डोळे हे पहाण्यासाठी कि देवाचे राज्य कोठे नाही आहे
राज्य कुठे नाही हे पाहण्यासाठी प्रत्येक शिष्याला सज्ज असणे आवश्यक आहे.
आपल्या आजूबाजूला अशी ठिकाणे आहेत जिथे देवाची इच्छा जशी स्वर्गात पूर्ण होते तशी पृथ्वीवर पूर्ण होत नाही. असे मोठे खिंडारे आहेत जिथे निराशा, वेदना, छळ, दुःख आणि मृत्यू देखील सामान्य, दैनंदिन जीवनाचा एक भाग आहे. आपण या पृथ्वीवर असताना राज्यासाठी आपल्या श्रमाद्वारे ती खिंडारे बुजवूनटाकिली पाहिजेत.
राज्य कुठे नाही हे पाहण्यासाठी आपले डोळे उघडण्याद्वारे आणि आपल्या ओळखीच्या व अनोळखी लोकांपर्यंत पोहोंचण्याद्वारे, शिष्यांची गुणात्मक रीतीने वाढहोते आणि देवाचे राज्य सुदूर व वेगाने वाढते.
हा व्हिडिओ पहा
पृथ्वीवर देवाची इच्छा पूर्णपणे पूर्ण होणे आणि सध्या अस्तित्वात असलेली परिस्थिती यामधील खिंडारे आपल्याला पाहण्याची गरज आहे. हे दोन क्षेत्रांमध्येघडणे आवश्यक आहे:
वर्तमान नातेसंबंध
पहिले क्षेत्र म्हणजे आपले वर्तमान नातेसंबंध आहे. यामध्ये आमचे मित्र, कुटुंब, सहकारी, वर्गमित्र आणि शक्यतो शेजारी समाविष्ट असतात.
अशा प्रकारे सुवार्तेचा सर्वात वेगवान रीतीने प्रसार होतो.
या लोकांसाठीची चिंता स्वाभाविक आहे. लूक 16:19-31 मध्ये आपण पाहतो की नरकात जळत असलेल्या श्रीमंत माणसालाही आपल्या कुटुंबाबद्दल कितीप्रेम आणि काळजी होती. देवाने आपल्या जीवनात या लोकांना ठेविले आहे आणि आपण त्या नातेसंबंधांना प्रेम, संयम आणि चिकाटीने चांगल्या प्रकारेसांभाळीले पाहिजे.
तुम्ही ख्रिस्ताच्या अनुयायांना त्यांच्या ओळखीच्या 100 लोकांची यादी तयार करण्याचा प्रयत्न करून लोकांच्या या गटासाठी संवेदनशील करू शकता. त्यांनात्या लोकांना तीन गटांमध्ये वर्गीकृत करण्यासाठी प्रोत्साहित करा: जे ख्रिस्ताचे अनुसरण करितात, जे ख्रिस्ताचे अनुसरण करित नाहीत आणि ज्यांचीआध्यात्मिक स्थिती अज्ञात आहे.
त्यानंतर ते ख्रिस्ताचे अनुसरण करणाऱ्यांना अधिक फलदायी आणि विश्वासू होण्यासाठी सुसज्ज करू शकतात आणि त्यांना प्रोत्साहन देऊ शकतात. जे अद्यापदेवाच्या राज्यात ख्रिस्ताचे अनुसरण करित नाहीत त्यांना ते “शिष्य” बनविण्याचे मार्ग शोधू शकतात.
वर्तमान नातेसंबंधांच्या बाहेरील संपर्क आणि नातेसंबंध
दुसरे क्षेत्र जेथे आपण राज्य नाही हे पाहू शकतो ते म्हणजे वर्तमान नातेसंबंधांच्या बाहेरील संपर्क आणि नातेसंबंध आहे.
येशूने आपल्या शिष्यांना पृथ्वीवरील प्रत्येक लोकसमूहाचे शिष्य बनविण्याचे निर्देश दिले. त्याने त्यांना जेथे ते सध्या आहेत तसेच जवळपासच्या भागात आणिस्वतःहून भिन्न असलेल्या लोकांमध्ये आणि अगदी “पृथ्वीच्या टोकापर्यंत” शिष्य बनविण्याचे निर्देश दिले आहेत.
अशा प्रकारे सुवार्तेचा प्रचार दूरवर होतो.
हे नैसर्गिक नाही. हे अलौकिक आहे. हा आपल्या जीवनातील पवित्र आत्म्याचा पुरावा आहे. देवाला काही गोष्टी आवडतात. त्याचे आवडते सर्वात लहान, शेवटचे आणि हरवलेले लोक आहेत. म्हणूनच आपण आपले जीवन केवळ आपल्या जवळच्या लोकांचीच सेवा करण्यात नव्हे तर आध्यात्मिकदृष्ट्या जगाच्याअंधकारमय कोपऱ्यात असलेल्या लोकांची सेवा करण्यात गुंतविले पाहिजे. देव गर्विष्ठांना विरोध करितो पण नम्र लोकांवर कृपा करितो. जे हताश आहेत त्यांचीसेवा आपण केली पाहिजे. हताश लोक सर्वात नम्र लोक असतात.
अशा लोकांसह, आपण विशेषत: विश्वासू लोकांचा शोध घेणे आणि त्यांच्यामध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे. लक्षात ठेवा की विश्वासूपणा देव जे प्रकटकरितो त्याचे आज्ञापालन करून आणि ते इतरांना सांगून दर्शविले जाते. हे लोक येशूच्या दृष्टान्तातील चांगल्या मातीसारिखे आहेत. हे लोक ते आहेत जे 30, 60, किंवा 100-पट उत्पन्न देतात. ते कठोर अंतःकरणाने संदेश नाकारणारे नाहीत. हे लोक ते नाहीत जे छळ झाल्यावर मागे निघून जातात. हे लोक ते नाहीतजे जगाच्या किंवा श्रीमंतीच्या काळजीने विचलित होतात. हे लोक ते आहेत जे गदरेकरांच्या प्रदेशातील भूतग्रस्त व्यक्तीसारिखे आहेत ज्याने येशूच्या सेवेलात्याची आज्ञा पाळून आणि देवाने त्याच्यासाठी जे काही केले ते इतरांना सांगून प्रतिसाद दिला. परिणामी, जेव्हा येशू नंतर त्या प्रदेशात परत आला तेव्हालोकसमुदाय त्याला शोधत होता.
स्व: तालाच विचारा
- तुम्ही कोणाला सांगण्यासाठी अधिक सोयीस्कर आहात - ज्या लोकांना तुम्ही आधीच ओळखीत आहात किंवा ज्यांना तुम्ही भेटलेले नाही, अजूनपर्यंत?
- तुम्ही असा का विचार करिता कि ते आहे?
- ज्या लोकांसह तुम्ही कमी सोयीस्कर आहात त्या लोकांना सांगण्यासाठी तुम्ही कसे अधिक चांगले होऊ शकाल?
आपण गमावत आहात. आताच नोंदणी करा!
- तुमच्या वैयक्तिक प्रशिक्षण प्रगतीचा मागोवा घ्या
- गट नियोजन साधनांची हाताळणी करा
- प्रशिक्षकाशी संपर्क साधा
- जागतिक दूरदृष्टी मध्ये तुमचा प्रयत्न शामिल करा!
मूलभूत शिष्य-निर्मिती आणि साधारण चर्च रोपणीच्या गुणात्मक वाढीची तत्त्वे, प्रक्रिया आणि पद्धतींमध्ये सहभागींना सुसज्ज करण्यासाठी झुमे ऑनलाइन प्रशिक्षण मंच वापरतो.
मोठ्या झुमे दूरदृष्टीचा (विजन) भाग म्हणून झुमे प्रशिक्षण विनामूल्य दिले जात आहे.