पुन्हा स्वागत आहे Zúme ट्रेनिंगमध्ये. आधिच्या सत्रामध्ये तुमची ओळख झाली आहे शांत व्यक्तीच्या कल्पनेशी ह्या सत्रामध्ये आपण अधिक तपशिलात शिरुयात कि ती व्यक्ति कोण आणि तुम्हाला ती कशी सापडली हे कसे ओळखावे.
एक शांत स्वभावाची व्यक्ति शिष्य तयार करण्यासाठी तातडीने मदत करू शकते अशा जागी सुध्दा जिथे येशूचे अनुयायी खूप कमी किंवा एखाद दुसराच असेल.
येशूने जेंव्हा आपल्या शिष्यांना नविन ठिकाणी पाठविले शिष्य बनवण्यासाठी, तेंव्हा त्याने त्यांना एक साधी आणि महत्वाची आज्ञा दिली.
येशू म्हणाला -- पिशवी, झोळी किंवा पायतण बरोबर घेऊ नका वाटेने कोणाला मुजरा करू नका. ज्या कोणत्या घरात जाल तेथे, 'ह्या घरास शांति असो प्रथम म्हणा, तेथे कोणी शांतिप्रिय माणूस असला तर तुमची शांति त्याच्यावर राहील, नसला तर तुम्हाकडे ती परत येईल. त्याच घरात वस्ती करून ते जे देतील ते खातपीत राहा, कारण कामकरी आपल्या मजुरीला योग्य आहे, घरे बदलू नका.
परंतु ह्या सगळ्याचा अर्थ काय आहे?
आपण जेंव्हा शिष्य बनविण्याचा विचार करतो. कदाचीत आपला पहिला विचार असतो की आपली आर्थिक स्थिती उत्तम क्रमात असावी. एक विशेष लक्ष निवडावे, आणि एक स्पष्ट योजना निश्चित करावी. जर येशू म्हणतो, "जा", तर आपण "जावे" आणि जात रहावे! सगळ्यांना सांगावे सगळ्या ठिकाणी सर्व वेळी!!!
परंतु येशूने दिलेल्या सूचनांमधून जाणवते की तो आर्थिक किंवा उत्साहची फारशी चिंता करत नाही, तर लक्ष्यावर लक्ष केंद्रीत करतो. येशूला हवय की त्याच्या शिष्यांनी शोध घेऊन एखाद्या शांति प्रिय व्यक्ती मधे निवेश करावा.
आपण जर अशा ठिकाणी शिष्य तयार करू इच्छित असाल ज्या ठिकाणी बरेचशे किंवा कदाचित कुणीही नसेल, तर मग एका शांतिप्रिय व्यक्तिचा शोध घेणे ही महत्वाची गोष्ट तुम्ही करु शकता.
एक शांतिप्रिय व्यक्ति ती असतेः
बायबल मधे आपण पहातो की येशू आणि त्याचे शिष्य शांतताप्रिय लोकांना भेटतात जे थोडेसे - अनपेक्षित आहे.
गदरेकरांच्या प्रदेशात, येशू एकट्या रहाणाऱ्या दुष्टात्माग्रस्त व्यक्तिला भेटला ज्याला साखळ्यांनी बांधलेले होते. आपण कधीही त्याचा शांतताप्रिय व्यक्ति म्हणून विचार करू शकरणार नाही. परंतु तो येशूचे ऐकायला तैयार होता व त्याने अतिथिचा सतकार केला आणि येशुला राहात्या ठिकानावरून स्वागत सहीत बोलावले. तो प्रसिध्द होता आणि सहज गदीं गोळा करु शकत होता. अगदी केवळ त्याच्या उपद्रवी व्यवहारामुळेही.
आणि येशूला आढळले कि तो विश्वासू राहिला आणि येशूने त्याच्यासाठी काय केले हे ल्याने त्याच्या परिवाराला, समुदायाला, आणि त्याच्या संपूर्ण नगराला सांगितले. खरतर येशू जेंव्हा त्या जागी परत आला, मोठी गर्दी त्या ठिकाणी गोळा झाली, आणि ज्या व्यक्तीबद्दल त्यांनी एवढे ऐकले त्याला पाहण्यासाठी ते खूप उत्साहित होते.
शोमरोनामधे, येशू एका स्त्रीला विहीरीवर भेटल, जी येशूला तैयार होती आणि अतिथी सत्कार करण्यास व त्याच्या पाणी पिण्याच्या विनंतीस उत्तरही दिले. आपणास दिसते की तिचे पाच नवरे होते. आणि सध्या एका परक्या मनुष्यासोबत ती रहात होती आणि त्या छोटया गावात, तिला लोक नक्कीच ओळखत असतील, आणि येशूच्या तिच्यासोबतच्या संभाषणानंतर, ती विश्वासू राहिली आणि तिने सर्व काही ताबडतोब सांगितले मग संपूर्ण नगर येशूला विनंती करून म्हणू लागले कि त्याने त्यांनाही सांगावे आणि त्याने तसे केले.
तेव्हा, जर एखादी शांतताप्रिय व्यक्ति कुठेही राहत असली आणि काहीही करत असली आणि कदाचित कोणीही असू शकतो आपल्या माहितीतला किंवा भेटलेला - आपण त्याला कसे शोधायचे?
इथे तीन सोपे प्रकार आहेत --
आपण समाजातील लोकांकडून त्याची सिफारिश मागावी इथे कोण भरवशाचे आहे? इथे कोणी असा आहे का जो स्वतःविषयी विचार करण्यापूर्वी इतरांचा विचार करतो? जर आपल्याला एकच नाव वारंवार ऐकू आले - तर त्यांना भेटण्याचा आपण प्रयत्न करावा, त्यांना आत्मिक कल्पना दयावी, आणि पहावे कि ते ऐकण्यास आणि ते व्यक्त करण्यास तयार आहेत कि नाही ते.
आपण कोणासाठी तरी प्रार्थना करू शकतो प्रार्थनेच्या चालीमध्ये, किंवा कामाच्या जागी अथवा खेळत असताना - जेंव्हा संधी मिळेल तेंव्हा आणि मग त्या प्रार्थनेचे रुपांतर एका आत्मिक वार्तालापामधे करा.
आपण प्रत्येक संभाषणामधे आत्मिक विचार प्रस्तुत करू शकतो हे पहाण्यासाठी की देव एखाद्याच्या जीवनात कार्य करीत आहे की नाही ती व्यक्ती जर उत्सुक आणि इच्छुक असेल, तर त्यांना विचारू शकता की एखाद्या समूहाला गोळा करुन आणखी चर्चा करण्यास ते इछुक आहेत का? सिफारीशी मागवा, प्रार्थनेचा प्रस्ताव ठेवा, आत्मिक विचारांचा परिचय करा हे सगळे प्रकार आहेत ज्याद्वारे आपण शांतताप्रिय व्यक्तिला शोधण्याच्या प्रक्रियेची सुरुवात करु शकतो.
आपण त्यांना कसेही शोधलेले असो, लक्षात ठेवा येशू म्हणतो एक शांतताप्रिय व्यक्ति अशी व्यक्ती आहे जिच्यासोबत शिष्य बनविण्यासाठी आपण जास्तीत जास्त वेळ व्यतित करतो.
असा विचार करणे सोप्पे आहे कि आपल्या वेळेचा अधिक चांगला उपयोग हाच आहे की आपला स्वतःचा थोडासा वेळ प्रत्येकाला, समानतेने दयावा. परंतु येशू म्हणाला आणि त्याने दाखविले कि त्याची इच्छा नाही की आपण प्रत्येका बरोबर उथळ असावे तर अगदी थोड्यांना गहनतेने दयावे.
येशू बऱ्याचवेळा गर्दीला आकर्षित करीत असे, परंतु बायबल आपल्याला वारंवार सांगते की येशू त्या गर्दीतून बाजूला होऊन आपला अधिक समय आपल्या जवळच्या केवळ बारा अनुयायां सोबत व्यतित करित असे.
बऱ्याचदा असे होत असे की येशू आपला अधिक समय अगदी तिघांच्या छोट्याशा गटासोबत व्यतित करित असे.
जर येशू, ज्याच्याकडे खूप अधिक सामर्थ्य, खूप अधिक ऊर्जा, खूप अधिक अधिकार, अनुशासन, बुध्दीमता, ज्ञान, समज आणि करुणा होती. त्याने निवड केली की अगदी थोड्याशां सोबतच आपला वेळ गांभिर्याने घालवायचा आणि त्याने आपल्या शिष्यांना तसेच करायला सांगितले. ह्यावरून असे समजून येत नाही का कि आपणही त्याचेच अनुकरण करावे आणि त्याचा उत्कृष्ट नमुना दयावा?
एक शांतताप्रिय व्यक्ति:
ते सापडणे सोप्पे नाही - कदाचित हजारात एक असेल. परंतु एका लपलेल्या खजिन्यासारखा शोध घेणे उचित आहे. देवाचा परिवार वाढविण्यासाठी त्यांचे मोल मोजता येणे शक्य नाही.