Zúme प्रशिक्षणात आपलं स्वागत असो. ह्या सत्रात, आपण परमेश्वराच्या अर्थशास्त्राविषयी चर्चा करणार आहोत. ह्या तुटक विश्वात, लोकांना काही बक्षीस मिळयाची तेव्हा भावना येते जेव्हा ते घेतात किंवा जेव्हा त्यांना काही मिळतं व इतरांपेक्षा त्यांच्याकडे अधिक असतं.
पवित्र शास्त्रात, परमेश्वर त्याच्या लोकांना सांगतो की - माझे विचार हे तुमचे नव्हेत व तुमचे मार्ग हे माझे मार्ग नव्हेत. परमेश्वर आपल्याला दाखवून देतो की त्याच्या राज्याच्या अर्थशास्त्रात आपल्याला मिळाल्याने लाभ होत नाही - तर दिल्याने होतो. परमेश्र्वर म्हणतो की - तुझे तारण करीन व तू इतरांकरता आशीर्वाद ठरशील. येशूने म्हटले - घेण्यापेक्षा / देणे बरे. आपण अगोदरच शिकलो की अध्यात्मिक श्वाच्छ्वासाचा पाया म्हणजे परमेश्वराने आपल्याला ज्या गोष्टींनी आशीर्वादीत केलं आहे ते इतरांना दिल्याने त्यांना देखील आशीर्वादीत करणे. आपण श्वास आत घेतो म्हणजेच देवाचं ऐकतो. आपण श्र्वास बाहेर सोडतो म्हणजेच ऐकलेल्या गोष्टीचं आपण पालन करतो व इतरांना सांगतो.
जेव्हा आपण आज्ञापालनास विश्वासू असतो व जे प्रभूने आपल्याला सांगितलं ते इतरांना सांगू अधिक सांगण्याचे वचन देतो. येशूने म्हटले - जो अगदी, अल्प गोष्टीविषयी विश्वासू असतो, तो पुष्कळविषयी देखिल विश्वासू ठरेल.
हाच मार्ग आहे खोल अंतर्ज्ञानाचा, जवळीक साधण्याचा व परमेश्वराने निर्माण केलेल्या भरपूर आयुष्य जगण्याचा. परमेश्वराच्या इच्छेनुसार सत्कृत्याच्या मार्गावर आपण वाटचाल करू शकू. आपल्याला जर परमेश्वराकडून सर्वात मोठं बक्षीस हवं असेल तर त्या आशीर्वादाकरता आपण त्याने सांगितलेल्या दोन गोष्टी करायलाच हव्यात.
आपण -
- ते सर्व जे परमेश्वर आपल्याला करायला सांगतो.
आणि जर इतरांना परमेश्वराचा तो सर्वात मोठा लाभ प्राप्त व्हावा असे तुम्हाला वाटत असेल तर तीच गोष्ट कशी करावी हे त्यांनादेखील दाखवायला हवं. शिष्य बनण्याचा व बनविण्याचा हा सर्वात मोठा भाग आहे.
परमेश्वराची अशी इच्छा नाही की आज्ञापालन करून इतरांना सांगण्याअगोदर आपल्याला सर्व काही ठाऊक असावं. असा दिवस कधीच येणार नाही. वाढत जाण्यापूर्वी आपण परिपक्व व्हावं अशी परमेश्वराची अपेक्षा नाही. आपण त्वरीत उन्नती करावी असं त्याला वाटतं.
जे माहिते त्याचं आज्ञापालन करावं व जे ऐकलं तेच इतरांना सांगावं असं त्याला वाटतं.
व तेच कसं करावं हे आपण इतरांना शिकवाव - शेवटी आज्ञापालन करणं व जे माहिते ते इतरांना सांगणं / हाच परिपक्वतेचा व उन्नतीच मार्ग आहे.