Zúme प्रशिक्षणास प्रारंभ करा
काही मित्र एकत्र करा किंवा विद्यमान लहान गटासह कोर्स करा. तुमचा स्वतःचा प्रशिक्षण गट तयार करा आणि तुमच्या प्रगतीचा मागोवा घ्या.
नेतृत्वाचे गट (कक्ष) अल्पावधीत वैयक्तिक विश्वासणाऱ्यांना आयुष्यभर टिकणारे पुनरुत्पादक नमुने शिकण्यासाठी सुसज्ज करितात. भटके, विद्यार्थी, लष्करी कर्मचारी, हंगामी कामगार जे आधीच येशूचे अनुसरण करित आहेत ते नेतृत्व गटामध्ये (कक्षामध्ये) चांगले काम करितात. त्यांच्या संस्कृतीमुळे, त्यांच्या व्यवसायामुळे किंवा त्यांच्या जीवनाच्या हंगामामुळे - त्यांना वर्तमान गटाची स्थापना करणे कठीण होऊ शकते, परंतु ते प्रवास करित असलेल्या प्रत्येक ठिकाणी गट कसे सुरू करायचे याचे त्यांना पूर्णपणे प्रशिक्षण दिले जाऊ शकते. हे विशेष उद्देश गट शिकणाऱ्यांना नेते (पुढारी) बनण्यास मदत करितात जे नंतर देवाचे कुटुंब वाढविण्यासाठी नवीन गट सुरू करितील, नवीन चर्च प्रशिक्षित करितील आणि अधिक नेतृत्व गट (कक्ष) सुरू करितील.
जेव्हा लोकांचा समूह एकाच वेळी विश्वासात येतो तेव्हा नेतृत्वाचे गट (कक्ष) देखील चांगले कार्य करितात. एखाद्या कुटुंबाला, मित्रांचे नेटवर्क किंवा अगदी लहान गावालाही अल्पावधीत प्रशिक्षित केले जाऊ शकते जेणेकरून ते आयुष्यभरासाठी उत्पादक बनू शकतील - अगदी वैयक्तिक पाठपुरावा किंवा आध्यात्मिक प्रशिक्षणाशिवाय.
काळजी:
प्रत्येक व्यक्तीला ते ज्यासाठी आभारी आहेत ते सामायिक करण्यासाठी वेळ द्या. मग प्रत्येक व्यक्तीने ते ज्या गोष्टीशी संघर्ष करित आहेत ती सामायिक केली पाहिजे. त्यांच्या उजवीकडे असलेल्या व्यक्तीला त्यांनी सामायिक केलेल्या गोष्टींबद्दल त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यास सांगा. जर कोणी व्यक्ती एखाद्या अशा गोष्टीशी संघर्ष करीत असेल ज्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे, तर त्या व्यक्तीची काळजी घेण्यासाठी त्या व्यक्तीसोबत रहा.
व्हिजन / दर्शन / दूरदृष्टी (कधीही वगळू नका):
एकत्र मिळून गीत गाण्यात वेळ घालवा आणि देवावर प्रीती करणे, इतरांवर प्रीती करणे, येशूबद्दल इतरांना सांगणे, नवीन गट सुरू करणे आणि इतरांना असे करण्यास मदत करणे या विषयाशी निगडित गीते निवडा. वैकल्पिकरित्या, लोक या विषयाशी संवाद साधणारे बायबल शास्त्रभाग सामायिक करू शकतात.
चेक-अप (कधीही वगळू नका):
प्रत्येक व्यक्तीने मागील आठवड्यात त्यांनी लिहिलेल्या वचनबद्धतेबद्दल त्यांनी कसे आचरण ठेविले ते सामायिक करण्यास त्यांना सांगा:
जर ते वचनबद्धतेचे पालन करण्यास विसरले आहेत किंवा त्यांना तसे करण्याची संधी मिळाली नाही, तर मागील आठवड्यातील त्या वचनबद्धतेला या आठवड्याच्या वचनबद्धतेमध्ये जोडण्यात यावे. जर एखाद्याने देवाकडून स्पष्टपणे ऐकलेल्या गोष्टींचे पालन करण्यास नकार दिला तर तो चर्च शिस्तीचा मुद्दा मानला जावा.
प्रार्थना:
देवाशी साधेपणाने आणि थोडक्यात बोला. हा शास्त्रभाग तुम्हाला शिकविण्यासाठी देवाला सांगा.
वाचा आणि चर्चा करा:
या आठवड्याचा शास्त्रभाग वाचा. खालील प्रश्नांवर चर्चा करा:
या आठवड्याचा शास्त्रभाग पुन्हा वाचा.
आज्ञापालन करा. प्रशिक्षण द्या. सामायिक करा. (कधीही वगळू नका):
किमान पाच मिनिटे मौन प्रार्थना करा. गटातील प्रत्येकाला प्रार्थना करण्यास सांगा की पवित्र आत्माने त्यांना दाखवावे की या प्रश्नांची उत्तरे कशी द्यावित, नंतर वचनबद्धता करा. प्रत्येकाने वचनबद्धता लिहून ठेविली पाहिजे जेणेकरून ते लोकांसाठी ज्ञानपूर्वक रीतीने प्रार्थना करू शकतील आणि त्यांना जबाबदार धरू शकतील. ते प्रत्येक आठवड्यात प्रत्येक प्रश्नाशी संबंधित काहीतरी ऐकू शकणार नाहीत. त्यांनी लक्षात ठेविले पाहिजे की जर ते एक असा प्रतिसाद सामायिक करित आहेत ज्याबद्दल ते सुनिश्चित नाहीत कि त्यांनी हे देवापासून ऐकले आहे पण त्यांना वाटते की ही एक चांगली कल्पना आहे कारण त्या प्रकरणात जबाबदारी वेगळ्या स्तरावर हाताळली जाईल.
सराव (कधीही वगळू नका):
दोन किंवा तीन च्या गटांमध्ये, प्रश्न 5, 6 किंवा 7 मध्ये तुम्ही काय करण्यास वचनबद्ध आहात याचा सराव करा. उदाहरणार्थ, कठीण संभाषण किंवा परीक्षेचा सामना करीत असल्याची भूमिका पार पाडा, आजचा शास्त्रभाग शिकविण्याचा सराव करा किंवा सुवार्ता सामायिक करण्याचा सराव करा.
देवाशी बोला:
दोन किंवा तीन समान गटांमध्ये, प्रत्येक सदस्यासाठी व्यक्तिगत रीतीने प्रार्थना करा. या आठवड्यात येशूबद्दल ऐकत असलेल्या लोकांची अंतःकरणे तयार करण्यास देवाला सांगा. तुमच्या वचनबद्धतेचे पालन करण्यासाठी तुम्हाला सामर्थ्य आणि बुद्धी देण्यास त्याला सांगा. हा सभेचा निष्कर्ष आहे.
संपूर्ण सत्रात गटात नेतृत्व बदलत रहा जेणेकरून प्रत्येकाला नेतृत्व करण्याची, प्रार्थना करण्याची किंवा प्रश्न विचारण्याची संधी मिळेल. काय बरोबर चालले आहे, थोड्या सरावाने काय चांगले होऊ शकते, आणि गटातील प्रत्येक सदस्याची आणखी वाढ होण्यासाठी कोणती चांगली पुढची पायरी असू शकते याबद्दल एकमेकांना प्रोत्साहित करा आणि प्रशिक्षण द्या.
काही मित्र एकत्र करा किंवा विद्यमान लहान गटासह कोर्स करा. तुमचा स्वतःचा प्रशिक्षण गट तयार करा आणि तुमच्या प्रगतीचा मागोवा घ्या.