3/3 गट (“तीन-तृतियांशम्हणून याचा उच्चार करा) हा असा आहे जो त्यांचा एकत्रित वेळ 3 भागांमध्ये विभागितो. हे स्वरूप केंद्रित आहे प्रभूच्या मागीलमार्गदर्शनांच्या प्रति विश्वासूपणावर, प्रभूकडून एकत्रितपणे ऐकण्यावर आणि नजीकच्या भविष्यात प्रभुने दिलेल्या कोणत्याही मार्गदर्शनासाठी आज्ञाधारकपणाचेनियोजन करण्यावर.

हा 3/3 गट मीटिंग पॅटर्न एका साधारण चर्चसाठी (किंवा होम चर्चसाठी), नेतृत्व गटासाठी किंवा समविचारी मदतगार गटासाठी वापरला जाऊ शकतो.

हे अशा रीतीने कार्य करिते:

·       मागे वळून पहा - गटाचा पहिला तृतीयांश वेळ ते एकत्र असल्यापासून काय घडत आले आहे ते मागे वळून पाहण्यात घालविला जातो.

·       वर पहा - गटाचा मधला तृतीयांश वेळ पवित्रशास्त्र, चर्चा आणि प्रार्थनेद्वारे देवाची बुद्धी आणि मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी वर पाहण्यात घालविलाजातो.

·       पुढे पहा - गटाच्या वेळेचा शेवटचा तृतीयांश वेळ ते प्रत्येकजण शिकलेल्या गोष्टींचे कसे लागूकरण आणि पालन करितात यासाठी पुढे पाहण्यातघालविला जातो.

 

हा व्हिडिओ पहा

3/3 बैठकीची (मिटिंग) रूपरेषा

मागे वळून पहा (तुमच्या वेळेपैकी 1/3)

काळजी आणि प्रार्थना : प्रत्येक व्यक्तीला ते ज्यासाठी आभारी आहेत ते सामायिक करण्यासाठी वेळ द्या. मग प्रत्येक व्यक्तीने ते ज्या गोष्टीशी संघर्ष करितआहेत ती सामायिक केली पाहिजे. त्यांच्या उजवीकडे असलेल्या व्यक्तीला त्यांनी सामायिक केलेल्या गोष्टींबद्दल त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यास सांगा. जरकोणी व्यक्ती एखाद्या अशा गोष्टीशी संघर्ष करीत असेल ज्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे, तर त्या व्यक्तीची काळजी घेण्यासाठी त्या व्यक्तीसोबतरहा.

व्हिजन/दर्शन/दूरदृष्टी : एकत्र मिळून गीत गाण्यात वेळ घालवा आणि देवावर प्रीती करणे, इतरांवर प्रीती करणे, येशूबद्दल इतरांना सांगणे, नवीन गट सुरू करणेआणि इतरांना असे करण्यास मदत करणे या विषयाशी निगडित गीते निवडा. वैकल्पिकरित्या, लोक या विषयाशी संवाद साधणारे बायबल शास्त्रभागसामायिक करू शकतात.

चेक-इन : प्रत्येक व्यक्तीने मागील आठवड्यात त्यांनी लिहिलेल्या वचनबद्धतेबद्दल त्यांनी कसे आचरण ठेविले ते सामायिक करण्यास त्यांना सांगा:

  1.     तुम्ही जे शिकलात त्याचे तुम्ही कसे आज्ञापालन केले आहे?
  2.     तुम्ही जे शिकलात त्यामध्ये तुम्ही कोणाला प्रशिक्षित केले आहे?
  3.     तुम्ही तुमची गोष्ट किंवा देवाची गोष्ट कोणाशी सामायिक केली आहे?

जर ते वचनबद्धतेचे पालन करण्यास विसरले आहेत किंवा त्यांना तसे करण्याची संधी मिळाली नाही, तर मागील आठवड्यातील त्या वचनबद्धतेला याआठवड्याच्या वचनबद्धतेमध्ये जोडण्यात यावे. जर एखाद्याने देवाकडून स्पष्टपणे ऐकलेल्या गोष्टींचे पालन करण्यास नकार दिला तर तो चर्च शिस्तीचा मुद्दामानला जावा.

वर पहा (तुमच्या वेळेपैकी 1/3)

प्रार्थना: देवाशी साधेपणाने आणि थोडक्यात बोला. हा शास्त्रभाग तुम्हाला शिकविण्यासाठी देवाला सांगा.

वाचा आणि चर्चा करा: या आठवड्याचा शास्त्रभाग वाचा. खालील प्रश्नांवर चर्चा करा:

1.     तुम्हाला या शास्त्रभागाबद्दल काय आवडले?

2.     तुम्हाला या शास्त्रभागाबद्दल काय आव्हानात्मक वाटले किंवा तुम्हला काय समजण्यास कठीण वाटले?

या आठवड्याचा शास्त्रभाग पुन्हा वाचा.

3.     आपण या शास्त्रभागामधून लोकांबद्दल काय शिकू शकतो?

4.     आपण या शास्त्रभागामधून देवाबद्दल काय शिकू शकतो?

पुढे पहा (तुमच्या वेळेपैकी 1/3)

आज्ञापालन करा. प्रशिक्षण द्या. सामायिक करा. (कधीही वगळू नका): किमान पाच मिनिटे मौन प्रार्थना करा. गटातील प्रत्येकाला प्रार्थना करण्यास सांगा कीपवित्र आत्माने त्यांना दाखवावे की या प्रश्नांची उत्तरे कशी द्यावित, नंतर वचनबद्धता करा. प्रत्येकाने वचनबद्धता लिहून ठेविली पाहिजे जेणेकरून ते लोकांसाठीज्ञानपूर्वक रीतीने प्रार्थना करू शकतील आणि त्यांना जबाबदार धरू शकतील. ते प्रत्येक आठवड्यात प्रत्येक प्रश्नाशी संबंधित काहीतरी ऐकू शकणार नाहीत. त्यांनी लक्षात ठेविले पाहिजे की जर ते एक असा प्रतिसाद सामायिक करित आहेत ज्याबद्दल ते सुनिश्चित नाहीत कि त्यांनी हे देवापासून ऐकले आहे पण त्यांनावाटते की ही एक चांगली कल्पना आहे कारण त्या प्रकरणात जबाबदारी वेगळ्या स्तरावर हाताळली जाईल.

  1.     तुम्ही या शास्त्रभागाचे पालन कसे कराल किंवा यास लागू कसे कराल?
  2.     तुम्ही या शास्त्रभागाबद्दल कोणाला प्रशिक्षण द्याल किंवा हा शास्त्रभाग कोणाशी सामायिक कराल?
  3.     तुम्ही तुमची गोष्ट (साक्ष) आणि/किंवा देवाची गोष्ट (सुवार्ता) कोणासोबत किंवा कुठे सामायिक कराल?

सराव : दोन किंवा तीन च्या गटांमध्ये, प्रश्न 5, 6 किंवा 7 मध्ये तुम्ही काय करण्यास वचनबद्ध आहात याचा सराव करा. उदाहरणार्थ, कठीण संभाषण किंवापरीक्षेचा सामना करीत असल्याची भूमिका पार पाडा, आजचा शास्त्रभाग शिकविण्याचा सराव करा किंवा सुवार्ता सामायिक करण्याचा सराव करा

देवाशी बोला : दोन किंवा तीन समान गटांमध्ये, प्रत्येक सदस्यासाठी व्यक्तिगत रीतीने प्रार्थना करा. या आठवड्यात येशूबद्दल ऐकत असलेल्या लोकांचीअंतःकरणे तयार करण्यास देवाला सांगा. तुमच्या वचनबद्धतेचे पालन करण्यासाठी तुम्हाला सामर्थ्य आणि बुद्धी देण्यास त्याला सांगा. हा सभेचा निष्कर्ष आहे.

स्व: तालाच विचारा

  •     काय तुम्हाला काही फरक आढळले आहेत का एका 3/3 गटामध्ये आणि एक बायबल स्टडीमध्ये किंवा पूर्वीच्या एका छोट्या गटामध्ये ज्याचा तुम्हीभाग होता (किंवा त्याविषयी ऐकले होते). जर असे असेल तर, त्या फरकांचा गटावर कसा परिणाम होईल?
  •     काय 3/3 गटाला एक साधारण चर्च मानले जाऊ शकते? का किंवा का नाही

आपण गमावत आहात. आताच नोंदणी करा!

  • तुमच्या वैयक्तिक प्रशिक्षण प्रगतीचा मागोवा घ्या
  • गट नियोजन साधनांची हाताळणी करा
  • प्रशिक्षकाशी संपर्क साधा
  • जागतिक दूरदृष्टी मध्ये तुमचा प्रयत्न शामिल करा!

मूलभूत शिष्य-निर्मिती आणि साधारण चर्च रोपणीच्या गुणात्मक वाढीची तत्त्वे, प्रक्रिया आणि पद्धतींमध्ये सहभागींना सुसज्ज करण्यासाठी झुमे ऑनलाइन प्रशिक्षण मंच वापरतो.

संपूर्ण प्रशिक्षण पहा


मोठ्या झुमे दूरदृष्टीचा (विजन) भाग म्हणून झुमे प्रशिक्षण विनामूल्य दिले जात आहे.

झुमे दूरदृष्टी (विजन) बद्दल अधिक जाणून घ्या

Loading...

इंग्रजी


English English
العربية Arabic
العربية - الأردن Arabic (JO)
Sign Language American Sign Language
भोजपुरी Bhojpuri
বাংলা Bengali (India)
Bosanski Bosnian
粵語 (繁體) Cantonese (Traditional)
Hrvatski Croatian
فارسی Farsi/Persian
Français French
Deutsch German
ગુજરાતી Gujarati
Hausa Hausa
हिंदी Hindi
Bahasa Indonesia Indonesian
Italiano Italian
ಕನ್ನಡ Kannada
한국어 Korean
کوردی Kurdish
ພາສາລາວ Lao
𑒧𑒻𑒟𑒱𑒪𑒲 Maithili
國語(繁體) Mandarin (Traditional)
国语(简体) Mandarin (Simplified)
मराठी Marathi
മലയാളം Malayalam
नेपाली Nepali
ଓଡ଼ିଆ Oriya
Apagibete Panjabi
Português Portuguese
русский Russian
Română Romanian
Slovenščina Slovenian
Español Spanish
Soomaaliga Somali
Kiswahili Swahili
தமிழ் Tamil
తెలుగు Telugu
ไทย Thai
Türkçe Turkish
اُردُو Urdu
Tiếng Việt Vietnamese
Yorùbá Yoruba
More languages in progress