशूसारिखे व्हावे यासाठी प्रार्थना करा.
  2. तुम्ही कसे आहात? तुमचे प्रार्थना जीवन कसे आहे?
  3. तुम्ही कबूल करावे असे काही पाप आहे का? [संबंधात्मक, लैंगिक, आर्थिक, गर्व, सचोटी, प्राधिकरणाचे आज्ञापालन, इ.]
  4. देवाने तुम्हाला मागच्या वेळी जे सांगितले ते तुम्ही आज्ञापिले का? तपशील सामायिक करा (शेअर करा).
  5. या आठवड्यात तुम्ही तुमच्या नातेसंबंधांच्या यादीतील "अविश्वासू" लोकांसाठी प्रार्थना केली का? तुम्हाला त्यांच्यापैकी कोणाशीही सामायिक करण्याची संधी मिळाली का? तपशील सामायिक करा (शेअर करा).
  6. या आठवड्यात तुम्ही नवीन वचन पाठ केले आले का? ते उद्धृत करा.
  7. या आठवड्यात तुम्ही बायबलमधील किमान 25 अध्याय वाचले आहेत का?
  8. या आठवड्यात देव वचनाद्वारे तुमच्या सोबत काय बोलला?
  9. तुम्ही त्याबद्दल विशेषतः काय करणार आहात?
  10. तुम्ही या आठवड्यात तुमच्या 3/3 गटाला भेट दिली आहे का? ती भेट कशी होती?
  11. या आठवड्यात तुम्ही नवीन 3/3 गट सुरू करण्यासाठी कोणालातरी नमुना (मॉडेल) किंवा सहाय्य (अस्सिस्ट) केले आहे का? तपशील सामायिक करा (शेअर करा).
  12. ख्रिस्ताबरोबर माझ्या चालण्यात अडथळा आणणारे काही तुम्हाला दिसत आहे का?
  13. तुम्हाला या आठवड्यात सुवार्ता सांगण्याची संधी मिळाली का? तपशील सामायिक करा (शेअर करा).
  14. आत्ताच 1-3 मिनिटांच्या साक्ष्यांचा आणि सुवार्तेचा सराव करा.
  15. पुढच्या आठवड्यात तुम्ही गटामध्ये कोणाला आमंत्रित करू शकता? जर गट चार किंवा त्यापेक्षा अधिक लोकांचा असेल तर त्याला गुणात्मक रीतीने वाढवा.
  16. काय सामायिक केले होते त्याबद्दल प्रार्थनेसह समाप्त करा.

 

उत्तरदायित्व प्रश्न - यादी 2

  1. मागील आठवड्यातील वाचनाच्या तुमच्या अंतर्दृष्टीने तुमच्या विचार करण्याच्या आणि जगण्याच्या पद्धतीला कसा आकार दिला आहे?
  2. मागील आठवड्यातील तुमची अंतर्दृष्टी तुम्ही कोणाकडे सुपूर्द केली आणि तिला कशा रीतीने स्वीकार करण्यात आले आहे?
  3. तुम्ही देवाला कार्य करिताना पाहिले आहे का?
  4. या आठवड्यात तुम्ही तुमच्या शब्दांद्वारे आणि कृतींद्वारे येशू ख्रिस्ताच्या महानतेची साक्ष दिली आहे का?
  5. तुम्ही लैंगिक मोहक सामग्रीच्या संपर्कात आला आहात का किंवा तुमच्या मनात अयोग्य लैंगिक विचार तुम्ही येऊ दिले आहेत का?
  6. तुम्ही तुमच्या पैशाच्या वापरामध्ये देवाची मालकी मान्य केली आहे का?
  7. तुम्हाला कोणत्यातरी गोष्टीची लालसा आहे का?
  8. तुम्ही तुमच्या बोलण्याने कोणाची प्रतिष्ठा किंवा भावना दुखाविल्या आहेत का?
  9. तुम्ही शब्द किंवा कृतीत अप्रामाणिकपणा दाखविलेला आहे का किंवा अतिशयोक्ती केली आहे का?
  10. तुम्ही व्यसनाधीन [किंवा आळशी किंवा अनुशासित] आचरण बाळगलेले आहे का?
  11. तुम्ही कपडे, मित्र, काम किंवा संपत्तीचे गुलाम बनले आहात का?
  12. तुम्ही एखाद्याला क्षमा करण्यात अयशस्वी झाला आहात का?
  13. तुम्हाला कोणत्या चिंता किंवा काळजी सतावीत आहेत? तुम्ही तक्रार केली आहे की कुरकुर केली आहे?
  14. तुम्ही आभारी अंतःकरण राखले आहे का?
  15. तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या नातेसंबंधांमध्ये आदरपूर्ण, समजूतदार आणि उदार आहात का?
  16. विचार, शब्द किंवा कृतीत तुम्हाला कोणत्या परीक्षांचा सामना करावा लागला आहे आणि तुम्ही कसा प्रतिसाद दिला?
  17. तुम्ही इतरांची, विशेषतः विश्वासणाऱ्यांची सेवा करण्याच्या किंवा त्यांच्यासाठी आशीर्वाद बनण्याच्या संधींचा उपयोग कसा केला आहे?
  18. तुम्ही प्रार्थनेची विशिष्ट उत्तरे पाहिली आहेत का?
  19. तुम्ही आठवड्याचे वाचन पूर्ण केले का?

स्व: तालाच विचारा

Zúme प्रशिक्षणास प्रारंभ करा

काही मित्र एकत्र करा किंवा विद्यमान लहान गटासह कोर्स करा. तुमचा स्वतःचा प्रशिक्षण गट तयार करा आणि तुमच्या प्रगतीचा मागोवा घ्या.