तुमची ३-मिनिटांची साक्ष तयार करा
येशूने त्याच्या अनुयायांना सांगितले - "तुम्ही ह्या गोष्टींचे साक्षी आहात."
प्रत्येकाकडे एक गोष्ट असते. तुमचा सराव करण्याची ही संधी आहे.
येशूचे अनुयायी या नात्याने, आपणही “साक्षी” आहोत - येशूने आपल्या जीवनावर टाकलेल्या प्रभावाबद्दलची “साक्ष” देत आहोत. देवासोबतच्या तुमच्यानातेसंबंधाची तुमची गोष्ट याला तुमची साक्ष म्हणतात. प्रत्येकाकडे एक गोष्ट असते. तुमची साक्ष सामायिक करणे (सांगणे) ही तुमचा सराव करण्याची संधी आहे.
3 मूलभूत प्रकारची साक्ष
तुमच्या गोष्टीला आकार देण्याचे अंतहीन मार्ग आहेत, परंतु जे काही मार्ग चांगले यशस्वी ठरताना आम्ही पहिले ते येथे देत आहोत:
· एक साधे विधान - तुम्ही येशूचे अनुसरण करणे का निवडीले याबद्दल एक साधे विधान तुम्ही सामायिक करू शकता. हे अगदी नवीन विश्वासूलोकांसाठी चांगले कार्य करिते.
· पूर्वी आणि नंतर - तुम्ही तुमची "पूर्वी" आणि "नंतरची" गोष्ट सांगू शकता - तुम्ही येशूला ओळखण्यापूर्वी तुमचे जीवन कसे होते आणि तुमचे जीवनआता कसे आहे. साधे आणि शक्तिशाली.
· सह आणि शिवाय - तुम्ही तुमची "सोबत" आणि "शिवाय" गोष्ट सांगू शकता - तुमचे जीवन "येशूसह" कसे आहे आणि "त्याच्याशिवाय" कसे असेल. तुम्ही विश्वासात जर लहान वयात आला असाल तर तुमच्या गोष्टीची ही आवृत्ती उत्तम काम करिते.
तुमची साक्ष सामायिक करण्यासाठीचे 3 भाग
तुमची गोष्ट सांगताना, ती एक तीन भागांची प्रक्रिया आहे असे समजणे उपयुक्त आहे:
- त्यांची गोष्ट - तुम्ही ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांना त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाबद्दल सांगण्यास सांगा.
- तुमची गोष्ट - त्या नंतर त्यांच्या अनुभवाभोवती रचलेली तुमची साक्ष सांगा.
- देवाची गोष्ट - शेवटी देवाची गोष्ट अशा प्रकारे सांगा जी त्यांच्या जागतिक दृष्टिकोनाशी, मूल्यांशी आणि प्राधान्यक्रमांशी जोडली जाईल.
तुमची साक्ष परिणामकारक होण्यासाठी लांबलचक किंवा खूप तपशील देणारी असण्याची गरज नाही. खरं तर, तुमची गोष्ट सुमारे 3-मिनिटांत आवरली तर प्रश्नविचारण्यासाठी आणि सखोल संभाषणासाठी वेळ मिळेल.
सुरुवात कशी करायची याबद्दल तुम्हाला काळजी वाटत असल्यास - ती सोपी असू द्या. देव तुमच्या गोष्टीचा उपयोग जीवन बदलण्यासाठी करू शकतो, पणलक्षात असू द्या की - तुम्हीच ती सांगू शकता.
स्व: तालाच विचारा
- कोणती खोटी भीती आपल्याला आपली साक्ष देण्यापासून रोखते?
- साक्ष कशामुळे प्रभावी होते? तिची शक्ती कुठून येते?
आपण गमावत आहात. आताच नोंदणी करा!
- तुमच्या वैयक्तिक प्रशिक्षण प्रगतीचा मागोवा घ्या
- गट नियोजन साधनांची हाताळणी करा
- प्रशिक्षकाशी संपर्क साधा
- जागतिक दूरदृष्टी मध्ये तुमचा प्रयत्न शामिल करा!
मूलभूत शिष्य-निर्मिती आणि साधारण चर्च रोपणीच्या गुणात्मक वाढीची तत्त्वे, प्रक्रिया आणि पद्धतींमध्ये सहभागींना सुसज्ज करण्यासाठी झुमे ऑनलाइन प्रशिक्षण मंच वापरतो.
मोठ्या झुमे दूरदृष्टीचा (विजन) भाग म्हणून झुमे प्रशिक्षण विनामूल्य दिले जात आहे.