Zúme प्रशिक्षणास प्रारंभ करा
काही मित्र एकत्र करा किंवा विद्यमान लहान गटासह कोर्स करा. तुमचा स्वतःचा प्रशिक्षण गट तयार करा आणि तुमच्या प्रगतीचा मागोवा घ्या.
जर आपण गुणात्मक रीतीने वाढणारे शिष्य बनवणार आहोत, तर आपण त्यांना केवळ ग्राहकच नव्हे तर उत्पादक बनवायला हवे. आपल्या तुटलेल्या जगात, लोकांनी देवाची योजना नाकारली आहे आणि बरेच लोक फक्त देवाच्या परिपूर्ण समीकरणाचा एक भाग म्हणून जगताना आपली ऊर्जा खर्च करित आहेत. ते शिकतात पण सामायिक (शेअर) करित नाहीत. ते भरले जातात पण ते कधीच ओतीत नाहीत. ते उपभोगितात पण उत्पादन करित नाहीत.
चार प्रमुख मार्ग आहेत ज्याद्वारे देव आपल्याला आध्यात्मिकरित्या वाढवितो. या टूलकिटमधील साधने या चार प्रकारे सादर केली जातील:
प्रत्येक शिष्याला पवित्र शास्त्र शिकण्यासाठी, त्याचा अर्थ लावण्यासाठी आणि त्याला लागू करण्यासाठी सुसज्ज असणे आवश्यक आहे. हजारो वर्षांपासून आणि अनेक वेगवेगळ्या लेखकांद्वारे, देवाने त्याचे वचन अशा विश्वासू लोकांच्या हृदयात टाकिले आहे ज्यांनी ते वचन ऐकले आहे आणि ते इतरांना सांगितले आहे. पवित्र शास्त्र आपल्याला देवाची गोष्ट, त्याच्या योजना, त्याचे हृदय, त्याचे मार्ग शिकविते. जर एखादा शिष्य वाचक नसेल, तर त्याला/तिला असे करण्यासाठी मौखिक पद्धतीसह सुसज्ज करणे आवश्यक आहे, कदाचित बायबलची ऑडिओ-आवृत्ती ऐकण्यापासून सुरुवात करणे. या क्षेत्रामध्ये नमूद केलेली तीन साधने शिष्यांना बायबलचा अर्थ लाविण्यात आणि लागू करण्यात सक्षम होण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध कौशल्यांमध्ये सुसज्ज करण्यात मदत करण्यासाठी एकमेकांना पूरक आहेत. जर तुमच्याकडे हे नाहीत, तर त्यांना येथे पहा! 3/3 गट, एस.ओ.ए.पी.एस (S.O.A.P.S) बायबल वाचन, उत्तरदायित्व (जबाबदारी) गट
देवासोबतच्या आपल्या नातेसंबंधासाठी प्रार्थना महत्त्वाची आहे. प्रार्थनेद्वारेच आपण दोन्हीं ही गोष्टी करितो म्हणजे त्याचे ऐकतो ही आणि त्याच्याशी बोलतो ही. प्रार्थना आपल्याला त्याला अधिक जवळून जाणून घेण्यास आणि त्याचे हृदय, त्याची इच्छा आणि त्याचे मार्ग समजून घेण्यास सक्षम करिते. प्रार्थना आपल्याला इतरांची सेवा करण्यास, त्यांना शिकविण्यास आणि त्यांना साक्ष देण्यास मदत करिते.
पुढील दोन साधने शिष्यांना त्यांच्या वैयक्तिक प्रार्थना जीवनात आणि इतरांची सेवा व त्यांच्यासोबत मिळून सेवा करण्यात मदत करू शकतात. ते आपल्याला प्रार्थनेच्या स्वभावाने जगण्याची सवय विकसित करण्यास आणि केवळ दृश्यमान भौतिक परिस्थितीऐवजी आध्यात्मिक दृष्टीकोनातून जगाकडे सतत पाहण्यास मदत करू शकतात. ते प्रार्थनेसाठी आपली क्षमता देखील वाढवू शकतात. प्रार्थना वाटचाल, प्रार्थनेत एक तास
देवाने त्याच्या शरीराची रचना केली आहे जेणेकरून आपल्याला एकमेकांची गरज आहे. आपल्यापैकी प्रत्येकाकडे विशिष्ट शक्ती आणि विशिष्ट कमकुवतपणा आहे. आपण एकमेकांच्या अधीन होऊन एकमेकांची सेवा केली पाहिजे. शिष्याच्या जीवनात केवळ देवासोबतचे नातेच नसते तर इतरांशी असलेले नाते देखील असते.
शिष्यत्व हे केवळ वैयक्तिक नाही तर कॉर्पोरेट स्वरूपाचे आहे. खाली सूचीबद्ध केलेली साधने आम्हांला एकमेकांना प्रेमासाठी आणि चांगल्या कामासाठी प्रेरणा देण्यास मदत करितात, प्रेमळ दुहेरी उत्तरदायित्वाच्या वातावरणात देव जे सांगतो त्याचे पालन करण्यासाठी आणि इतरांसोबत ते सामायिक करण्यासाठी. 3/3 गट, उत्तरदायित्व (जबाबदारी) गट, समविचारी मदतगार (पीअर मेंटॉरिंग)
देव अनेक मार्गांनी आपल्या भल्यासाठी छळाचा आणि दुःखाचा उपयोग करितो. आपले चारित्र्य सुधारण्यासाठी आणि आपल्यामध्ये ईश्वरी गुण विकसित करण्यासाठी तो त्यांचा उपयोग करितो. आपला विश्वास मजबूत आणि शुद्ध करण्यासाठी तो त्यांचा उपयोग करितो. दु:ख सहन करणाऱ्या अन्य लोकांच्या सेवेसाठी आपल्याला सुसज्ज करण्यास तो त्यांचा उपयोग करितो. त्याच्यास्तव बलिदान देण्याच्या आणि धोका पत्करण्याच्या आपल्या इच्छेद्वारे तो त्याचे गौरव करण्यासाठी देखील त्यांचा उपयोग करितो. देव खात्रीने सांगतो की जर आपण या जगात त्याच्यासाठी पूर्णपणे जगू इच्छितो तर आपला छळ होईल. जर शिष्यांना देवाच्या राज्यास्तव छळ आणि दुःखाची अपेक्षा करण्यास शिकविले गेले, तर जेव्हा शिष्यांचा सामना त्यांच्याशी होतो तेव्हा ते गोंधळून जाण्याची, कटु होण्याची, राग बाळगण्याची, नाराज होण्याची, निराश किंवा उदास होण्याची शक्यता कमी असते. आपण शिष्यांना त्यांच्या नवीन जीवनाच्या सुरुवातीपासूनच दुःखाची अपेक्षा करण्यासाठी आणि त्या दुःखास चांगला प्रतिसाद देण्यासाठी तयार केले पाहिजे, जे योग्य आहे ते करिताना देवावर विश्वासू निर्माणकर्ता म्हणून भरवसा ठेवीत असताना. देवाच्या राज्यासाठी दु:ख सहन करणे आपल्याला ख्रिस्तासोबत अनंतकाळच्या आपल्या सार्वकालिक राज्यासाठी आपल्याला तयार आणि परिष्कृत करित आहे. 3/3 गट, उत्तरदायित्व (जबाबदारी) गट
काही मित्र एकत्र करा किंवा विद्यमान लहान गटासह कोर्स करा. तुमचा स्वतःचा प्रशिक्षण गट तयार करा आणि तुमच्या प्रगतीचा मागोवा घ्या.