नेतृत्वाचे गट (कक्ष)
नेतृत्वाचे गट (कक्ष) अल्पावधीत वैयक्तिक विश्वासणाऱ्यांना आयुष्यभर टिकणारे पुनरुत्पादक नमुने शिकण्यासाठी सुसज्ज करितात.
भटके, विद्यार्थी, लष्करी कर्मचारी, हंगामी कामगार जे आधीच येशूचे अनुसरण करित आहेत ते नेतृत्व गटामध्ये (कक्षामध्ये) चांगले काम करितात. त्यांच्यासंस्कृतीमुळे, त्यांच्या व्यवसायामुळे किंवा त्यांच्या जीवनाच्या हंगामामुळे - त्यांना वर्तमान गटाची स्थापना करणे कठीण होऊ शकते, परंतु ते प्रवास करितअसलेल्या प्रत्येक ठिकाणी गट कसे सुरू करायचे याचे त्यांना पूर्णपणे प्रशिक्षण दिले जाऊ शकते.
हे विशेष उद्देश गट शिकणाऱ्यांना नेते (पुढारी) बनण्यास मदत करितात जे नंतर देवाचे कुटुंब वाढविण्यासाठी नवीन गट सुरू करितील, नवीन चर्च प्रशिक्षितकरितील आणि अधिक नेतृत्व गट (कक्ष) सुरू करितील.
हा व्हिडिओ पहा
जेव्हा लोकांचा समूह एकाच वेळी विश्वासात येतो तेव्हा नेतृत्वाचे गट (कक्ष) देखील चांगले कार्य करितात. एखाद्या कुटुंबाला, मित्रांचे नेटवर्क किंवा अगदीलहान गावालाही अल्पावधीत प्रशिक्षित केले जाऊ शकते जेणेकरून ते आयुष्यभरासाठी उत्पादक बनू शकतील - अगदी वैयक्तिक पाठपुरावा किंवाआध्यात्मिक प्रशिक्षणाशिवाय.
नेतृत्वाचे गट (कक्ष) मीटिंग फॉरमॅट (3/3 पॅटर्न)
मागे वळून पहा (तुमच्या वेळेपैकी 1/3)
काळजी: प्रत्येक व्यक्तीला ते ज्यासाठी आभारी आहेत ते सामायिक करण्यासाठी वेळ द्या. मग प्रत्येक व्यक्तीने ते ज्या गोष्टीशी संघर्ष करित आहेत तीसामायिक केली पाहिजे. त्यांच्या उजवीकडे असलेल्या व्यक्तीला त्यांनी सामायिक केलेल्या गोष्टींबद्दल त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यास सांगा. जर कोणी व्यक्तीएखाद्या अशा गोष्टीशी संघर्ष करीत असेल ज्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे, तर त्या व्यक्तीची काळजी घेण्यासाठी त्या व्यक्तीसोबत रहा.
व्हिजन/दर्शन/दूरदृष्टी (कधीही वगळू नका): एकत्र मिळून गीत गाण्यात वेळ घालवा आणि देवावर प्रीती करणे, इतरांवर प्रीती करणे, येशूबद्दल इतरांना सांगणे, नवीन गट सुरू करणे आणि इतरांना असे करण्यास मदत करणे या विषयाशी निगडित गीते निवडा. वैकल्पिकरित्या, लोक या विषयाशी संवाद साधणारे बायबलशास्त्रभाग सामायिक करू शकतात.
चेक-अप (कधीही वगळू नका): प्रत्येक व्यक्तीने मागील आठवड्यात त्यांनी लिहिलेल्या वचनबद्धतेबद्दल त्यांनी कसे आचरण ठेविले ते सामायिक करण्यासत्यांना सांगा:
- तुम्ही जे शिकलात त्याचे तुम्ही कसे आज्ञापालन केले आहे?
- तुम्ही जे शिकलात त्यामध्ये तुम्ही कोणाला प्रशिक्षित केले आहे?
- तुम्ही तुमची गोष्ट किंवा देवाची गोष्ट कोणाशी सामायिक केली आहे?
जर ते वचनबद्धतेचे पालन करण्यास विसरले आहेत किंवा त्यांना तसे करण्याची संधी मिळाली नाही, तर मागील आठवड्यातील त्या वचनबद्धतेला याआठवड्याच्या वचनबद्धतेमध्ये जोडण्यात यावे. जर एखाद्याने देवाकडून स्पष्टपणे ऐकलेल्या गोष्टींचे पालन करण्यास नकार दिला तर तो चर्च शिस्तीचा मुद्दामानला जावा.
वर पहा (तुमच्या वेळेपैकी 1/3)
प्रार्थना: देवाशी साधेपणाने आणि थोडक्यात बोला. हा शास्त्रभाग तुम्हाला शिकविण्यासाठी देवाला सांगा.
वाचा आणि चर्चा करा: या आठवड्याचा शास्त्रभाग वाचा. खालील प्रश्नांवर चर्चा करा:
1. तुम्हाला या शास्त्रभागाबद्दल काय आवडले?
2. तुम्हाला या शास्त्रभागाबद्दल काय आव्हानात्मक वाटले किंवा तुम्हला काय समजले नाही?
या आठवड्याचा शास्त्रभाग पुन्हा वाचा.
3. आपण या शास्त्रभागामधून लोकांबद्दल काय शिकू शकतो?
4. आपण या शास्त्रभागामधून देवाबद्दल काय शिकू शकतो?
पुढे पहा (तुमच्या वेळेपैकी 1/3)
आज्ञापालन करा. प्रशिक्षण द्या. सामायिक करा. (कधीही वगळू नका): किमान पाच मिनिटे मौन प्रार्थना करा. गटातील प्रत्येकाला प्रार्थना करण्यास सांगा कीपवित्र आत्माने त्यांना दाखवावे की या प्रश्नांची उत्तरे कशी द्यावित, नंतर वचनबद्धता करा. प्रत्येकाने वचनबद्धता लिहून ठेविली पाहिजे जेणेकरून ते लोकांसाठीज्ञानपूर्वक रीतीने प्रार्थना करू शकतील आणि त्यांना जबाबदार धरू शकतील. ते प्रत्येक आठवड्यात प्रत्येक प्रश्नाशी संबंधित काहीतरी ऐकू शकणार नाहीत. त्यांनी लक्षात ठेविले पाहिजे की जर ते एक असा प्रतिसाद सामायिक करित आहेत ज्याबद्दल ते सुनिश्चित नाहीत कि त्यांनी हे देवापासून ऐकले आहे पण त्यांनावाटते की ही एक चांगली कल्पना आहे कारण त्या प्रकरणात जबाबदारी वेगळ्या स्तरावर हाताळली जाईल.
- तुम्ही या शास्त्रभागाचे पालन कसे कराल किंवा यास लागू कसे कराल?
- तुम्ही या शास्त्रभागाबद्दल कोणाला प्रशिक्षण द्याल किंवा हा शास्त्रभाग कोणाशी सामायिक कराल?
- तुम्ही तुमची गोष्ट (साक्ष) आणि/किंवा देवाची गोष्ट (सुवार्ता) कोणासोबत किंवा कुठे सामायिक कराल?
सराव (कधीही वगळू नका): दोन किंवा तीन च्या गटांमध्ये, प्रश्न 5, 6 किंवा 7 मध्ये तुम्ही काय करण्यास वचनबद्ध आहात याचा सराव करा. उदाहरणार्थ, कठीण संभाषण किंवा परीक्षेचा सामना करीत असल्याची भूमिका पार पाडा, आजचा शास्त्रभाग शिकविण्याचा सराव करा किंवा सुवार्ता सामायिक करण्याचासराव करा.
देवाशी बोला: दोन किंवा तीन समान गटांमध्ये, प्रत्येक सदस्यासाठी व्यक्तिगत रीतीने प्रार्थना करा. या आठवड्यात येशूबद्दल ऐकत असलेल्या लोकांचीअंतःकरणे तयार करण्यास देवाला सांगा. तुमच्या वचनबद्धतेचे पालन करण्यासाठी तुम्हाला सामर्थ्य आणि बुद्धी देण्यास त्याला सांगा. हा सभेचा निष्कर्ष आहे.
संपूर्ण सत्रात गटात नेतृत्व बदलत रहा जेणेकरून प्रत्येकाला नेतृत्व करण्याची, प्रार्थना करण्याची किंवा प्रश्न विचारण्याची संधी मिळेल. काय बरोबर चाललेआहे, थोड्या सरावाने काय चांगले होऊ शकते, आणि गटातील प्रत्येक सदस्याची आणखी वाढ होण्यासाठी कोणती चांगली पुढची पायरी असू शकते याबद्दलएकमेकांना प्रोत्साहित करा आणि प्रशिक्षण द्या.
स्व: तालाच विचारा
- येशूच्या अनुयायांचा असा कोणता गट आहे का ज्याच्याबद्दल तुम्हाला माहित आहे की तो आधीच भेटत आहे किंवा झुमे प्रशिक्षण शिकण्यासाठीएकत्रित येऊन नेतृत्व गट (कक्ष) तयार करण्यास इच्छुक असेल?
- त्यांना एकत्र आणण्यासाठी काय करावे लागेल?
आपण गमावत आहात. आताच नोंदणी करा!
- तुमच्या वैयक्तिक प्रशिक्षण प्रगतीचा मागोवा घ्या
- गट नियोजन साधनांची हाताळणी करा
- प्रशिक्षकाशी संपर्क साधा
- जागतिक दूरदृष्टी मध्ये तुमचा प्रयत्न शामिल करा!
मूलभूत शिष्य-निर्मिती आणि साधारण चर्च रोपणीच्या गुणात्मक वाढीची तत्त्वे, प्रक्रिया आणि पद्धतींमध्ये सहभागींना सुसज्ज करण्यासाठी झुमे ऑनलाइन प्रशिक्षण मंच वापरतो.
मोठ्या झुमे दूरदृष्टीचा (विजन) भाग म्हणून झुमे प्रशिक्षण विनामूल्य दिले जात आहे.