दूरदृष्टी / दर्शन (व्हिजन) सर्वात मोठ्या आशीर्वादावर दृष्टिक्षेप टाकताना

दूरदृष्टी / दर्शन (व्हिजन) सर्वात मोठ्या आशीर्वादावर दृष्टिक्षेप टाकताना

This concept is called "दूरदृष्टी / दर्शन (व्हिजन) सर्वात मोठ्या आशीर्वादावर दृष्टिक्षेप टाकताना" in session 4 of the Zúme Training

जेव्हा कोणी येशूचे अनुसरण करण्याचे ठरवितो, तेव्हा तुम्ही त्यांना योग्य मार्गावर जाण्यास कशी मदत करिता? सर्वात मोठ्या आशिर्वादावर दृष्टिक्षेप टाकणाऱ्यादर्शनापासून (व्हिजन) सुरुवात करा ज्याचा ते येशूचे अनुयायी म्हणून अनुभव करू शकतात

त्यांच्यासोबत हे सामायिक करण्याचा विचार करा:

येशूचे अनुसरण करणे हा एक आशीर्वाद आहे. इतरांना येशूचे अनुसरण करण्यास मार्गदर्शन करणे हा एक मोठा आशीर्वाद आहे. नवीन आध्यात्मिक कुटुंब सुरूकरणे हा एक खूप मोठा आशीर्वाद आहे. नवीन आध्यात्मिक कुटुंबे सुरू करण्यासाठी इतरांना सुसज्ज करणे हा सर्वात मोठा आशीर्वाद आहे.

हा व्हिडिओ पहा

सर्वात मोठ्या आशीर्वादाचे उदाहरण सामायिक करणे

एखाद्या व्यक्तीने ख्रिस्ताचे अनुसरण करण्याचा निर्णय घेतल्यावर अशा लोकांना प्रशिक्षण देणे सुरू करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे, जेणेकरून ते यापैकीकाही तत्त्वे लागू करण्यास योग्य मार्गावर पुढे वाढण्यास सुरू होऊ शकतील

प्रथम, त्यांची संपर्क माहिती मिळवा आणि नंतर त्यांना सांगा:

प्रभूचे अनुसरण करणे हा एक आशीर्वाद आहे. इतरांना प्रभूचे अनुसरण करण्यास मार्गदर्शन करणे हा एक मोठा आशीर्वाद आहे. नवीन आध्यात्मिक कुटुंब सुरूकरणे हा एक खूप मोठा आशीर्वाद आहे. नवीन आध्यात्मिक कुटुंबे सुरू करण्यासाठी इतरांना सुसज्ज करणे हा सर्वात मोठा आशीर्वाद आहे. मी तुम्हाला मोठाआशीर्वाद, खूप मोठा आशीर्वाद आणि सर्वात मोठा आशीर्वाद मिळण्यास मदत करू इच्छितो. तुमच्या ओळखीच्या 100 लोकांची यादी बनवा आणि त्यापैकीपाच लोकांना निवडा (जे प्रभूला ओळखत नाहीत) ज्यांच्या सोबत आत्ताच तुम्ही ही गोष्ट सामायिक करू 

इच्छिता.”

मग, त्यांची यादी तयार झाल्यावर, त्यांची साक्ष आणि सुवार्ता सांगण्यासाठी त्यांना सुसज्ज करा. त्यांनी निवडलेल्या पाच लोकांपैकी प्रत्येकासाठी एकदा, पाचवेळा सराव करा. ते सराव करित असताना त्यांनी निवडिलेल्या लोकांची भूमिका साकारा.

त्यानंतर, त्यांना भेटण्यासाठी वेळ नियुक्त करा, सहसा दोन दिवसानंतर. त्या वेळी ते तुम्हाला सांगू शकतात की जेव्हा त्यांनी सुवार्ता सांगितली तेव्हा काय-कायघडले होते. जर ते भेटण्यास येऊ शकले नाहीत तर तुमच्याकडे त्यांची संपर्क माहिती आहे.

दोन दिवसांनी त्यांना पुन्हा भेटा. जर त्यांनी सामायिक केले नसेल (सुवार्ता सांगितली नसेल) तर त्यांना नवीन काहीही सांगू नका. सामायिक करण्यासाठीत्यांच्यासोबत जाण्याची तयारी दाखवा. त्यांच्यासोबत अधिक सराव करण्याची तयारी दाखवा. त्यांना इतरांसह सामायिक करण्यास प्रारंभ करण्यासाठी जे काहीकरता येईल ते करा. तथापि, ही व्यक्ती "चांगली माती" नाही, असा तुम्हाला संशय वाटू लागेल आणि तसे असल्यास, तुम्ही त्या लोकांवर अधिक गुंतवणूककरणार नाही.

जर त्यांनी सामायिक केले (सांगितले) असेल परंतु कोणीही विश्वास ठेविला नसेल, तर आनंदी रहा! त्यांच्याशी बाप्तिस्म्याबद्दल बोलण्यास सुरुवात करा आणित्यांना शिष्य बनविण्याच्या साधनांपैकी एकाची ओळख करून द्या. त्यांच्या 100 च्या यादीतून काही अतिरिक्त लोक निवडा जेणेकरुन त्यांच्याशी ते सामायिककरू शकतील आणि आवश्यकतेनुसार सराव करू शकतील.

जर त्यांनी सामायिक केले असेल आणि काहींनी विश्वास ठेविला असेल परंतु ते त्यांना सर्वात मोठ्या आशीर्वादाबद्दल सांगण्यास अयशस्वी झाले असतील, तरत्यांच्याबरोबर आनंद करा, पुनरावलोकन करा आणि प्रक्रिया सुरू ठेविण्यासाठी त्यांना त्या लोकांकडे परत पाठवा.

जर त्यांनी सामायिक केले असेल आणि काहींनी विश्वास ठेविला असेल आणि त्यांनी त्यांना सर्वात मोठ्या आशीर्वादाबद्दल सांगितले असेल, तर खूप उत्साहितव्हा! ते बहुधा "चांगली माती" आहेत असे गृहीत धरा आणि त्यांच्या आध्यात्मिक विकासात लक्षणीय गुंतवणूक करण्याची योजना बनवा. बाप्तिस्म्याबद्दलबोलणे सुरू करा आणि त्यांना 3/3 गटाच्या स्वरूपाशी ओळख करून द्या आणि त्यांच्यासाठी ते स्वतः करा (मॉडेल करा) जेणेकरून ते त्या लोकांसोबत एक गटसुरू करू शकतील ज्यांना त्यांनी प्रभुकडे आणिले आहे.

Zúme झुमे प्रशिक्षण साधनांच्या प्रकाशात सर्वात मोठा आशीर्वाद

स्व: तालाच विचारा

  • तुम्ही येशूचे अनुसरण करण्यास सुरुवात केली तेव्हा हीच पद्धत तुम्हाला शिकविण्यात आली होती का? नसल्यास, काय वेगळे होते?
  •  तुम्ही विश्वासात आल्यानंतर, तुम्ही इतरांना शिष्य बनविण्यास सुरू करे पर्यंत किती वेळ लागला?

आपण गमावत आहात. आताच नोंदणी करा!

  • तुमच्या वैयक्तिक प्रशिक्षण प्रगतीचा मागोवा घ्या
  • गट नियोजन साधनांची हाताळणी करा
  • प्रशिक्षकाशी संपर्क साधा
  • जागतिक दूरदृष्टी मध्ये तुमचा प्रयत्न शामिल करा!

मूलभूत शिष्य-निर्मिती आणि साधारण चर्च रोपणीच्या गुणात्मक वाढीची तत्त्वे, प्रक्रिया आणि पद्धतींमध्ये सहभागींना सुसज्ज करण्यासाठी झुमे ऑनलाइन प्रशिक्षण मंच वापरतो.

संपूर्ण प्रशिक्षण पहा


मोठ्या झुमे दूरदृष्टीचा (विजन) भाग म्हणून झुमे प्रशिक्षण विनामूल्य दिले जात आहे.

झुमे दूरदृष्टी (विजन) बद्दल अधिक जाणून घ्या

Loading...

इंग्रजी


English English
العربية Arabic
العربية - الأردن Arabic (JO)
Sign Language American Sign Language
भोजपुरी Bhojpuri
বাংলা Bengali (India)
Bosanski Bosnian
粵語 (繁體) Cantonese (Traditional)
Hrvatski Croatian
فارسی Farsi/Persian
Français French
Deutsch German
ગુજરાતી Gujarati
Hausa Hausa
हिंदी Hindi
Bahasa Indonesia Indonesian
Italiano Italian
ಕನ್ನಡ Kannada
한국어 Korean
کوردی Kurdish
ພາສາລາວ Lao
𑒧𑒻𑒟𑒱𑒪𑒲 Maithili
國語(繁體) Mandarin (Traditional)
国语(简体) Mandarin (Simplified)
मराठी Marathi
മലയാളം Malayalam
नेपाली Nepali
ଓଡ଼ିଆ Oriya
Apagibete Panjabi
Português Portuguese
русский Russian
Română Romanian
Slovenščina Slovenian
Español Spanish
Soomaaliga Somali
Kiswahili Swahili
தமிழ் Tamil
తెలుగు Telugu
ไทย Thai
Türkçe Turkish
اُردُو Urdu
Tiếng Việt Vietnamese
Yorùbá Yoruba
More languages in progress