भाषा


English English
العربية Arabic
العربية - الأردن Arabic (Jordanian)
العربية التونسية Arabic (Tunisian)
Armenian Armenian
Sign Language American Sign Language
বাংলা Bengali (India)
भोजपुरी Bhojpuri
Bosanski Bosnian
中文(繁體,香港) Cantonese (Traditional)
中文(简体) Chinese (Simplified)
中文(繁體) Chinese (Traditional)
Hrvatski Croatian
Français French
Deutsch German
ગુજરાતી Gujarati
Hausa Hausa
हिन्दी Hindi
Bahasa Indonesia Indonesian
Italiano Italian
ಕನ್ನಡ Kannada
한국어 Korean
کوردی Kurdish
ພາສາລາວ Lao
𑒧𑒻𑒟𑒱𑒪𑒲 Maithili
മലയാളം Malayalam
मराठी Marathi
नेपाली Nepali
ଓଡ଼ିଆ Oriya
فارسی Persian/Farsi
Polski Polish
Português Portuguese
ਪੰਜਾਬੀ Punjabi
Русский Russian
Română Romanian
Slovenščina Slovenian
Soomaali Somali
Español Spanish
Kiswahili Swahili
தமிழ் Tamil
తెలుగు Telugu
ไทย Thai
Türkçe Turkish
اردو Urdu
Tiếng Việt Vietnamese
Yorùbá Yoruba

परस्परसंबंधांमधील नेतृत्व

परस्परसंबंधांमधील नेतृत्व (नेटवर्कमधील नेतृत्व) सर्वसाधारण चर्चेसच्या वाढत्या गटाला एकत्र काम करण्यास, नवीन नेते उत्पन्न करण्यास आणि देवाने त्याच्या लोकांसाठी योजलेल्या अधिक चांगल्या गोष्टी पूर्ण करण्यास अनुमती देते. चर्चला काय होते जेव्हा ते वाढत असतात आणि असे नवीन चर्च सुरू करितात जे अजून नवीन चर्च सुरू करितात? ते कसे जोडलेले राहतात? ते कसे एक विस्तारित, आध्यात्मिक कुटुंब म्हणून कसे जीवन जगतात?

हा व्हिडिओ पहा

जेव्हा आध्यात्मिक कुटुंबे (म्हणजे सर्वसाधारण चर्च) पुनरुत्पादन करितात, तेव्हा संबंधित चर्चचे नेटवर्क लवकरच विकसित होतात. हे नेटवर्क नंतर शहर किंवा प्रादेशिक चर्चसारिखे कार्य करितात.

या शहर किंवा प्रादेशिक स्तरावर आपण एल्डर्स आणि डिकन्स लोकांना कार्यरत असल्याचे पाहतो. याच स्तरावर प्रेषित, संदेष्टे, सुवार्तिक, मेंढपाळ (पाळक) आणि शिक्षक यांसारिखे नेतृत्व वरदान देखील कार्य करितात. हे नेतृत्व वरदान सर्व शिष्यांना सेवेत अधिक प्रभावी होण्यास तयार करण्यासाठी प्रामुख्याने सुसज्ज करणारे वरदान आहेत. हे नेते तसेच एल्डर्स आणि डिकन्स आध्यात्मिक कुटुंबांच्या मोठ्या संख्येची सेवा करू शकतात.

आपण पवित्र शास्त्रात हा नमुना पाहतो, यरुशलेम चर्चमधील डिकन्स किंवा इफिस चर्च मधील एल्डर्स यांचे उदाहरण. या प्रकारची रचना मॅक्रो स्तरावर समान पॅटर्नचा उपयोग करिते जी मायक्रो स्तरावरील आध्यात्मिक कुटुंबांमध्ये दिसून येते. नेतृत्व प्रशिक्षण मिटींग्स आणि समविचारी मदतगार सत्रांमध्ये 3/3 पॅटर्न स्पष्ट होतो.

चार क्षेत्र पॅटर्नचा वापर उच्च स्तरावरील नियोजन, मूल्यमापन आणि प्रशिक्षणासाठी केला जातो. मुख्य समायोजन असे आहे की लागूकरण वैयक्तिक अटींऐवजी कॉर्पोरेट अटींमध्ये आहेत. मीटिंगमध्ये दर्शविलेल्या प्रमाणात उद्दिष्टे आणि उपक्रम हाती घेतले जातात. सामान्यतः जेथे नेटवर्क सुरू होते ते क्षेत्र नेतृत्वाच्या दृष्टीने मध्यवर्ती बनते.

त्या नेटवर्कचा प्रभाव जसजसा विस्तारतो तसतसे ते मूलत: मूळ गोष्टीच्या खाली पातळी जोड जाते. उदाहरणार्थ, जर चर्चचे नेटवर्क टाम्पामध्ये सुरू झाले, तर ते प्रथम टाम्पातील शहर चर्च म्हणून कार्य करेल. जस-जसा त्याचा प्रभाव फ्लोरिडा राज्यामध्ये पसरत जातो, ते नंतर राज्य चर्च म्हणून कार्य करू शकते आणि त्याचे विविध शहरे व काउन्टींमध्ये कन्या चर्च शाखा असू शकतात. जसजसे ते वाढत जाईल तसतसे ते राष्ट्रीय स्तरावर आणि अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील कार्य करण्यास सुरु होईल.

जगभरातील विविध राज्यांमध्ये आणि देशांमध्ये कन्या चर्चच्या विविध शाखा असतील. ह्या मंडळ्या (चर्चेस) त्यांच्या सामान्य डीएनए आणि पालकत्वामुळे जोडलेल्या असतात. सोयी, भाषा किंवा इतर कारणांमुळे काही शाखा त्यांच्या स्वतःच्या नेटवर्कमध्ये विभाजित झाल्यास, ही समस्या नाही. जर डीएनए यशस्वीरित्या सोपविला गेला असेल तर प्रत्येक आध्यात्मिक कुटुंबात किंवा आध्यात्मिक कुटुंबातील प्रत्येक सदस्यांमध्ये देखील गुणात्मक रीतीने शिष्य वाढविण्याची नवीन चळवळ स्थापित करण्यासाठी आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट असते. सामान्यतः, प्रत्येक चर्च लहान असते, ज्यामध्ये 4 ते 12 प्रौढ लोकांचा त्यांच्या लेकरांसह समावेश असतो.

ते आंतरपिढीजन्य आहेत, तरी किशोरवयीन मुले त्यांची इच्छा असल्यास त्यांच्या समवयस्कांमध्ये चर्च रोपण करू शकतात. या लहान आकारामुळे नातेसंबंध अधिक घनिष्ट बनणे, जबाबदारी अधिक प्रभावी होणे आणि सहभाग अधिक परिपूर्ण होणे शक्य होते. जे लोक ख्रिस्ताकडे येतात किंवा जे आधीच ख्रिस्ताचे अनुसरण करीत आहेत परंतु ते नवीन क्षेत्रात स्थानांतरित होत आहेत त्यांच्यासाठी डीफॉल्ट पॅटर्न हा आहे कि त्यांनी विद्यमान चर्चमध्ये सामील न व्हावे, तर असे नवीन आध्यात्मिक कुटुंब सुरू करण्यासाठी सज्ज असावे, जे नंतर नेटवर्कमध्ये सामील होते.

अशाप्रकारे, आध्यात्मिक कुटुंबे शिष्य बनविण्यामध्ये खूप फलदायी आणि प्रभावी होण्यासाठी लहान ठेविली जाऊ शकतात. पुन्हा, लहान आकारामुळे नातेसंबंध अधिक घनिष्ट बनणे, जबाबदारी अधिक प्रभावी होणे आणि सहभाग अधिक परिपूर्ण होणे शक्य होते. सर्वसाधारण मंडळ्यांची (चर्चेस) आणि वैयक्तिक अनुयायांची देवाचे वचन शिकण्याची, त्याचे आज्ञापालन करण्याची आणि ते सामायिक करण्याची इच्छा ही चळवळीचा आध्यात्मिक डीएनए आहे. जर ते एका पिढी पासून दुसरी पर्यंत, एका चर्चपासून दुसऱ्या चर्च पर्यंत आणि एका विश्वासी पासून दुसऱ्या विश्वासी पर्यंत यशस्वीरित्या पोहोंचविले गेले तर शिष्यांची गुणात्मक रीतीने वाढ होण्याची एक नवीन चळवळ सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट प्रत्येक आध्यात्मिक कुटुंबामध्ये आणि येशूच्या प्रत्येक अनुयायांमध्ये आधीपासूनच आहे.

जेव्हा चळवळींद्वारे चळवळी सुरू होतात, तेव्हा आपण एखाद्या शहराच्या किंवा राज्याच्या किंवा अगदी राष्ट्राच्या पिठात "खमीर" कार्यरत असल्याचे पाहू लागतो. अशा प्रकारे देवाचे राज्य अशा रीतीने येते की जणू काय देवाची इच्छा जशी स्वर्गात पूर्ण होते तशी पृथ्वीवर देखील पूर्ण होत आहे. अशा प्रकारे आपण सर्व राष्ट्रांच्या लोकांना शिष्य बनवून महान आदेशाला पूर्ण करू शकतो.

स्व: तालाच विचारा

Zúme प्रशिक्षणास प्रारंभ करा

काही मित्र एकत्र करा किंवा विद्यमान लहान गटासह कोर्स करा. तुमचा स्वतःचा प्रशिक्षण गट तयार करा आणि तुमच्या प्रगतीचा मागोवा घ्या.