जर आपण गुणात्मक रीतीने वाढणारे शिष्य बनवणार आहोत, तर आपण त्यांना केवळ ग्राहकच नव्हे तर उत्पादक बनवायला हवे.

आपल्या तुटलेल्या जगात, लोकांनी देवाची योजना नाकारली आहे आणि बरेच लोक फक्त देवाच्या परिपूर्ण समीकरणाचा एक भाग म्हणून जगताना आपली ऊर्जा खर्च करित आहेत. ते शिकतात पण सामायिक (शेअर) करित नाहीत. ते भरले जातात पण ते कधीच ओतीत नाहीत. ते उपभोगितात पण उत्पादन करित नाहीत.

हा व्हिडिओ पहा

चार प्रमुख मार्ग आहेत ज्याद्वारे देव आपल्याला आध्यात्मिकरित्या वाढवितो. या टूलकिटमधील साधने या चार प्रकारे सादर केली जातील:

  1. पवित्र शास्त्र

प्रत्येक शिष्याला पवित्र शास्त्र शिकण्यासाठी, त्याचा अर्थ लावण्यासाठी आणि त्याला लागू करण्यासाठी सुसज्ज असणे आवश्यक आहे. हजारो वर्षांपासूनआणि अनेक वेगवेगळ्या लेखकांद्वारे, देवाने त्याचे वचन अशा विश्वासू लोकांच्या हृदयात टाकिले आहे ज्यांनी ते वचन ऐकले आहे आणि ते इतरांना सांगितलेआहे. पवित्र शास्त्र आपल्याला देवाची गोष्ट, त्याच्या योजना, त्याचे हृदय, त्याचे मार्ग शिकविते. जर एखादा शिष्य वाचक नसेल, तर त्याला/तिला असेकरण्यासाठी मौखिक पद्धतीसह सुसज्ज करणे आवश्यक आहे, कदाचित बायबलची ऑडिओ-आवृत्ती ऐकण्यापासून सुरुवात करणे.

या क्षेत्रामध्ये नमूद केलेली तीन साधने शिष्यांना बायबलचा अर्थ लाविण्यात आणि लागू करण्यात सक्षम होण्यासाठी आवश्यक असलेल्या विविधकौशल्यांमध्ये सुसज्ज करण्यात मदत करण्यासाठी एकमेकांना पूरक आहेत. जर तुमच्याकडे हे नाहीत, तर त्यांना येथे पहा!

3/3rds Groups, SOAPS Bible Reading, Accountability Groups

  1. प्रार्थना

देवासोबतच्या आपल्या नातेसंबंधासाठी प्रार्थना महत्त्वाची आहे. प्रार्थनेद्वारेच आपण दोन्हीं ही गोष्टी करितो म्हणजे त्याचे ऐकतो ही आणि त्याच्याशी बोलतो ही. प्रार्थना आपल्याला त्याला अधिक जवळून जाणून घेण्यास आणि त्याचे हृदय, त्याची इच्छा आणि त्याचे मार्ग समजून घेण्यास सक्षम करिते. प्रार्थना आपल्यालाइतरांची सेवा करण्यास, त्यांना शिकविण्यास आणि त्यांना साक्ष देण्यास मदत करिते.

पुढील दोन साधने शिष्यांना त्यांच्या वैयक्तिक प्रार्थना जीवनात आणि इतरांची सेवा त्यांच्यासोबत मिळून सेवा करण्यात मदत करू शकतात. ते आपल्यालाप्रार्थनेच्या स्वभावाने जगण्याची सवय विकसित करण्यास आणि केवळ दृश्यमान भौतिक परिस्थितीऐवजी आध्यात्मिक दृष्टीकोनातून जगाकडे सतत पाहण्यासमदत करू शकतात. ते प्रार्थनेसाठी आपली क्षमता देखील वाढवू शकतात.

Prayer walking, An Hour in Prayer

  1. शरीर जीवन

देवाने त्याच्या शरीराची रचना केली आहे जेणेकरून आपल्याला एकमेकांची गरज आहे. आपल्यापैकी प्रत्येकाकडे विशिष्ट शक्ती आणि विशिष्ट कमकुवतपणाआहे. आपण एकमेकांच्या अधीन होऊन एकमेकांची सेवा केली पाहिजे. शिष्याच्या जीवनात केवळ देवासोबतचे नातेच नसते तर इतरांशी असलेले नाते देखीलअसते.

शिष्यत्व हे केवळ वैयक्तिक नाही तर कॉर्पोरेट स्वरूपाचे आहे. खाली सूचीबद्ध केलेली साधने आम्हांला एकमेकांना प्रेमासाठी आणि चांगल्या कामासाठी प्रेरणादेण्यास मदत करितात, प्रेमळ दुहेरी उत्तरदायित्वाच्या वातावरणात देव जे सांगतो त्याचे पालन करण्यासाठी आणि इतरांसोबत ते सामायिक करण्यासाठी.

3/3rds Groups, Accountability Groups, Peer Mentoring

  1. छळ आणि दुःख

देव अनेक मार्गांनी आपल्या भल्यासाठी छळाचा आणि दुःखाचा उपयोग करितो. आपले चारित्र्य सुधारण्यासाठी आणि आपल्यामध्ये ईश्वरी गुण विकसितकरण्यासाठी तो त्यांचा उपयोग करितो. आपला विश्‍वास मजबूत आणि शुद्ध करण्यासाठी तो त्यांचा उपयोग करितो. दु: सहन करणाऱ्‍या अन्य लोकांच्यासेवेसाठी आपल्याला सुसज्ज करण्यास तो त्यांचा उपयोग करितो. त्याच्यास्तव बलिदान देण्याच्या आणि धोका पत्करण्याच्या आपल्या इच्छेद्वारे तो त्याचे गौरवकरण्यासाठी देखील त्यांचा उपयोग करितो. देव खात्रीने सांगतो की जर आपण या जगात त्याच्यासाठी पूर्णपणे जगू इच्छितो तर आपला छळ होईल.

जर शिष्यांना देवाच्या राज्यास्तव छळ आणि दुःखाची अपेक्षा करण्यास शिकविले गेले, तर जेव्हा शिष्यांचा सामना त्यांच्याशी होतो तेव्हा ते गोंधळून जाण्याची, कटु होण्याची, राग बाळगण्याची, नाराज होण्याची, निराश किंवा उदास होण्याची शक्यता कमी असते. आपण शिष्यांना त्यांच्या नवीन जीवनाच्यासुरुवातीपासूनच दुःखाची अपेक्षा करण्यासाठी आणि त्या दुःखास चांगला प्रतिसाद देण्यासाठी तयार केले पाहिजे, जे योग्य आहे ते करिताना देवावर विश्वासूनिर्माणकर्ता म्हणून भरवसा ठेवीत असताना. देवाच्या राज्यासाठी दु: सहन करणे आपल्याला ख्रिस्तासोबत अनंतकाळच्या आपल्या सार्वकालिक राज्यासाठीआपल्याला तयार आणि परिष्कृत करित आहे.

3/3rds Groups, Accountability Groups

स्व: तालाच विचारा

  •     वर वर्णन केलेल्या चार क्षेत्रांपैकी (प्रार्थना, देवाचे वचन, इ.) तुम्ही आधीपासूनच कोणत्या क्षेत्रांचा सराव करित आहात?
  •     तुम्हाला कोणत्या गोष्टीबद्दल अनिश्चित वाटते?
  •     इतरांना प्रशिक्षण देण्याची गोष्ट समोर असताना तुम्हाला किती तयार वाटते?

आपण गमावत आहात. आताच नोंदणी करा!

  • तुमच्या वैयक्तिक प्रशिक्षण प्रगतीचा मागोवा घ्या
  • गट नियोजन साधनांची हाताळणी करा
  • प्रशिक्षकाशी संपर्क साधा
  • जागतिक दूरदृष्टी मध्ये तुमचा प्रयत्न शामिल करा!

मूलभूत शिष्य-निर्मिती आणि साधारण चर्च रोपणीच्या गुणात्मक वाढीची तत्त्वे, प्रक्रिया आणि पद्धतींमध्ये सहभागींना सुसज्ज करण्यासाठी झुमे ऑनलाइन प्रशिक्षण मंच वापरतो.

संपूर्ण प्रशिक्षण पहा


मोठ्या झुमे दूरदृष्टीचा (विजन) भाग म्हणून झुमे प्रशिक्षण विनामूल्य दिले जात आहे.

झुमे दूरदृष्टी (विजन) बद्दल अधिक जाणून घ्या

Loading...

इंग्रजी


English English
العربية Arabic
العربية - الأردن Arabic (JO)
Sign Language American Sign Language
भोजपुरी Bhojpuri
বাংলা Bengali (India)
Bosanski Bosnian
粵語 (繁體) Cantonese (Traditional)
Hrvatski Croatian
فارسی Farsi/Persian
Français French
Deutsch German
ગુજરાતી Gujarati
Hausa Hausa
हिंदी Hindi
Bahasa Indonesia Indonesian
Italiano Italian
ಕನ್ನಡ Kannada
한국어 Korean
کوردی Kurdish
ພາສາລາວ Lao
𑒧𑒻𑒟𑒱𑒪𑒲 Maithili
國語(繁體) Mandarin (Traditional)
国语(简体) Mandarin (Simplified)
मराठी Marathi
മലയാളം Malayalam
नेपाली Nepali
ଓଡ଼ିଆ Oriya
Apagibete Panjabi
Português Portuguese
русский Russian
Română Romanian
Slovenščina Slovenian
Español Spanish
Soomaaliga Somali
Kiswahili Swahili
தமிழ் Tamil
తెలుగు Telugu
ไทย Thai
Türkçe Turkish
اُردُو Urdu
Tiếng Việt Vietnamese
Yorùbá Yoruba
More languages in progress